google336aa3038a7d075c.html

गणेश रिद्धी-सिद्धी याग

','

' ); } ?>

गणेश रिद्धी-सिद्धी याग

गणेश देवता चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. सर्व गणांचा प्रमुख आहे. जीवनात यश मिळण्यासाठी, कुटुंबास सुख, शांती, समृद्धी, उत्तम, आरोग्यासाठी गणपती रिद्धी-सिद्धी दैवता प्रसन्न करून वर विजय प्राप्त करण्यासाठी गणेश रिद्धी सिद्धी याग केला जातो.

प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंद हा गणरायाच्या कानाइतका विशाल व्हावा. आयुष्य गणेशाच्या सोंडेइतके लांब असावे, आयुष्यातील क्षण मोदका सारखा गोड व्हावे, यासाठी गणरायाला वंदन करून नतमस्तक होऊन हात जोडून विनायकाला आपल्या विघ्नांचे निवारण होण्यासाठी, यशासाठी रिद्धी सिद्धी दैवतेला मान देऊन तिची खणा-नारळाने ओटी भरून गणेशप्रिय वनस्पतीच्या व हव्याष्य पदार्थांचा होमहवनात वापर करून, विशेष सिद्ध, गुरु मंत्राद्वारे या दैवतेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा याग केला जातो.

रिद्धी सिद्धी या गणेशाच्या पत्नी आहे. जर आपण गणेशाची पूजा विधिवत मनोभावे केल्यास रिद्धी सिद्धी प्रसन्न होऊन घरात सुख, शांती, मुलांना उत्तम बुद्धीमत्ता प्राप्त होण्यास मदत होते. वैभव प्राप्ती प्रतिष्ठा वाढते.

रिद्धी म्हणजे बुद्धी शुभ तसेच सिद्धी म्हणजे अध्यात्मिक शक्तीची पुर्णता म्हणजेच लाभ. म्हणून घराच्या प्रवेशद्वारावर शुभ लाभ लावतात. जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जेचा स्तोत्र रहावा. म्हणूनच गणेश रिद्धी सिद्धी याग केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी, बौद्धिक व व्यावसायिक क्षेत्रात यश, संपन्नता, भरभराट त्या घरात प्राप्त होते.

✍️ रत्नागिरी येथे राहणारे, श्री देसाई पतपेढी येथे कामाला होते. अनेक वर्षे सेवा केली, परंतु दोन वर्षांपूर्वी त्यांच्या विरोधकांनी श्री देसाई यांना 50 लाखाच्या कर्ज प्रकरणात अडकवले. परिस्थितीजन्य पुरावे त्यांच्या विरोधात होते. बरेच प्रयत्न करून झाले, फायदा होत नव्हता. आपल्या प्रामाणिकपणाचा लोकांनी गैरफायदा घेतला आहे. आज आपल्या पाठीशी कुणीच नाही. परंतु त्यांची देवावर अपार श्रद्धा होती. दरमहा सोहम भगवती मासिक ते वाचत म्हणून त्यांनी मला संपर्क साधून, आपणच या समस्येचे निराकरण करू शकता असा मला विश्वास आहे.

त्यांनी याबाबत त्यांच्या गावच्या दैवतेकडे कौलही घेतला व रत्नागिरीहून त्वरित माझ्या भेटीस आले. श्री देसाई मुंबईतच आपल्या भावाकडे थांबून, दुसर्‍या दिवशी माझ्या भेटीसाठी माझ्या कार्यालयात आले. श्री देसाई यांचे प्रश्न पाहिल्या वर नाथां कडून उत्तर आले होते की, गणेश रिद्धी सिद्धी याग करावा. तसेच गणेशाचे दररोज विशिष्ट वेगळ्या पद्धतीने पूजन करावे. एखाद्या गणेश मंदिराकडे शमी वृक्षाचे रोपण करणे. सोबत सिद्ध वनस्पती, हातजोडी, प्रभावी कवच बाळगावे व काही अन्य उपाय मी त्यांना सुचविले.
मुंबईतच भावाच्या घरी चेंबूरला कार्य करण्याचे ठरले. देसाई व त्यांची पत्नी दोन दिवस आधीच मुंबईला आले. हवनाला लागणारी सर्व तयारी करून ठेवली होती.

लहान कान्होले मोदक, दुर्वा, पंचखाद्य, जास्वंदाची फुले, सुगंधी फुले, तीळ, लाह्या, जवस, 21 तांत्रिक वनस्पती अशा अनेक गोष्टींचा वापर केला गेला. रिद्धी सिद्धी दैवतेला मान देऊन सव्हाषणीची खणा-नारळाने ओटी भरून तिला भोजन देण्याचा सल्ला देसाई यांना दिला. पत्नीसह देसाई यांनी पूर्ण श्रद्धेने सर्व विधी केल्या. भस्माचा वापर करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला.

मुंबईहून रत्नागिरीला जाईपर्यंत देसाई यांच्या वकिलाने उत्तम पुरावे जमा केले होते. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. गणेश रिद्धीसिद्धीच्या कृपेमुळे व देसाईंच्या खरेपणाला न्याय मिळाला होता. तीन महिन्यातच निकाल देसाई यांच्या बाजूने लागला. विरोधकांना कठोर शासन झाले. ही सर्व किमया देसाईंच्या विश्वासामुळे खरेपणामुळे हवनामुळे घडून आली होती.
यशानंतर देसाई यांनी अष्टविनायक यात्राही संपन्न केली. व संकल्प केला, आपल्या यथाशक्ती प्रमाणे दरवर्षी वरील याग करेन……

Ganesh Riddhi-Siddhi Yag

Ganesha is the lord of fourteen sciences, sixty-four arts. Is the head of all counts. To achieve success in life, Ganesha Riddhi-Siddhi Yagya is performed to please the family for happiness, peace, prosperity, goodness, health, and to conquer Ganesha Riddhi-Siddhi.

Happiness in everyone’s life should be as big as Ganaraya’s ears. Life should be as long as Ganesha’s sonde, moments of life should be as sweet as Modaka, bow down to Ganaraya and join hands with Vinayaka to overcome your obstacles, pay homage to Goddess Riddhi Siddhi for success, This yag is performed to get the blessings of this deity through Guru Mantra.

Riddhi Siddhi is the wife of Ganesha. If we worship Ganesha properly, Riddhi Siddhi will be pleased and help the children get happiness, peace, and good intelligence at home. Gaining glory increases prestige.
Riddhi means good intellect, and Siddhi implies the perfection of spiritual power. So good luck at the entrance of the house. So that there should be a hymn of positive energy in the house, therefore, if Ganesh Riddhi Siddhi Yagya is performed, happiness, peace, prosperity, success in intellectual and professional fields, wealth, and prosperity are achieved in that house.

Living in Ratnagiri, Mr. Desai was working at Patpedhi. Served for many years, but two years ago, his opponents implicated Mr. Desai in a Rs 50 lakh loan case. Circumstantial evidence was against them. After a lot of effort, it didn’t work out. People have taken advantage of your honesty. There is no one behind you today. But they had great faith in God. As he reads Soham Bhagwati Magazine every month, he contacted me, and I believe that you can solve this problem by yourself.

He also approached the deity of his village and immediately came to visit me from Ratnagiri. Mr. Desai stopped by his brother in Mumbai and came to my office to visit me the next day. After seeing Mr. Desai’s question, Nathan replied that Ganesh Riddhi Siddhi Yag should be done. Also, Ganesha should be worshiped differently every day. Planting of Shami tree near a Ganesha temple. I suggested them to have proven plants, hand joints, effective armor, and some other remedies.
Chembur decided to work at his brother’s house in Mumbai. Desai and his wife arrived in Mumbai two days ago. Havana had made all the necessary preparations.

Small Kanhole Modak, Durva, Panchkhadya, Jaswant flowers, fragrant flowers, sesame, Yahya, linseed, 21 industrial plants were used. Respecting the deity Riddhi Siddhi, he advised Desai to fill her OT with coconut and give her food. Desai, along with his wife, performed all the rituals with full faith. They were advised to use ashes.

Desai’s lawyer had gathered good evidence from Mumbai to Ratnagiri. Gradually the situation began to change. Due to the grace of Ganesh Riddhi Siddhi and the truthfulness of Desai, justice was done. Within three months, the results were in Desai’s favor. Opponents were severely punished. All this was due to the belief in Kimya Desai and the truth.
After the success, Desai also conducted Ashtavinayak Yatra. And resolved, I will do the above yag every year as much as I can…

Leave a Reply

%d bloggers like this: