google336aa3038a7d075c.html

वनस्पती शास्त्र / काळी हळद 2

काळी हळद = उर्जित अंशमात्र वनस्पती पूजनाने धनप्राप्ती, शत्रूमुक्ती, बरकत आणि ध्यानसाधना प्राप्त होते.  शत्रुपीडेपासून मुक्ती मिळते.  धन-आरोग्यप्राप्ती होते. 

हळदीमध्ये सात प्रकार असून, काळी हळद, लाल हळद, सफेद हळद, जांभळी हळद, पिवळी हळद, गुलाबी हळद, हिरवी हळद असते.

✍️ आज आपण काळ्या हळदी बद्दल जाणून घेऊ या……..

काळया हळदीचे दोन प्रकार असून, साधी काळी हळद व भद्रकाली हळद असते. हि हळद प्रत्यक्ष कालिकामातेचे प्रतीक असून, ती अतिशय दुर्मिळ वनस्पती आहे. हळदीचा उपयोग लक्ष्मीकारक, धन ऐश्वर्य प्राप्तीकरिता याची देवघरात, व्यापाराच्या ठिकाणी गल्ल्यात अथवा तिजोरीत स्थापना करून नित्य पूजा केली जाते.

हळदीचा वापर मी यजमानाच्या घरी हवन कार्यामध्ये अवश्‍य करतो. जेणेकरून माझ्या यजमानांना त्याचा भरपूर फायदा व्हावा हा उद्देश असतो.

काळीहळद शास्त्रशुद्ध पद्धतीने विशिष्ट तिथी, मुहूर्तावर आमंत्रण देऊन काढली जाते. हिचा सुकलेल्या कंदाचा विशिष्ट तुकडा सिद्ध मंत्राने उर्जित करून गरजूंना दिल्यास धनप्राप्तीसाठी, शत्रूंचा त्रास कमी होण्यासाठी उपयोग होतो. याच बरोबर शत्रू रक्षक वनस्पती जवळ बाळगावी.

या हळदीचे पूजन करताना विशिष्ट मंत्र जपाचा उपयोग करून शांत चित्ताने एकाग्रतेने मंत्रजप करताना चिमुटभर कुंकू मंत्र म्हणून हळदीवर वहावे. जमा झालेला कुंकू कपाळावर लावावा. हळदीचा दुरुपयोग करू नये. अथवा हे कुंकू इतर कोणाला देऊ नये.

काळी हळद देवघरात अथवा तिजोरी ठेवताना स्टीलच्या अथवा चांदीच्या वाटीत, डबीत लाल कपड्यावर ठेवावी. शुचिर्भतपणा पाळावा. अन्यथा हळद नष्ट व्हायला वेळ लागणार नाही .

(काळया हळदी बद्दल अजून माहिती मी माझ्या वनस्पतीशास्त्र भाग – 1 या पुस्तकात दिली आहे.)

काळी हळद याबाबत थोडेसे सविस्तर माहिती

Leave a Reply

%d bloggers like this: