google336aa3038a7d075c.html

विवाह साठी गणपतीचे तोडगे व मंत्र

','

' ); } ?>
Image by rajesh koiri from Pixabay

तोडगे…..

विवाह साठी गणपतीचे तोडगे व मंत्र

श्री गणेश अथवा गणपतीला मंगलमूर्ती असेही नाव आहे आणि ते नाव यथार्थ आहे. कारण तो गणेश म्हणजे मंगल करणारा – साक्षात मंगलतेची मूर्ती आहे. कोणत्याही कार्यातली विघ्ने दूर करून ते कार्य पूर्ण करून देणार आहे. तेव्हा तो लग्नात विवाहात येणारी विघ्ने दूर करील, विवाह…ठरण्यात, जमण्यात, होण्यात, येणारे अडथळे निवारण करील यात काय शंका ? त्याची सेवा कोणत्याही प्रकारे केली, तरी विवाहात येणारे अडथळे दूर होतील व विवाह ठरून पारही पडेल, हे निश्चित तरी त्यापैकी आपण गणपतीचे काही मंत्र व तोडगे आता पाहू.

  • संकष्टी चतुर्थी करावी — या तोडग्याला कोणत्याही संकष्टी चतुर्थी पासून सुरुवात करावी. मात्र दिवसभर मीठ खाऊ नये. अळणी उपवास करून रात्री उपवास सोडताना देखील त्यात (भोजनात) मीठ नसावे. उपवास सोडण्याआधी एकवीस वेळा श्री गणपती अथर्वशीर्ष वा श्री गणेश स्तोत्र म्हणावे. नंतर गणेशाची पूजा करून विवाहाबद्दल प्रार्थनाही करावी. हा उपाय करताना सोबत गणेश कवच धारण करून, विघ्नहर्ता धुपकाडी याचा वापर करावा. तसेच भ्रूमध्यावर मोहन तीलक लावावे.
  • रोज सकाळी बारा वाजण्याच्या आत गणपतीच्या कोणत्याही देवळात जावे. गणेशाचे दर्शन घेउन त्याला, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. पहिल्या दिवशी त्याला अभिषेक करावा. पूजा करावी, हा तोडगा विवाह होईपर्यंत दररोज अखंडपणे करावा. मंदिरात जाणे अभिषेक करणे शक्य नसल्यास स्फटिक गणेश, पारद गणेश मूर्ती घेऊन त्यावर अभिषेक करावा. ( जमल्यास प्रभावी कवच परिधान करावे.)
  • कोणत्याही गणेश मंदिरात अथवा आपल्या घरात स्फटीक अथवा पारद मूर्तीवर 21 दिवस रोज एकवीस वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. पहिल्या दिवशी संकल्प करून अभिषेक व पूजा करावी प्रार्थना रोज करावी.
  • बुधवारचे व्रत करावे. प्रथम संकल्प सोडून कोणत्याही बुधवारी हे व्रत सुरु करावे. एक चांदीचे छोटेसे ताट-ताटली घ्यावी. (ताम्हण घेऊ नये). त्यात कुंकवाने कींवा लाल चंदनाच्या गंधाने स्वस्तिक काढावे. त्या स्वस्तिकावर गणपतीची स्फटीक अथवा पारद मूर्ती ठेवावी. या मूर्तीची पूजा षोडषोपचारे करावी. त्यावेळी 108 दुर्वा गणपतीला एका वेळी एक दुर्वा याप्रमाणे वाहाव्या. प्रत्येक दूर्वा वहातांना गणपतीचा “ओम गं गणपतये नमः” हा मंत्र अथवा “गणेश अष्टोत्तर शतनामावली” म्हणून दूर्वा वाहाव्यात. नंतर आरती करून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. बुधवारी दिवसभर उपवास करावा. मीठ दिवसभर खाऊ नये. फळे, दूध व थंडपेय घेतली तरी चालतात. याप्रमाणे व्रताचरण विवाह ठरेपर्यंत चालू ठेवावे.
  • गणेश नवग्रह पूजन – एक चौरंग घ्यावा. पूजेच्या जागी साफसफाई करून रांगोळी वगैरे काढून ती जागा सुशोभित करून, तेथे चौरंग ठेवावा. त्या चौरंगावर लाल कपडा घालावा. हे कापड शक्यतो नवे असावे, नवे शक्य नसेल तर स्वच्छ धुऊन नीट वाळवलेले असावे. त्यावर गणपतीची एखादी मूर्ती ठेवावी. या गणेशाच्या मूर्तीच्या पुढील बाजूस नवग्रह म्हणून 9 सुपार्‍या ठेवाव्यात. तसेच एक कलश ठेवावा, त्यात पाणी भरून ठेवावे. आणि त्याच्या तोंडाशी आंब्याची पाच किंवा सात पाने व एक नारळ उभा ठेवावा. यानंतर कलश नवग्रह आणि गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करून षोडशोपचार पूजा करावी. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मग संकल्प करावा, (येथे स्वतःच्या नावाचा उच्चार करा.) नाम्न शीघ्र विवाह सिद्ध्यर्थे गणपती देवता प्रीत्यर्थे मंत्रजपम करीष्ये | संकल्प करताना पळीभर पाणी, थोडे तांदूळ / अक्षता , हळकुंड , सुपारी व तांब्याचे किंवा कोणतेही एक नाणे हे सर्व तळहातावर घेऊन वरील प्रमाणे संकल्प करताना पळीभर पाणी, थोडे तांदूळ अक्षता हळकुंड सुपारी व तांब्याचे किंवा कोणतेही एक नाणे हे सर्व तळहातावर घेऊन वरील प्रमाणे संकल्प विचारल्यानंतर पाण्यासह त्या सर्व वस्तू ताम्हणात घेऊन घ्याव्यात. नंतर तीन वेळा आचमन करावे. मग गणेशाच्या खालील मंत्राचा जप करावा.
  • ओम श्री गणेशम् वीघ्नेश वीवाहार्थे ते नम: l किंवा सालंकृत कन्या मे देही नमस्तयै गणेशाय नमः l या मंत्राचा जप रोज 108 एवढा विवाह ठरेपर्यंत करावा.
  • गणेश पुराण या ग्रंथातील अध्याय 109 ते 125 अखेर नित्य वाचावे. हे अगदी अशक्य असेल, तर 109 वा अध्याय आणि 125 वा अध्याय तरी वाचावा . हेही शक्य नसेल तर 125 वा अध्याय रोज वाचावा.
  • मुद्गगल पुराण या ग्रंथातील सहाव्या खंडातील 40 आणि एकेचाळीसावा अध्याय वाचावा.
  • प्रेमविवाह होण्यामध्ये काही अडथळे येत असतील किंवा अन्य कोणत्याही कारणाने विवाह जुळत नसेल, तर टिटवाळा येथील गणेशाचे दर्शन घेण्यास जावे. तेथे त्याची जमेल तशी सेवा करावी. शिवाय विवाह होऊन पुढे काही कारणाने संबंध दुरावल्यास ह्या गणेशाची सेवा करावी. मंगळ पीडा असलेल्यांचे विवाह याच्या दर्शनाने वा सेवेने होतात. या गणपतीचे नावच वर विनायक किंवा विवाह विनायक आहे. (टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा – ठाणे येथे आहे.)
  • अष्टविनायक यात्रा करावी, आणि प्रत्येक ठिकाणी विधिवत पूजा, अभिषेक वगैरे करून मनापासून विवाह साठी प्रार्थना करावी. नंतर विवाह होईतो रोज एकदा तरी अष्टविनायकाचे स्मरण करून प्रार्थना करावी. त्याचे दर्शन घ्यावे. (अष्टविनायकाच्या फोटोचे चित्राचे).
  • कोणत्याही गुरुवारी पुनर्वसु नक्षत्रावर रात्री बारा वाजता आंघोळ करून श्री गजानन महाराजांची पूजा करून संकल्प करून श्री गजानन विजय पोथी चा एक अध्याय वाचावा. त्यानंतर रोज एक अध्याय वाचावा. जोपर्यंत विवाह ठरून पूर्ण होत नाही, तोपर्यंत पारायणे करीत रहावे. विवाह झाल्यानंतर शेगावी जाऊन झुणका भाकर व हिरव्या मिरच्यांचा नैवेद्य महाराजांना दाखवावा. महापूजा करुन संकल्प पूर्ण करावा.
  • विवाह त्वरित होण्यासाठी श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 28 व्या अध्यायाचे पारायण लग्न होईपर्यंत अखंडित चालू ठेवावे. कोणत्याही रविवारी, मंगळवार, गुरुवार या वारी शुभ नक्षत्र असताना शुभ मुहूर्तावर हे पारायण सुरु करावे हे पारायण सुरु करावे. हे पारायण करताना प्रथम गणपती, शंकराचे, व दत्ताचे पूजन करावे.
  • गोरक्ष जालंदर चर्पटाश्च l अडबंगकानिफ मच्छिंन्दराद्या : l चाैरंगी रेवाणक भर्तरी संज्ञा l भूम्यां बभूर्वनवनाथ सिध्दा: ll

वरील श्लोक 21 वेळा म्हणून माझा विवाह त्वरित होण्यासाठी मी हा पाठ वाचण्यास सुरुवात करीत आहे. त्यात मला यश मीळू दे. अशी अंत:करणापासून प्रार्थना करून नवनाथांना नमस्कार करावा. गुलाबाचे अथवा चाफ्याचे फूल दत्ताच्या फोटो पुढे ठेवावे व अध्याय वाचण्यास सुरुवात करावी. विवाह पूर्ण झाल्यानंतर नऊ जणांना जेवू घालावे. त्यांना यथोचित दक्षिणा द्यावी व त्यांना नमस्कार करुन त्यांचा आशीर्वाद घ्यावा.

Navgraha Locket

Navgraha Locket Diminishes all malefic effects of planetary stars and provides mental peace and harmony..

$20.00

Tips …..

Ganpati’s solutions and mantras for the marriage

Shri Ganesh or Ganapati is also known as Mangalmurti, and that name is real. Because Ganesha is the doer of good deeds – in reality, he is the idol of goodness. It will complete the task by removing the obstacles in any work. So, he will remove the barriers that come in marriage, marriage, or the obstacles that come in settling, settling, and becoming, what is the doubt? No matter how you serve him, the marriage barriers will be removed, and the marriage will be over, but we will see some of Ganapati’s mantras and solutions.

  • Sankashti Chaturthi – This settlement should start from any Sankashti Chaturthi. But do not eat salt throughout the day. There should be no salt in the meal even after breaking the fast at night by weeding. Before breaking the fast, recite Shri Ganapati Atharvashirsha or Shri Ganesh Stotra twenty-one times. Then worship Ganesha and pray for marriage. While doing this remedy, you should wear Vighnaharta Dhupkadi by wearing Ganesh Kavach. Also, apply Mohan Tilak on the eyebrows.
  • Go to any temple of Lord Ganesha every morning before noon. After taking darshan of Ganesha, offer him jaggery coconut. He must be anointed on the first day. Worship should be done; this settlement should be done continuously every day until marriage. If it is impossible to go to the temple and perform anointing, one should take crystal Ganesha, Parad Ganesha idols, and anoint them (Effective armor should be worn when assembled.)
  • In any Ganesha temple or your house on a crystal or mercury idol, say Ganesha Atharvashirsha twenty-one times a day for 21 days. On the first day, resolve and perform anointing and worship. Pray daily.
  • Fast on Wednesday. This fast should be started on any Wednesday except the first Sankalp. Take a small silver plate. (Taman should not be taken). Remove the swastika with the smell of Kumkum or red sandalwood. Place a crystal or mercury idol of Lord Ganesha on that swastika. This idol should be worshiped. At that time, 108 Durvas should be flown to Ganapati one Durva at a time. Ganesha’s mantra “Om Gan Ganapatiye Namah” or “Ganesha Ashtottar Shatnamavali” should be recited to every Durva Vahat. Then perform Aarti and show the offering of jaggery coconut. Fast all day on Wednesday. Salt should not be eaten throughout the day. Fruits, milk, and soft drinks work well. Thus Vratacharan should continue till marriage.
  • Ganesh Navagraha Pujan – Take a chowing. The place of worship should be cleaned, rangoli etc. should be removed, and the site should be decorated. Put a red cloth on that square. This cloth should be as fresh as possible; if not new, it should be washed and dried correctly. An idol of Lord Ganesha should be placed on it. On the front side of this Ganesha idol, nine superstars should be set as Navagraha. Also, keep a Kalash, fill it with water. And put five or seven mango leaves and coconut in his mouth. After this, Kalash Navagraha and Ganesha should be duly installed, and Shodshopchar Pooja should be performed. Modak’s offering should be shown. Then make a Sankalpa (pronounce your name here.) Namna quick marriage Siddhyarthe Ganapati Devta Preityarthe Mantrajapam Karishye | While making Sankalp, take a handful of water, a little rice / Akshata, turmeric, betel nut, and copper or anyone coin on the palm of your hand. All those things should be taken into consideration. Then infuse three times. Then chant the following mantra of Ganesha.
  • Om Shri Ganesham Vighnesh Vivaharthe te Nama: l or Salankrut Kanya May Dehi Namastai Ganesha Nama: l This mantra should be chanted daily till 108 marriages.
  • Chapters 109 to 125 of the book Ganesh Purana should be read regularly. If this is impossible, read Chapter 109 and Chapter 125 at least. If this is not possible, read Chapter 125 daily.
  • Read the 40th and 41st chapters of the sixth volume of the Mudgagal Purana.
  • If there are any obstacles in the way of love marriage or if the wedding does not match for any other reason, then one should go to Titwala to pay obeisance to Ganesha. He should be served there as much as he can. Moreover, if you get married and break up for some reason, you should do this Ganesha. Its darshan or service performs marriages of those who suffer from Mars. The name of this Ganapati is Vinayak or Vivah Vinayak. (Titwala taluka is in Kalyan district – Thane.)
  • Ashtavinayak Yatra should be done, and every place should be duly worshiped, anointed, etc., and sincerely prayed for marriage. Then the wedding takes place. Pray in remembrance of Ashtavinayaka at least once a day. Could you take a look at it? (Photo of Ashtavinayaka).
  • On any Thursday, after bathing at Punarvasu Nakshatra at midnight, worship Shri Gajanan Maharaj and resolve to read a chapter of Shri Gajanan Vijay Pothi. Then read one chapter daily. As long as the marriage is not consummated, it should be continued. After marriage, go to Shegavi and show the offering of Zhunka bread and green chilies to Maharaj. Sankalpa should be completed by performing Maha Puja.
  • The parayan of the 28th chapter of Shri Navnath Bhaktisar should be continued till the wedding takes place to speed up the marriage. This Parayan should be started on any Sunday, Tuesday, Thursday when there is an auspicious constellation. While doing this parayan, first worship Ganapati, Shankara, and Datta.
  • Goraksh Jalhandhar Charpatashch l Adbang kanif Machhindradhya: l Chaurangi Rewanak Bhartari sagnya l Bhumyam Babhurvanvanath Siddha ll

I am starting to read this lesson to speed up my marriage as the above verse 21 times. Let me succeed in that. Navnath should be greeted by praying from such a heart. Put a rose or chaff flower next to Datta’s photo and start reading the chapter. After the marriage is over, nine people should be fed. Give them a proper Dakshina and greet them and bless them.

विघ्नहर्ता धुपकाडी

Vignaharta Dhoop Kandi Daily use of one stick per day gives you mental peace and calm. removes all obstacles in your success.

$3.00

Leave a Reply

%d bloggers like this: