google336aa3038a7d075c.html

सद्गुरू गोरक्षनाथ – वरुथिनी एकादशी

','

' ); } ?>
वैशाख महिन्यातील ( २६ एप्रिल २०२२ ) कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणतात. या वर्षी वरुथिनी एकादशीला त्रिपुष्कर योग तयार होत आहे. या शुभ योगात केलेल्या कामाचे तिप्पट फळ मिळते. वरुथिनी एकादशीचे व्रत केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे.
श्री गोरक्षनाथ
श्री गोरक्षनाथ

श्री गोरक्षनाथ – एक प्रभावी उपासना

मनात एखादी इच्छा धरुन निश्चयानें नवनाथ भक्तिसार पठण केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते, पूवेंकडे तोंड करून, एखाद्या मऊ वस्त्राच्या आसनावर बसून ग्रंथ पठण करावे. लाकडी पाट बसावयास घेऊं नये. घेतल्यास, पाटावर वस्त्र घालून त्यावर बसावे. समोर चौरंग किंवा पाट ठेवून, त्यावर ग्रंथ ठेवावा, व पूजा करून नित्य वाचन करावे. समोर किंवा उजव्या हाताला श्रीदत्तात्रेयांची तसबीर असावी तसबीर शक्य तर भिंतीस टांगावी जमिनीवर, ठेवूं नये. संपूर्णं ग्रंथ वाचून आरती करावी. 

श्री चैतन्य गोरक्षनाथ, प्रगट दिन

वरुथिनी एकादशीला  गोरक्षनाथ प्रगट दिन सोहळा साजरा होतो. या दिवसाचे अनन्य साधारण महत्व आहे. या दिवशी आपल्या घरी देखिल नाथांची पुजा करुण नाथकृपेचा लाभ आपण घेऊ शकता. या दिवशी आपल्या घरी श्री नवनाथांची प्रतिमा वस्ञाने स्वच्छ पुसुन केशरी गंध लावावा. फुले अर्पण करुण हार घालावा. त्यानंतर धुप व तुपाचा दिवा लावावा. नैवद्यासाठी मलिदा अर्पण करावा. प्रतिमा पुजा नंतर आसनावर बसुन एकाग्र चित्ताने “ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः” या मंञाचा १०८ वेळेस माळ जप करावा व नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील गोरक्षनाथांचा जन्मकथा असलेला ९ वा अध्याय वाचावा नंतर आरती करावी. गाईला नैवद्य द्यावा व सर्वांनी प्रसाद घ्यावा शक्य असल्यास यथाशक्ती अन्नदान करावे.

श्री गोरक्षनाथ
श्री गोरक्षनाथ

गोरक्षनाथांचा उपदेश व तत्त्वज्ञान

गोरक्षनाथांनी साधकांना जो मौलिक उपदेश केला आहे, ते म्हणतात, ‘ज्याने जिभेवर नियंत्रण मिळविले त्याने सर्व काही जिंकले. फाजील आहार घेतल्याने इंद्रिये प्रबल होऊन ज्ञान नष्ट होते. जो मनुष्य आसन, आहार व निद्रा यांच्या संबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करतो तो वृद्धावस्थेवरच नव्हे, तर मृत्यूवरही मात करतो. मांस, मदिरा भक्षण करण्यापासून जो आनंद मिळतो त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आनंद योगसाधना करून मिळतो. जीवाची हत्या कधीच करू नका. त्यांच्यावर दया करा. कारण सर्व योगसाधनेचे व अध्यात्माचे मूळ दया हेच आहे. आपले आचार-विचार शुद्ध राखण्यासाठी साधकाने काम, क्रोध, अहंकार, विषयविकार, तृष्णा आणि लोभ यांचा त्याग करायला हवा. हसा, खेळा परंतु ब्रह्माला विसरू नका. रात्रंदिवसस ब्रह्मज्ञानाचीच चर्चा चालू असायला हवी. अल्प-स्वल्प आहार हाच शरीररक्षणाचा उत्तम उपाय आहे. त्यायोगे नाड्यांमध्ये मलाचा संचय होणार नाही व प्राणायाम सोपा होऊन नाड्यांमध्ये होईल, व चक्रांचा भेद होईल आणि योग्याला अनाहत ध्वनी ऐकू येईल. कमी खाण्याप्रमाणेच साधकाने कमी बोलायला हवे. योग्याने वादविवादात कधीही भाग घेऊ नये. तसेच मूर्खांशी मैत्री करू नये. योग्याने हे सर्व नियम पाळून आपल्या कुंडलिनीला जाग आणून त्या महाशक्तीला ब्रह्मारंध्रामध्ये नेऊन बसवायला हवे. तसेच योग्याने आत्मस्थ होऊन प्राणायामाची साधना नियमितपणे करायला हवी. तसेच, शरीराचे आरोग्य सांभाळण्यासाठी दर तीन-चार महिन्यांच्या अंतराने त्याने कायाकल्पही करायला हवा, इत्यादी.

श्री गोरक्षनाथ
श्री गोरक्षनाथ

श्रीगोरक्षनाथांच्या ग्रंथांवरून त्यांच्या अशा तत्त्वज्ञानाची आपल्याला ओळख होते. गोरक्षनाथांच्या काळात भारतातील अनेक धर्मसंप्रदायांमध्ये वामाचार सुरू झाला होता आणि पंचमकरांना (मांस, मद्य, मैथुन इ.) प्रमाणाबाहेर महत्व प्राप्त झाले होते. स्वतःला साधक म्हणविणारे आपल्या वासनापूर्तीसाठी याचा सर्रास उपयोग करीत होते. याला पायबंद घालण्यासाठी गुरु गोरक्षनाथांनी साधनांची पवित्रता, शुद्ध चारित्र्य आणि संयमपूर्ण नीतिमान जीवनाचे महत्व आपल्या ग्रंथाद्वारे व उपदेशाद्वारे साधकांना पटवून देण्याचे फार मोठे कार्य केले, व स्वतःचाच आदर्श त्यांच्यापुढे ठेवला. त्यांचे दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी शैव संप्रदायाचे संघटन करून तो संप्रदाय बलशाली केला, व त्यात नीतिमान, सदाचारी व संयमी साधक निर्माण केले. तसेच, त्यांनी या पंथात जातिभेद वा धर्मभेद कधीही मानला नाही. त्यांनी यवनांनाही तितक्याच मुक्तपणे आपल्या पंथात प्रवेश दिला.

कुण्डलिनी जागृतीलाही नाथसंप्रदायात विशेष महत्वाचे स्थान आहे. कारण या कुण्डलिनीशक्तीच्या द्वारेच जीवशिव सामरस्याचा अनुभव नाथयोग्याला येतो. मात्र हा अनुभव गुरुकृपेवाचून मिळणे दुरापास्त असल्यामुळे नाथपंथात गुरुला अपरंपार महत्व आहे. अशा गुरुच्या ठिकाणी ३६ लक्षणे वा गुण असावयास पाहिजेत. एवढेच नव्हे, तर शिष्यातही ३२ लक्षणे वा गुण असल्यावाचून त्यास शिष्य होता येत नाही. या संप्रदायात शरीर हेच मोक्षप्राप्तीचे किंवा कैवल्यप्राप्तीचे साधन असल्यामुळे ते उपेक्षणीय समजले जात नाही. आमच्या उपनिषदांतही याचसाठी शरीररक्षणाला महत्व दिलेले आढळून येते. हठयोगाच्या साहाय्याने साधकाला याचि देही याचि डोळा हा मुक्तीचा सोहळा अनुभवता येतो असे नाथांचे तत्त्वज्ञान सांगते.

तात्पर्य :-

मनाचे समाधान जर टिकवायचे असेल, तर नामावर मन केंद्रित केले पाहिजे. काळजी केल्याने कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. यासाठी जास्तीतजास्त वेळ नामस्मरणात घालवावा. Click

दोहा

नव नाथो मे नाथ है, आदिनाथ अवतार । जती गुरु गोरक्षनाथ जो, पूर्ण ब्रह्म करतार॥
संकट -मोचन नाथ का, सुमरे चित्त विचार । जती गुरु गोरक्षनाथ जी मेरा करो निस्तार ॥

।।  श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः  ।।

अधिक माहितीसाठी पुढील व्हिडीओ जरुर पाहावा.

Leave a Reply

%d bloggers like this: