google336aa3038a7d075c.html

तंत्रशास्त्र “बगलामुखी देवी ” साधना

','

' ); } ?>

तंत्रशास्त्र साधनांसाठी दशमहाविद्यांमध्ये “बगलामुखी देवी” ची साधना अत्यंत प्रभावी आहे.

तंत्रशास्त्रातील सर्वात जास्त महत्वपूर्ण आणी प्रचंड शक्तिमान अशी हि देवी आहे. बगलामुखी देवीचे दुसरे नाव ‘ब्रम्हास्त्र’ असे आहे. आपल्यावर किंवा आपल्या घरावर कोणीतरी काळी विद्या केली आहे असे ज्या लोकांना असे वाटत असते, तर त्यांनी दररोज रात्री 12 वाजता या देवीचे भगवती कवच धारण करून तिचा मंत्रजप 108 वेळेस केले तर सर्व प्रकारचा त्रास नष्ट होऊ शकतो. जर आपल्याला विरोधकांच्या कटकारस्थानाने विनाकारण त्रास होत असेल, अशा ज्ञात-अज्ञात हितशत्रुचा बिमोड होतो. अजात शत्रु असला तरी त्याचे काहीच चालत नाही, उलट त्याच्यावरच पलटवार होऊन त्यास देवी शिक्षेस पात्र ठरवते. आणी त्यांच्यावर संकटे येतील.आपण ज्ञानयप्रविष्ठ असल्यास हमखास कोर्टाचा निकाल तुमच्या बाजुने लागेल.या देवीची पुजा करण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गृहस्थाश्रमी लोकांनी करावयाची देवीची पुजा व आराधना आणी दुसरा मार्ग म्हणजे तांत्रिक लोकांनी करावयाची देवीची पुजा व आराधना.तांत्रिक लोकाची तांत्रिक कामांसाठी, तांत्रिक क्रियेमध्ये थोडी जरी चुक झाली तर मात्र तांत्रिक क्रिया करणारावर याचे भयानक परिणाम होतात.संसारी लोकांनी देवीचा एक फोटो आणून घरात लावावा. आंघोळ झाल्यावर फोटोची पुजा करून देवीला हळद कुंकू वाहुन देवीचे कवच धारण करून देवीचा मंत्रजप दररोज नऊ वेळेस करावा. नंतर देवीला नैवेद्य दाखवावा. मनात भक्तीभाव ठेऊन देवीला प्रार्थना करावी. देवीला पिवळे फुल आणी पिवळे वस्त्र अर्पण करावे.

मंत्र – ॐ ह्रीं बगलामुखी सर्वदुष्टानां वाचं मुखं पदं स्तंभय जिव्हां कीलय बुद्धिं विनाशाय ह्रीं ॐ स्वाहा.

साधन – लाल लोकरीचे आसन, रुद्राक्ष माळ, अष्टगंध, भगवती कवच, देवीचा फोटो, रक्षक वनस्पति इतके जरी दररोज न चुकता केले तरिही देवीच्या शक्तीचा अनुभव येत राहील. तुम्हाला विनाकारण त्रास देणारे शांत होतील. तुमच्या विरोधात कटकारस्थान करणारांचे काहीच चालणार नाही. तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर कितीही शक्तीशाली तांत्रिकाने काळी विद्या केली तरी तुमचे काहीच नुकसान न होता उलट तो तांत्रिक परत कधीच कुणावर काळी विद्या करू शकणार नाही. कारण बगलामुखी देवीची पुजा करणाऱ्या भक्ताला सदैव सुरक्षित ठेवते. या पूजा व साधना केल्याने बगलामुखी देवीचे संरक्षण वलय तयार होते.बाहेर जाताना रक्षक ( तांत्रिक ) वनस्पति सोबत बाळगावी.

✳️ ( इथे मी नमूद करू इच्छितो की मी हे लिखाण केवळ माझे अनुभव म्हणून या व्यासपीठावर मांडत आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही केवळ जे वास्तव व श्रद्धा सबुरी वर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी कदाचित माझे हे लिखाण मार्गदर्शनाचे कार्य करू शकेल असा विश्वास वाटतो. ) ✳️

Leave a Reply

%d bloggers like this: