google336aa3038a7d075c.html

ज्ञानशलाका-1

','

' ); } ?>

नमस्कार,

मी ज्ञानेंद्रनाथ नाथयोगी, माझ्या आध्यात्मिक कारकीर्दीत मी बरेच चढ-उतार पाहिलेले आहेत. स्वतःचेही आणि लोकांचेही, प्रश्न-समस्या-समाधान या सर्व प्रकरणांत सर्वसामान्य माणूस अनेक पद्धतीने होरपळला जातो हे सत्य आहे.  सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आजवर प्रत्येकाने बोटचेपीच केलेली आहे, फक्त आता गळचेपी बाकी आहे. समस्या अनेक आहेत पण समाधानासाठी ती व्यक्ती दारोदार हिंडताना मी पाहिलेली आहे. अपमान, फसवणूक, लालूच, विनयभंग, आणि वेळकाढूपणा यात गुरफटलेल्या व्यक्तींची व्यथा ऐकल्यावर काळीज पिळवटून निघते. 

हा दोष कोणाचा? अध्यात्मिक गुरु, ज्योतिष गुरु, वास्तु गुरु, मोटिवेशनल स्पीकर, आणि इतर उपदेशी किंवा स्वयंघोषित गुरू, काहीजण युट्युब-गुगल आणि इतर माध्यमातून ज्ञान प्राप्त करुन समस्या पीडित व्यक्तीला अर्ध्या हळकुंडाने अज्ञान पाजतात आणि  वेळ आणि पैसा वाया घालवतात.  शेवटी समस्याचे निराकरण करण्यासाठी तो मनुष्य आत्महत्येच्या  शेवटच्या भ्याड अवस्थेत पोहोचतो. 

माझ्या साधना काळात मी अनेक आध्यात्मिक गुरुंच्या  सदिच्छा भेटी घेतल्या. अर्थात हे सर्वजण मान्यवर होते आणि आहेत त्यात “सद्गुरु वामनराव पै” यांच्या घरी जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांच्या पत्नीने आम्हाला कोहळ्याची भजी  खाऊ घातली होती. त्या अन्नपूर्णा माऊलीचं विस्मरण कसे बरे होऊ शकते?

मी नाथपंथी आहे हे समजल्यावर सद्गुरूंनी मला जवळ घेऊन, शुभ आशीर्वाद देताना माझ्या हातात दोन पुस्तके ठेवली “तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार” आणि म्हणाले “तुझ आहे तुझपाशी” मी नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला.

गेली पंचवीस वर्षे  मी जनतेला-जातकांना-याचकांना आणि वाचकांना सदैव हेच सांगत आलो की, तुम्ही यावरील वाक्याचा मतितार्थ समजून आपल्या जीवनाचा अर्थ समजून घ्यावा. 

उपदेश करणे सोपे आहे.  बोध प्रेरित करणे, सारांश देऊन प्रेरित करणे हे ही सोपे आहे. परंतु जी व्यक्ती ज्या समस्यातून तिला शारीरिक मानसिक आणि आर्थिक पिडा होत असतात त्याचे विभाजन किंवा ते दुःख दूर करण्यास केवळ उपदेश समर्थ ठरू शकत नाही. 

संत सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी भगवत गीतेचे  निरुपण करुन “ज्ञानेश्वरी” साध्या आणि सोप्या भाषेत लिहून आज समस्त जनतेवर आजन्म थोर उपकार केलेले आहेत. त्यानंतर लोकमान्य टिळक आणि विनोबा भावे यांनी त्याचा सार संकलित करून प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 

आताचे मोटिवेशनल स्पीकर जे लोकांना एखादी गोष्ट उदाहरणार्थ देऊन त्याचा मतितार्थ आणि बोध घेऊन पॉझिटिव्ह एनर्जी कशी निर्माण करता येईल आणि आपल्या आत्मविश्वासात भर टाकता येईल याबाबत जे कार्य करीत आहेत ते प्रशंसनीय असले तरीसुद्धा ते उपचार म्हणून जातकास उपयोगी होतील याबाबत मला शाश्वती नाही. 

माझे प्रामाणिक मत आहे कि, प्रत्येकाने साधना करुन बळ मिळवावे.  हे बळ मनाचेआहे आणि या तुमच्या शरीरातल्या परमेश्वराला बळकटी मिळाली तर कोणत्याही देवळात किंवा कोणत्याही गुरूकडे याचना करण्याची वेळ येणार नाही. आताच तरुण वर्ग सभेला उपस्तिथ मोठ्या संख्येने असतो पण त्या उपदेशी वक्त्याचा त्यांच्या मनावर आणि आचरणावर सकारात्मक परिमाण होत आहे का? या बाबत संभ्रम आहे. 

अध्यात्मिक मार्ग हा खूप प्रगल्भ आहे त्यात साधना-सिद्धी-ध्यान धारणा-नामस्मरण-उपासना आणि तांत्रिक विधी उपलब्ध आहेत.  कोणतीही क्रिया करण्याअगोदर मेडिटेशन म्हणजेच ध्यानधारणा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपण ध्यान बिंदू-ज्योत-सूर्य-श्वास इत्यादींवर त्राटक करुन ध्यानाद्वारे स्वतःच्या मनाला बळकटी देऊन पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करू शकता. 

पुढील भागात मी अनेक “शाबरी गुप्त साधना” आपणास सोप्या-सरळ भाषेतील क्रिया सांगणार आहे.  या साधना करताना कोणतीही किचकट गुंतागुंत किंवा खर्चिक बाब नसावी असा माझा मानस हेतू असल्याने साध्या आणि सोप्या साधना शिकवण्याचा आणि मार्ग दाखवण्याचा प्रयत्न मी पुढील भागापासून करणार आहे. 

YOUTUBE CHANNEL

Leave a Reply

%d