चांगल्या च्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात
Reality-सत्य अनुभव-49
सत्य अनुभव
2016 साली सातारा येथे राहणारे, श्री देशपांडे माझ्या भेटीस आले. त्यांची समस्या अशी होती की, भाऊबंदकी मधील जमिनीची वाटणी होऊन देखील त्यांचे भाऊ, देशपांडे यांच्याशी नीट वागत नव्हते. जमिनीत येणारे उत्पन्न सर्व स्वतः घेत होते. जमीन ही देशपांडेच्या नावे होती. तसेच देशपांडे यांच्या मोठ्या मुलाला दारूचे व्यसन लागले होते, त्याच्या अंगावर कोड उठले होते. जो व्यवसाय ते करीत त्यात अपयश, फसवणूक मिळत होती. वरील सर्व उपायांवर त्यांना मार्ग हवा होता. देशपांडे यांची माहिती पाहिल्यावर माझ्या असे लक्षात आले, त्यांना प्रखर पितृनाग दोषाने वेढलेले आहे. तसेच राहत्या वास्तुत देखील दोष होता. मुलावर बाहेरच्या क्रिया देखील झाल्या होत्या. ही सर्व माहिती मी देशपांडे यांना सांगितली. त्यांना ती तंतोतंत पटली.
त्यांनी जवळची तारीख ठरवून सातारा येथे हवन करण्याचे मला सांगितले. हवनाच्या एक दिवस आधी आम्ही सातारा येथे गेलो.
देशपांडे यांनी आमची राहण्याची उत्तम सोय केली होती. आदल्या दिवशी त्यांच्या वास्तूचे परीक्षण केले. वास्तूत बरेच दोष होतेच, त्यांचा मुलगाही विचित्र पद्धतीने वागत होता व रागाने आमच्याकडे पाहत होता. त्या रात्री मी झोपलोच नाही. सकाळी लवकर उठून देशपांडे यांच्या घरी गेलो. वास्तूचे नजर दोष काढून, नवनाथ याग केला गेला. वास्तूचे चार कोपरे विशिष्ट वनस्पतीने बांधून घेतले. घराच्या संरक्षणासाठी वनस्पती देण्यात आली. त्यांच्या मुलावरून देखील नजर दोष काढून, त्याला त्याच्या स्वरक्षणासाठी सिद्ध कवच धारण करण्यास दिले. पितृयागासाठी मुलगाही हवनास बसला.

घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन चांगली ऊर्जा निर्माण झाली होती. हवन कार्यामध्ये बरेच चांगले संकेत मिळत होते. नागदोष दूर करण्यासाठी, त्यांना सिद्ध बारा नागाचे छाप देण्यात आले व हे छाप दर अमावस्येला एकेक करून मुलांनी स्वतः वरून ओवाळून वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याचा सल्ला दिला गेला. तसेच त्याच्या दारूच्या व्यसनमुक्तीसाठी आयुर्वेदिक औषध दिले. सोबत सोनीका गुटीचा वापर घरातील सर्व लोकांना करण्यास सांगितले. देशपांडे यांना जमीन विकण्यास सांगितली. त्यांना विशिष्ट असे तोडगे सुचविले व मी तेथून निघालो.
90 दिवसांनंतर मुलाचे कोड हळूहळू कमी होऊ लागले, दारूचे व्यसन कमी झाले होते. गावची शेतीची जागा विकून पैसे ही बँकेत ठेवले. देशपांडेंना हळूहळू फरक जाणवत होता. एक वर्षानंतर मुलाचे लग्न झाले. व पुढे तो वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागला. आजवर अनेक लोकांच्या समस्या नाथ कृपेमुळे व यजमानांच्या विश्वासामुळे त्यांना शंभर टक्के यश मिळालेले आहे. काही लोकांना त्वरित यश मिळते. तर काहींना उशिरा !
पण नाथ कृपेचा प्रसाद हा निश्चितच प्राप्त होतो.
श्रद्धा सबुरी ठेवावी.
“शुभम भवतु”
True experience
In 2016, Mr. Deshpande, who lives in Satara, came to visit me. His problem was that even though the land in Bhaubandaki was divided, he did not treat his brother Deshpande properly. The income coming into the area was all taking its own. The property was in Deshpande’s name. Also, Deshpande’s eldest son was addicted to alcohol and had a code on his body. The business he was doing was a failure, a fraud. They wanted a way out of all the above. When I saw Deshpande’s information, I realized that he is surrounded by intense patriarchal guilt. There was also a defect in the existing architecture. Outside actions were also taken on the child. I told all this information to Deshpande. They agreed with her.
He told me to set a date for the havan at Satara. A day before Havana, we went to Satara.
Deshpande had arranged our accommodation very well and inspected their building the day before. There were many faults in Vastu; his son was also behaving strangely and looking at us angrily. I never slept that night. We got up early in the morning and went to Deshpande’s house. Vastu’s eye was removed, and Navnath Yag was performed. The four corners of the building were covered with unique vegetation. Plants were provided for the protection of the house. He also removed the eye defect from his son, allowing him to wear a proven shield for his self-defense. The son also sat in Havanas for the patriarchy.
The negative energy in the house was gone, and good energy was created. Havan was getting a lot of sound signals at work. To remove the nagdosh, they were given the impression of Siddha Bara Naga, and the children were advised to immerse themselves in the flowing water by waving the imprint one by one every new moon. He also gave Ayurvedic medicine for his alcohol detoxification. Along with that, Sonica asked everyone in the house to use Guti. Deshpande was asked to sell the land. I suggested to them specific solutions, and I left.
After 90 days, the child’s code gradually began to decline; alcoholism had subsided. He sold the farmland of the village and kept the money in the bank. Deshpande slowly realized the difference. The boy got married a year later. He later took over his father’s business. To this day, many people’s problems are due to the grace of Nath and the hosts’ faith. Some people get instant success. But some late!
But the gift of Nath’s grace is received.
Shraddha Saburi should be kept.
“Shubham Bhavatu”

Lakshmi Dhoop Kandi
It's users never suffer any financial shortages and problems
$3.00