google336aa3038a7d075c.html

गुरु पूजन-Vyas guru purnima

','

' ); } ?>

गुरुपादुका पूजन म्हणजे देखावा नसून गुरुतत्वाची ओंजळ भरून घेतलेली ज्ञानप्राप्ती असते.

गुरुतत्वात गुरुशक्ती-सिद्धशक्ती-सुप्तशक्ती-चैतन्यशक्ती-बीजशक्ती या दैवीशक्तीत सामावलेल्या असल्याने, तुमचे कर्म तुम्हाला वेळोवेळी फळ देत असते.

Solution

आजच्या या कलियुगाच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी, कुटुंबासाठी अनेक स्तरांवर धनप्राप्ती, मनःशांती-तृप्तीसाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत.

आपल्या जीवनाचे उद्दीष्ट्ट काय आहे? हे बहुतांशास समजलेले नाही.

वाल्या ते वाल्मिकीचा प्रवास करताना अनेक समस्यांचे समाधान शोधण्याच्या नादात अनेक गुरु सानिध्यात येतात, काही वेळेला नशिबाचा दाखला देत अनुकूल-प्रतिकूल परिस्तिथीचा स्वीकार आपण करतो.

समस्यांचे समाधानाच्यावेळी संयम-श्रद्धा-विश्वास यांची सचोटी लागते.

जातकाच्या समस्यांची गुंता सोडवताना गुरुंना आपल्या सर्वस्वाची बाजी पणाला लावावी लागते. जर गुरु, गुरूप्रणाली द्वारे अधिकारी पुरुषव्यक्ती असेल तर त्यामागे त्याची गुरूप्रणाली कार्य करण्यास सक्षम असते.

आर्त-यथार्त-जिज्ञासु-भक्त अशा प्रकारच्या विभिन्न प्रकारच्या संस्कारी व्यक्तींच्या कृतज्ञ आणि कृतघ्न वृत्तीमुळे चांगले-वाईट फळ प्राप्त होत असते.

Jeev Bhramha Seva

१. देखल्या देवा दंडवत, २. गरज सरो वैद्य मरो. , ३. तोंडावर बोली पाठीवर शहाळी. अशा अनेक दाखल्यांसहित जातक आपली भूमिका पार पडताना बहुतांश दिसतो.

देव-देवी, ग्रह-तारे, आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-सखा, मार्गदर्शक-वाटाड्या अशा अनेक नात्यांचा संगम म्हणजेच गुरु आहे.

खऱ्या गुरु तत्वाला तुमच्याकडून निखळ भक्तीशिवाय कोणतीच अपेक्षा नसते. परंतु जातक-शिष्य आपल्या सोयीनुसार गुरूंचा आणि त्यांच्या शक्तीच्या वापराचा वारसाहक्क मिळाल्याप्रमाणे गुरुंशी सलगी साधण्याचा प्रयत्न करुन आपले हित साधण्याचा प्रयत्न करीत असतात.

गुरु जो शरीरधारी आहे. तो कदाचित तुमच्या सुखदुःखात सहभागी होऊन तुम्हाला क्षमा करतीलही, परंतु गुरुतत्वात गुरुशक्ती-सिद्धशक्ती-सुप्तशक्ती-चैतन्यशक्ती-बीजशक्ती या दैवीशक्तीत सामावलेल्या असल्याने, तुमचे कर्म तुम्हाला वेळोवेळी फळ देत असते.

आपण एखादी चांगली-वाईट क्रिया केल्यावर त्या देहधारी गुरूला काय कळणार? असे भ्रामक कल्पनेत वावरणाऱ्या जातकाला-शिष्याला हीच दैवीशक्ती कडू-गोड औषध पाजत असते.

शंकासुराचे मुकुट धारण केलेल्या मूर्ख जातकाला सदैव अंधारच दिसत असतो, तर याउलट श्रद्धेचा तिलक धारण करणाऱ्या जातकाला अंधारात यशाची ज्योत प्रज्वलित होताना दिसते. 

Guru Padya Pujan

गुरुकृपाप्राप्तीसाठी गुरुनिंदा-चेष्टा-अवहेलना-अपमान करू नका. अन्यथा गुरुअवकृपा होऊन संकटाची दारे सदैवासाठी उघडली जातील. (नित्य, नेमितिक, काम्या, विमल.) दानधर्म करावे.

* गुरुपादुका पूजन म्हणजे देखावा नसून गुरुतत्वाची ओंजळ भरून घेतलेली ज्ञानप्राप्ती असते.

मार्गदर्शनासाठी..

गुरुबलप्राप्तीसाठी धर्मवेदाचे विधान जाणून घेऊया..

शक्य असल्यास सोन्याची गुरूची प्रतिमा बनवा आणि  ती  पिवळ्या कपड्यात गुंडाळा.  चौरंगावर ईशान्य दिशेला धान्याच्या ढिगाऱ्यावर पांढरा कलश (चांदीचा) ठेवा आणि त्यात पंचगव्य आणि कुशोदक ठेवा. सर्व औषध टाकल्यानंतर त्यावर एक पूर्ण भांडे ठेवा आणि पिवळ्या (चंदन युक्त ) अक्षतावर गुरुची प्रतिमा ठेवा. पंचामृताचे नैवेद्य, सुवर्ण भेट इत्यादि गुरुपूजा पादशोपचारांनी करावी.  गुरुप्रती मनीस्मृती स्तुती करुन नंतर समर्पण भावनेने चुकांची स्वीकारोक्ति करावी.  त्यानंतर, बृहस्पतीच्या मंत्राने, उंबराच्या समिधा, जव, घृतयुक्त पायस, घृतयुक्त मिश्र तीळ या चार घटकांचा स्वतंत्र अत्तोत्तरसन होम अर्पण करा.  त्यानंतर, उर्वरित यज्ञ पूर्ण केल्यानंतर, तांब्याच्या भांड्यात पिवळे सुगंधी तेल आणि अखंड फुले असलेल्या पाण्याने नैवेद्य दाखवावा.  नंतर त्या घागरीतील पाणी घेऊन गुरु किंवा इष्ट मंत्रांनी पुजारी पुत्र व पत्नी किंवा गुरुंना अभिषेक करावा,  नंतर ब्राम्हणाला प्रतिमा, कलश आणि दान  द्या.  मग ब्राह्मणांना भोजन द्यावे, आणि असे केल्यास गुरुकृपा प्राप्त होईल. 

गुरुशिष्यात देवाण-घेवाणीच्या व्यवहाराचा हिशोब ठेवला जात नाही, तो आपल्या कर्माचा भाग गृहीत धरून पुढील मार्गक्रमण करीत राहणे हिताचे असते.

शुभं भवतु.

हवनाच्या भस्माचे फायदे

Leave a Reply

%d bloggers like this: