एखादी वास्तू बाधित असल्यास त्याच्या अशुभ स्पंदने, नकारात्मक ऊर्जा जाणवत असल्यास, भाड्याचे घर असताना वास्तुदोष आहे व वास्तू बंधन करू शकत नसल्यास, वास्तूत सकारात्मता उर्जा निर्माण होण्यासाठी वास्तू चैतन्यासाठी दत्त याग केला जातो.
एखादे घर, झोपडी, महाल, ऑफिस, हॉस्पिटल, गार्डन, गाईचा गोठा, शाळा, क्लिनिंग ट्युशन ,क्लासेस वा अन्य कोठेही अशी बाधीत वास्तूमध्ये आपण राहिल्यास आपली प्रगती होत नाही. वास्तूत विचित्र अनुभव येतात. आळस येतो काम करण्याची इच्छा होत नाही. प्रत्येक कामात अडचणी येतात, जास्तीत जास्त पैसा खर्च होणे, प्रगती न होणे. या सर्व गोष्टीला सामोरे जावे लागते. अचानक मृत्यू येणे, अपघात होणे, डॉक्टरी खर्च वाढणे…. तसेच दत्तयाग करण्यामागे अजूनही काही गोष्टी आहेत, जसे गुरुनींदा झाल्यास गुरु दोष दूर करण्यासाठी, साधनेत चांगली प्रगती साधण्यासाठी, दत्तमहाराज यांच्या कृपेसाठी, गुरु कृपेसाठी, काही लोक पारायण पुरती नंतर दत्तयाग करतात.