google336aa3038a7d075c.html

साधना = “श्री पद्मावती लक्ष्मी”

','

' ); } ?>

कृपया नोंद घ्यावी की ज्या व्यक्तीला कोणताही अध्यात्मिक दोष नसेल अशाने पुढील साधना करुन आपली स्वतःची यश प्रगती करावी हीच सदिच्छा आहे. 

मी माझ्या युट्युब मध्ये चॅनेल मध्ये आधीच गणेश साधनेचा उल्लेख केलेला असल्यामुळे पुन्हा येथे त्याचा उल्लेख करणे मी आवश्यक समजत नाही तरीसुद्धा गणपतीचे स्मरण करून आपणास पुढील साधना प्रदान करीत आहे. कृपया याचा लाभ घ्यावा.

सर्व साधना “शाबरी नाथपंथीय तंत्राद्वारे” उपस्थित आहे. 

सर्वप्रथम आपण श्री गणपतीचे स्मरण करुन, श्री पद्मावती लक्ष्मी हिच्या साधनेबाबत समजून घेऊया!

साधना = “श्री पद्मावती लक्ष्मी”

ही साधना स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतात याला कोणतीही बंधने नाहीत याची कृपया नोंद घ्यावी

स्फटिकमाळ, लाल वस्त्र, लोकरीचे लाल आसन, कपाळी कुंकूवाचा टिळा लावावा. 

सर्वप्रथम आपल्यासमोर एक चौरंग ठेवून त्यावर लाल सुती वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या मधोमध मुठभर गहू पसरून त्यावर एखादा लक्ष्मीचा फोटो किंवा कलशावर श्री फळाची स्थापना करून त्याकलशाची विधीवत पूजा करावी आपल्या उजव्या हाताला चौरंगावर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा फोटो किंवा कलशाच्या समोर श्रीयंत्र किंवा काळी हळद ठेवल्यास उत्तम!

दोन पूजेची पान त्यावर सुपारी सुट्टे पैसे असे ठेवून गणपतीचे स्मरण करून त्या सुपारीची गणेशाचे प्रतिक म्हणून पूजा करावी. 

साधनेची पूजेची वेळ ही संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान असावी. 

आपल्या आई-वडिलांना, गुरुजनांना स्मरण करून शांतचित्ताने ध्यान लावून पुढील मंत्राचा रोज दहा माळा याप्रमाणे एकवीस दिवस जप करावा. 

रोज पद्मावती लक्ष्मी साठी नैवेद्य दाखवावा. नैवेद्य साखरेपासून ते शेवयाच्या खीरी पर्यंत आपल्या यथाशक्तीप्रमाणे असू शकतो. 

मंत्र = || ॐ  श्रीं  पद्मावती  वज्राकुशीं  प्रत्यक्ष भवन्ति भवन्ति नमः ॐ ||

फलश्रुती = दारिद्र्यदोष निवारण

पूर्णाहुती = हवन, अन्नदान, वस्त्रदान, जलदान. गोदान, यापैकी काहीही यथाशक्तीप्रमाणे करावे. 

जर देवी फोटो समोर श्रीयंत्र किंवा काळी हळद ठेवली असल्यास ती आपल्या तिजोरीत ठेवावी तसेच कलश  किंवा फोटो देवघरात स्थापित करावा. गहू आपल्या घरातल्या धान्यातील गहुत मिसळावे.

या साधना काळात आपण उपवास करण्याची आवश्यकता नाही मात्र सात्विक भोजन व विचार आचरावे ही अपेक्षा.

विश्वास-श्रद्धा-संयम हि त्रिसुत्री बाळगावी यश आपल्या पदरी नक्की असेल. “आदेश”

https://www.youtube.com/channel/UCSGpvuhCARvMwzk5Q0YoC2A

Leave a Reply

%d bloggers like this: