आध्यात्मिकता / Spirituality = माझ्या आध्यात्मिक वाटचालीत अनेक मान्यवर मंडळी मला भेटली.
अनेक जणांच्या अनेक प्रकारे असलेले अनुभव त्यांनी प्रत्यक्षरीत्या मांडले. काही जण केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून असून काही प्रत्यक्षरीत्या गुरु सानिध्यात आहे. परंतु त्यातील काही केवळ भरकटलेले दिसतात. त्यांची गुरु प्रती असलेली निष्ठा ही वाखणण्याजोगी असली तरी, अध्यात्माचा कुठेही मागमूस नव्हता.
सर्व संकट निवारणासाठी नको ते प्रकार करून आपण यातून सहीसलामत रित्या बाहेर पडू आपली सारी संकटे क्षणार्धात संपतील. या खोट्या आशेवर ते कित्येक महिने वर्ष प्रयत्न करीत आहे. पुन्हा आम्ही जे काही करीत आहोत ते योग्यच असून यातून आम्हाला मार्ग मिळणार असा त्यांचा गोड गैरसमज झालेला आहे.

अध्यात्म हे शांतीचे, यशाचे, ज्ञानाचे व मोक्षाचे साधन असून त्याची योग्य जपणूक करून योग्यरीत्या, योग्य माणसाकडून मार्गदर्शन घेऊन पुढील मार्गक्रमण करावा. यासाठी आहे काहींच्या मते आम्ही आयुष्यात कुठेच चुकलेलो नाही. तर मग आम्हाला अनेक अडचणी कशा काय येतात. आम्ही आमच्या देवतेची रोज नियमित पूजा करीत असून ती देवता आम्हाला सहाय्यभूत का बरं होत नाही? अशा प्रकारे त्यांच्या प्रश्नांची भडीमार असून उत्तर कोणत्याही दिशेतून त्यांना आजवर मिळालेले दिसून आले नाही.हाच प्रश्न अनेकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या भेडसावतच असतो.
त्यासाठी सर्वांना हेच सांगणे आहे की प्रथम आपल्या कुलदैवतेची, इष्ट दैवतेची मनाजोगे म्हणजे स्वतःच्या मनाला पटेल अशी पूजाअर्चा न करता, योग्य म्हणजे सांप्रदायिक पद्धतीने करून प्रथम त्या दैवतेचे पाठराखण मिळवावे. अन्यथा कोणताही साधुसंत तुमचं भवितव्य घडवू शकत नाही. ज्यावेळेस कुलस्वामिनी म्हणजे तुमची कुलदेवता, ईष्टदैवता तुम्हाला साहाय्यभूत असते, त्या वेळेस तुम्हाला चमत्कारिकरित्या अनुभव येऊ लागतात. अशक्यही वाटणारे प्रश्न सहजपणे सुटत चालल्याचे तुम्ही अनुभव घेऊ शकता.
त्यापुढील आध्यात्मिक मार्गक्रमण तुम्हाला हवा असेल तर, गुरूंकडून मिळवून घ्यावा व तेही मागे सांगितल्याप्रमाणे बारा प्रकारच्या गुरु मधील योग्य गुरु निवडून मगच त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा. जर तुमची कुलदेवता, ईष्टदैवता तुम्हाला सहाय्यभूत असेल तर पुढीलमार्ग मग तो सिद्धी असो, वा साधना असो वा, उपासना असो, ते तडीस नेण्यास कुलस्वामिनी , इस्टदैवता समर्थ असते. आपल्या क्षेत्रात म्हणजेच शरीरात जी कुंडलिनी शक्ती (माता भगवती) हिला जागृत करून अनेक प्रकारे तुम्ही आध्यात्माचे अनुभव घेऊन आपले जीवन सफल करू शकता.. Click