11-05-2020
सर्व प्रथम मी या व्यासपीठाचे आभार मानतो कि, तुमच्यासारख्या चोखंदळ वाचक व साधकांना माझे अध्यात्मिक अनुभव सांगण्याची संधी मिळाली. मी तुमच्या सारखा एक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलो. आर्थिक परिस्तिती सर्वसाधारण असल्याने सदैव पैशाची चण चण असायची. आपण हि खूप धन कमवावे हि इच्छा होती. लहान वयातच जबाबदाऱ्या वाढत होत्या. लहानपणी मी गाड्यांचे हुबेहूब आवाज काढायचो कदाचित ड्राइवर किंवा …