” हा देह चंदनरुपी झाला “
रंगीबेरंगी फुलांनी आपल्या धारणकर्त्यासाठी आपल्या रंगांची सुगंधाची उधळण करावी. रखरखत्या मातीवर पावसाने जशी कृपा करावी. उगवत्या सूर्यानी आपल्या सुवर्ण किरणांनी जसे पृथ्वीला अलंकारिक करावे. जसा बेभान वारा शीळ घालत रानावनात सैरावैरा धावतो. तसाच एक निष्ठावंत साधक आपल्या इष्टदैवतेच्या कृपाप्रसादात सदैव ओथंबून निघत असतो. Follow

फुलांचे रंग हे त्याच्या आज्ञा चक्रावर नाचत असतात. भिजलेल्या मातीचा सुगंध त्याच्या श्वासात दरवळत असतो. सुवर्ण किरणांची लखलख त्याच्या ज्ञानात होत असते. एका भमराप्रमाणे दरवेळी हा साधक आपल्या इष्टदैवतेच्या कमलरुपी प्रेमात कैद करून घेत असतो. अस्तित्वाची जाणीव काळाच्या पडद्यात दडून बसलेली असते. कैफ विचारांनी धुम ठोकलेली असते. हा जन्म कमीच पडेल असं समजून त्याच्या पापण्या आनंदाश्रूंनी सदैव भरलेल्या असतात.
न मागता मिळालेले जिभेवरचे स्वाद मोहाचा मेद कमी करत असतात. मिटलेल्या नजरेने दृश्य पाहणारा साधक खऱ्या अर्थाने आंधळेपणातून बाहेर आलेला असतो. आपल्या इष्ट शक्तीचा स्पर्श त्याचे रोमांच जागृत करत असतो. वातावरणातला दाब नाहीसा घेऊन श्रवणइंद्रिय एकतल्लीन होतात. त्याला भगवंताचे रूप या चराचरात प्रत्येक कणकणात असल्याचे ठाऊक झाल्याने, तो साधक निरागस होतो. जाति भेदापासून ते लिंगभेदापपर्यंत सर्वच बाबतीत त्याची उदासीनता झालेली असते.
चंदनरुपी गुरूच्या सानिध्यात केवळ मानसन्मान मिळतो, सुगंधांच लावण्य घेऊन परमेश्वराच्या चरणकमलापासून ते शिरोमणी पर्यंत चंदनाला स्थान मिळते. या परिस्थितीत चंदनाला परमेश्वर प्रिय असतो व परमेश्वराला चंदन प्रिय असते. जेव्हा हा देहच चंदन रुपी होतो तेव्हा, त्या देहाची गरज सर्वांनाच भासते. तो ज्या स्थळी जाईल तिथे तो आपल्या आगमनाने केवळ ज्ञानरूपी सुगंध देत रहातो. म्हणूनच ज्ञानाच्या सागरात बुडून या देहाचे केवळ चंदनच व्हावे व या जन्मी केवळ कीर्तीरूपी उरावे हेच खऱ्या साधकाचे मागणे असते. Follow
नाथपंथीय तोडगे, उपासना , वनस्पती शास्त्र, जप, साधना, भारतीय वास्तूशास्त्र नोकरी, व्यवसाय, विवाह , रुद्राक्ष, विरोधकांचा त्रास, आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी YouTube वरील खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करावा. आपला अभिप्राय कळवावा.