google336aa3038a7d075c.html

सोहम साधना

','

' ); } ?>
प्रथम गुरूंकडून दीक्षा मिळाल्यावर जो काही मंत्राचा आपण उच्चार करितो त्या लहरी उपांशु, वाचिक, मानसिक इत्यादी स्वरूपातून सभोवतालच्या वातावरणात स्थिरावतात. आपल्या उघड्या डोळ्यांनी न दिसणार्‍या गोष्टी आपल्या आसपास वावरत असतात. काहीनां समजते तर काही समजून सुद्धा केवळ अज्ञानापोटी टाळण्याचे पाहतात. मंत्र उच्चारांची अजपाजपात होते. तेव्हा मी मागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक चक्रातील बीज अक्षरावर त्याचा परिणाम होऊन प्रत्येक चक्र जागृत होण्याच्या मार्गावर असते.
।। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः।।
त्या अगोदर कुंडलिनी जागृतीचे प्रमुख लक्षणे समजावून घेऊ.
 • दोन्ही डोळ्यांची बुबुळे डोळे बंद स्थितीत आपल्या आज्ञेशिवाय गरागरा फिरू लागतात.
 • अंगाला सुई टोचल्याप्रमाणे शरीरातील कोणत्याही भागात कोणत्याही वेळी किंवा एकाच वेळी शरीरात अनेक ठिकाणी हा प्रकार होऊ शकतो.
 • आपली डावी व उजवी मांडी अलगद वर उचलली जाणे व शरीर जमिनीपासून तीन ते पाच इंच वर उचलले जाणे.
 • पक्षाप्रमाणे शरीर फडफडायला लागणे.
 • शरीराला हळूवार किंवा जोरात झटके बसणे, ते आवरण्याच्या पलीकडेही जाणे.
 • शरीर नागाप्रमाणे डोलायला लागते.
 • ब्रह्मरंध्रापासून व इतर शरीराच्या कोणत्याही भागावर कोणीतरी हळुवार फुंकर घालतो आहे. अथवा हळूवार बोट फिरवतो आहे अशी जाणीव होणे.
 • नागाच्या फुत्कारण्याचा आवाज येणे.
 • भ्रुमध्यावर निरनिराळी देवी-देवतांची, साधुसंतांची व इतर श्रीक्षेत्रांची चित्रफित दिसणे.
 • कानात नाना प्रकारे आवाज व अनेक नाद ऐकायला मिळणे.
 • आपल्याच नावाची हाक आपल्याला आतून कोणीतरी देतोय असे उमगणे.
 • अतिशय क्रोध, शांती, मद, मत्सर, काम, लोभ, निरागस, बेचैन, रडु लागणे यापैकी एकाची ओढ लागणे. काहीजण चक्क नाचू लागतात.
 • स्वतः स्वतः पासून अलिप्त होऊन समोरासमोर बस्तान होणे.
 • दुर्गंध वा सुगंध याची परिणिती होणे.
 • आपल्यास मंत्रोच्चाराचा प्रतिध्वनी ऐकू येणे.
 • डोळ्यासमोर तेजोमय गोळा अथवा आकाशातील चांदण्याप्रमाणे बिंदू स्वरूप चमकताना दिसणे. कधीकधी जागेपणीही बाब घडू शकते. शुभ्र पांढर्‍या रंगापासून ते थेट लाल-निळ्या रंगाप्रमाणे बिंदू चमकताना दिसणे.
 • कोणत्यातरी अज्ञात शक्तीची चाहूल आपल्या बैठकीच्या आजूबाजूला जाणवणे.
 • शरीर कधी महाकाय तर कधी अतिसूक्ष्म, तर कधी धड व डोके यात फारकत जाणवणे.
 • बैठकीत आपण आपल्या खोलीत सर्व भिंतीवर प्रवास करतोय असे जाणवणे.
 • आपोआप दिशा बदलली जाणे ( बैठकीची ).
 • शरीरातील कोणत्याही भागातील नसा सौम्य व अतिप्रमाणात उडू लागणे.
 • साधक स्थिर आसनाने बसून जप, ध्यान करीत असेल तर त्याचे बाह्य ज्ञान काही काळाने आपोआप बंद होते व केवळ कुंभक तयार होतो.
 • साधक स्थिर आसनाने ध्याना अवस्थेत असता कुंडलिनी जागृत झाली असता, चक्रांचे ठिकाणी बारीक कंप होऊन तो कंप वर वर जात आहे. अशा संवेदना होतात.
 • ध्यानात अचानक प्रणवाचा ओम जप चालू होतो व तो आपल्याला स्पष्ट ऐकू येतो.
 • ध्यानावस्था घेतली असता काही वेळात डोळे जड होतात. बाह्य ज्ञान नाहीसे होते. मन शांत होते, शरीरातून गरम प्रवाह वाहत असल्याचा भास होतो व शरीर गरम होते.
 • ध्यानावस्था घेतली असता काही वेळा मेरुदंडात कंप होतो व शरीराचे भान हरपते.
 • काही वेळा प्राणायाम आपोआप चालू होतो व सुगंधी वास येतो.
 • शरीर कधी जड होते. सुन्न होते, देह भान राहात नाही, काही आवाज ऐकू येतात.
ज्ञानेंद्रनाथ
साधकहो, याही पलीकडे आपल्याला अनुभव येऊ शकतात. मला व माझ्या गुरु-शिष्यानां असे अनेक अनुभव येत असतात.

Soham Sadhana

After receiving initiation from the first Guru, whatever mantras we chant are fixed in the surrounding environment in whimsical, verbal, mental, etc. Things that are invisible to the naked eye are all around us. Some understand, some even try to avoid ignorance. Mantra utterances are ajapajpat. So as I said earlier, the seed in each chakra is affected by the letter, and each chakra is on the way to awakening.

Before that, let us explain the main symptoms of Kundalini awakening.
 • The iris of both the eyes starts spinning without your command in the closed position.
 • It can occur in any part of the body at any time or in many places in the body simultaneously as a needle is inserted into a limb.
 • Lifting your left and right thighs apart and lifting the body three to five inches off the ground.
 • The body flutters like a party.
 • Slow or jerking of the body, going beyond the covering.
 • The body starts moving like a snake.
 • Someone is applying a gentle puff from the Brahmarandhra and any other part of the body. Or the realization that the finger is moving slowly.
 • The cooing of a snake.
 • Video of various deities, saints, and other Shrikshetras appearing on the brow.
 • I hear various sounds and sounds in different ways in the ears.
 • Feeling we have ‘Run out of gas’ emotionally.
 • Excessive anger, peace, lust, jealousy, lust for work, greed, innocence, restlessness, crying. Some people start dancing.
 • Being detached from oneself and confronted face to face.
 • It is resulting in odor or fragrance.
 • You can hear the echo of the mantra.
 • A bright ball in front of the eyes or a dazzling sight like the moon in the sky. Sometimes waking up can also be a matter of time, from white to white to reddish-blue dots.
 • You are feeling the presence of some unknown force around your meeting.
 • Sometimes the body is enormous, sometimes very subtle, sometimes the difference between the body and the head.
 • In the meeting, you feel like you are traveling all over the wall in your room.
 • Automatic change of direction (of the chanting).
 • Nerve damage to any part of the body.
 • If the seeker is sitting in a stable seat chanting and meditating, then his external knowledge automatically shuts off for some time, and only Kumbhak is formed.
 • When the seeker is in a meditative state with a fixed asana, the Kundalini is awakened, there is a slight vibration in the place of the chakras, and it is going up on the wave. Such sensations occur.
 • Suddenly Pranav’s Om chanting starts in meditation, and we can hear it.
 • The eyes get heavy at times while meditating. External knowledge disappears. The mind calms down, the body feels hot, and the body heats up.
 • While meditating, sometimes the spine vibrates, and the body loses consciousness.
 • Sometimes pranayama starts automatically and smells good.
 • The body was ever substantial. There is numbness; the body is not conscious; some sounds are heard.
Seekers, you can experience beyond this. I and my guru-disciples have many such experiences.

सोहम साधना सी.डी

या ऑडियो सी.डी. द्वारे सोहम साधनेचे योग्य मार्गदर्शन ज्ञानेंद्रनाथांनी केले आहे.

$1.00

Leave a Reply

%d bloggers like this: