google336aa3038a7d075c.html

भारतीय वास्तुशास्त्र…

','

' ); } ?>

भारतीय वास्तुशास्त्र……

शाप तळतळाटाप्रमाणेच वास्तुदोषाला आणखी काही कारणे आहेत. ते घर आय-व्यय योग्य साधलेले नसणे. घर व्याघ्रमुखी असणे, प्रत्येक दरवाजे व खिडक्या आय-व्यय प्रमाणे नसणे. घराचे खांब हे उलट-सुलट बसविणे म्हणजेच वनस्पतीची ज्याप्रमाणे वाढ होते, त्याप्रमाणे ही प्रस्थापना करायची असते . झाडाचा बुंधा जमिनीकडे व शेंडा आकाशाकडे अशा नैसर्गिक परिस्थितीत करावे लागते ते न करता उलट-सुलट करणे हा दोष तयार होतो. तसेच माथेसुळ यांचे बरेच प्रकार आहे. तो पण साधारण चौकटीच्या मध्यावर खांब देणे, सरईच्या जोडावर खांब देणे इत्यादी.. आढयाचे लाकूड शेंडा, बुडुख उलट-सुलट न करता एका दिशेला शेंडा करणे. घराच्या मुख्य दारासमोर घराचा चांदा असणे हा दोष आहे. बांधकामातले खालच्या चौरसाप्रमाणे आय व्ययाचे ठेवायचे असते. तळाच्या ओळब्यावर आढयापर्यंत सारखा असतो. बरीचशी माणसे वरच्या मजल्याचे बांधकाम आतून व बाहेरून तोडतात. आतून तोडलेले चालते पण बाहेरून चालत नाही. त्याने खालचे आय व्यय नकळत चूकतात. आय-व्यय हे बाहेरील मापाचे असतात. संपूर्ण ओळब्यात काम करणे दोरी ओळंबा जर सुटला तर काही दिवसांनी ती इमारत पडते. माझघर, ओसरी, पडवी यांचे सर्व दरवाजे एका दोरीत असू नयेत, असल्यास दोष समजावा.

Image by F1 Digitals from Pixabay

हे सर्व शिल्प शास्त्राप्रमाणे दोष आहेत. यांना वास्तुशल्य असे म्हणतात . त्याचा परीहारार्थ खालील उपचार करावे.

वरील दोष दुरुस्ती करताना घराची पुन्हा डागडूझी न करता वास्तूशल्य प्रित्यर्थ एक वास्तुशांती करून वास्तु बंधन करणे हे कर्मकांड करताना त्या होमात प्रत्येक महत्त्वाच्या पूजेच्या आधी वास्तूत नवचंडी पाठ अथवा नवनाथ हवन करून त्या दोषांचा उपग्रह किंवा होणारे दुःख कमी करता येते.

वरील दोषाच्या जागा शक्यतो टाळाव्यात पण चुकून जर वास्तव्य झाले तर बंदोबस्त करता येतो.

ती खालील प्रमाणे त्या देव-देवतांचे नित्य नैमित्तिक पूजा, नैवेद्य करणे, त्यांना संतुष्ट ठेवणे,गायत्री, महामृत्युंजय, गुरुचरित्र आधी नवचंडी अनुष्ठान करणे.

जारण-मारण करणारे लोकांनी त्या घराची उंबरे, दारे यांची वेडीवाकडी पूजा करून नवीन दोष लावणे, तसेच त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तीने ज्ञात अज्ञात शक्तीच्या प्रतिकारासाठी संरक्षण म्हणून व्रतवैकल्य आधी कुलधर्म, कुलाचार आदि कोणतेच धर्मकृत्य न करणे, यामुळे वास्तूत दोष व अशांतता निर्माण होते.

यासाठी कुलधर्म, कुलाचार करणे. पंचमहायज्ञ करणे, जारण-मारणादि प्रयोगाच्या उच्चाटनासाठी, गुरुचरित्र नवनाथ, रूद्र, गायत्री यांचे द्वारा सेवा करून दोष घालविणे.

कुणीही सज्जनांने आपण रहात असलेल्या जागेचा वरील सर्व बाजूंचा अतीसूक्ष्म विचार करून जर वरीलपैकी काही दोष आढळले तर चिंतन मनन करून सांगितलेल्या उपायांची योजना करून आपली त्या दोषातून सुटका करून घेऊन कुटुंबात सौख्य ,समृद्धी, शांतता आणावी. वरील कोणताच उपचार जर करता आला नाही, तर कुटुंबात प्रत्येकाने सहा महिने नवनाथ भक्तिसार, चाळीसावा अध्यायाचा पाठ त्या जागेत करावा. ह्या पाठानेसुद्धा वास्तूत आनंद निर्माण करता येतो.

कोणत्याही वास्तूत काही दोष जाणवत असतील तर त्यासाठी आणखीन एक सोपा उपाय म्हणजे एक कुसका नारळ घेऊन त्यावर ज्या तिन शिरा असतात तेथे अनुक्रमे पाण्यात भिजवून गुलाल, अबीर व चुना हे शेंडीतिल डोळ्यापासून पायापर्यंत लावावे. सुरुवातीलाच नारळाची शेंडी पूर्णपणे काढून त्यास गोटा करावा. तसेच आडव्या नारळाच्या मधोमध एक जळता कापूर घेऊन घराच्या प्रमुख दरवाज्याच्या उजव्या बाजूने ( दरवाज्याकडे आतुन बाहेर या स्थितीत तोंड करून उभे राहावे ) सर्व घरातून तीन वेळा नारळ फिरवून वाहत्या पाण्यात सोडून द्यावा. गटारात किंवा तिव्हाट्यावर फेकून देणे, नारळ फिरवीत असताना कोणाशीही काहीही बोलू नये. तसेच आपल्या आराध्य दैवतेला या कार्याची धुरा वाहण्याचे आवाहन करावे. नारळ फेकायला गेल्यास मध्ये कोणाशी बोलू नये. अथवा मागे वळून पाहू नये.
टीप : (वरील क्रिया स्वतःवर विश्वास असल्यास करावी. चूक झाल्यास घरातील दोष वा अज्ञात शक्ती जोमाने त्रास देतील तसेच ही क्रिया आपल्या अधिकार गुरूंच्या आदेशाने करावी, अन्यथा करू नये ) वरीलप्रमाणे इतर काही पद्धतीने घरातील दोष – बाधा, अरीष्ठ शक्ती यांचा समूळ नायनाट करता येतो, परंतु त्यासाठी मंत्रांची व विशिष्ट क्रियेची आवश्यकता आहे. म्हणून त्याच्या कार्यपद्धतीचा उल्लेख मुद्दामूनच येथे केलेला नाही. घर बांधतांना व्याघ्रमुखी, गोमुखी असू नये. व्याघ्र मुखी म्हणजे घराचा दर्शनी भाग अति भव्य थोडा रुंद व आतील भाग पुढील भागापेक्षा थोडा रुंदीने कमी अशा वास्तूला व्याघ्रमुखी घर असे म्हणतात. गोमुखी म्हणजे दर्शनी भाग कमी रुंदीचा व मागील भाग जास्त रुंदीचा याला गोमुख वास्तू असे म्हणतात.

घर बांधताना पाया खोदणे, खांब, चौकट, आढे टाकणे, याचा योग्य मुहूर्त पाहून उभारणी करावी व संपूर्ण घर बांधून झाल्यावर त्याची यथासांग विधिपूर्वक वास्तुशांती वास्तु बंधन होम हवन करून घ्यावे.

Image by pasja1000 from Pixabay

“वास्तु शांती”-“वास्तु बंधन” गरजेचे का ?

नवीन घर घेतल्यावर गृहाप्रवेशासोबत वा नंतर वास्तुशांती व सत्यनारायण पूजा करतात. काही लोक आपल्या सोयीनुसार, सुट्टीनुसार वास्तुशांत ठरवतात. परंतु हे चुकीचे आहे. तिथी, वार, नक्षत्र पाहणे गरजेचे असते. तर काही गुरुजी शुभमुहूर्त नसताना यजमानांना पूजा करण्यास सुचवितात. माझ्याकडे येणाऱ्या लोकांना हवन, पूजा करण्यापूर्वी नाथांचा आदेश घेऊन शुभ तिथी, मूहर्त बघुन हवन कार्य केले जाते.

वास्तु बंधनाबद्दल फार कमी लोकांना माहिती असते. नाथपंथीय वास्तु बंधन केल्यावर त्याचे परिणाम सकारात्मक असतात. गेल्या दोन महिन्यापूर्वीच मुंबईत एका गृहस्थांच्या घरी वास्तू परीक्षणाला मी गेलो होतो. त्यांचे घर टू बेडरूम हॉल असे मोठे होते. घरात ऐकून पाच माणसे राहत होती. तसे बरेचशे कोपरे दूषित असून, नळ गळत होते, घरात कोपऱ्यात घाण, जाळी होती. घरातील प्रत्येकाचे चेहरे सुतकी होते. संपूर्ण जगाचा भार यांना आहे, असे मला जाणवले .

घराचे वास्तुपरीक्षण झाल्यावर, कर्त्या पुरुषाला मी काही गोष्टी सांगितल्या. सर्वप्रथम तर आपण यापूर्वी केलेली वास्तुशांती बरोबर झालेली नाही, तसेच घर अस्वच्छ आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येथे आहे. घरात सर्व गोष्टी आहे परंतु देवघर नाही. वायव्येकडे अरिष्ट शक्ती घरात येऊन जाऊन असते. घराचे काही कोपरे दूषित आहे.

सर्वप्रथम आपण परत एकदा वास्तुशांती व उदक शांती करून घ्यावी. व या पूजेनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी वास्तू बंधन आपण करून घेवू या. शुभमुहूर्तावर मी माझ्या परिचयाच्या गुरुजींना वास्तुशांतीसाठी त्यांच्या घरी पाठविले. शास्त्रशुद्ध पद्धतीने वास्तुशांत पूजा झाली. यजमानांना ही पूजा बरीच भावली. (आधीच्या भटजींनी फक्त घाईतच पूजा आटोपली)

दुसऱ्या दिवशी मी माझ्या शिष्यगणासकट वास्तूबंधनासाठी गेलो. वास्तूचे नजर दोष उतारे काढून नाथपंथीय पद्धतीने नवनाथ याग करण्यात आला . तसेच वास्तूचे चारी कोपरे विशिष्ट वनस्पतीने बांधण्यात आले. घराच्या आतील बाजूस सिद्ध नारळ बांधण्यासाठी दिला. घरातील सर्व लोकांना पारदकवच धारण करण्यास दिले.

✍️ देवघरामध्ये दक्षिणावर्ती शंखाची स्थापना करण्यास सांगितली. दररोज संध्याकाळी पूजा करतेवेळी गाईच्या शेणीवर शाबरी पावडर चा धूप करण्यास सांगितले. शंखातले पाणी दररोज बदलून हे पाणी विष्णू मंत्राने संपूर्ण घरात शिंपडण्यास सांगितले.

शाबरी पावडर

सायंकाळी गाईच्या एका शेणीचा विस्तव करून त्यावर ही पावडर टाकून घरभर किंवा ऑफिसात याचा सुगंधी धूप करावा. सर्व कामांमध्ये प्रगती मिळविण्यासाठी खूप प्रभावी आहे.

$4.00

✍️ घरातील भांडणे कमी होण्यासाठी ड्रॉइंग रूममध्ये फुलदाणी ठेवण्यास सांगितली तसेच प्रभावी व वास्तू धूप वापरावे.

✍️ बेडरूममध्ये देवाचे कॅलेंडर फोटो लावू नये. त्याऐवजी प्राकृतिक सौंदर्याचे फोटो लावावे. बेडरूमचा भिंतीचा कलर गुलाबी असावा. त्यामुळे मनाला शांती लाभते. पती-पत्नीमध्ये भांडणे होत नाही. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा तो अस्वच्छ असल्यास घरात अडचणी येण्याचा मार्ग मोकळा असतो. शरीरात रोग प्रवेश करण्यासाठी शरीर असते, त्याचप्रमाणे घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ नसल्यास अडचणी येण्यासाठी मार्ग मोकळा असतो. त्यामुळे दरवाजा स्वच्छ करावा.

✍️ घराच्या खिडकीच्या ठिकाणी अथवा छतावर मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे पक्ष्यांसाठी. त्यामुळे बराचशा समस्या दूर होण्यास मदत होते.

✍️ घरातील बंद घड्याळ काढावी. घरात सकारात्मक बोलावे. दरवर्षाला कुलदैवत यांची इष्ट देवतेची ओटी भरावी. दररोज नामस्मरण करावे. वर्षभरात एकदा तरी हवन पूजापाठ करावे. संमिश्र याग अथवा आपल्या आवडत्या दैवते नुसार हवन करावे .

✍️ घरात तुटलेल्या वस्तू भांडी ठेवू नये. फाटके कपडे काढून टाकावे. गोरगरिबांना दान द्यावे. अन्नदान, वस्त्रदान, पित्रुदांन अवश्य करावे. नवनाथांचे अथवा दत्त, स्वामी, गजानन महाराजांचे जमेल तसे एखादे पारायण वर्षातून एकदा करावे. कुमारिका पूजन सवाष्ण पूजन, खणा नारळाची ओटी भरावी .

अधिक माहिती हवी असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा… Click

Image by Prasanta Sahoo from Pixabay

Indian architecture ……

There are other reasons for structural defects, such as the curse. That home income-expenditure may not have been appropriately achieved. The house should be tiger-oriented, not every door and window should be like income-expenditure. The pillars of the house are to be placed upside down, that is, as the plant grows. The defect is created by twisting the tree’s trunk towards the ground and the top of the tree without having to do it in such natural conditions. There are also many types of headaches. It is also to put a pillar in the middle of a simple frame, place a pillar on the shoe of a saree, etc. The wooden top of the aadhaya, topping in one direction without inverting the budukh. It is a fault of the house to have a roof in front of the main door. The income is to be kept as per the lower square in the construction. The bottom line is the same until halfway through. Most people break down the upstairs building from the inside out. Runs are broken on the inside but do not run on the outside. He unknowingly misses out on lower-income and expenditure. Income-expenditure is an external measure. Working in the entire line If the rope line is released, the building collapses in a few days. All the doors of Mazghar, Osari, Padvi should not be in one rope.

These are all flaws, like sculpture. This is called architecture. The following treatment should be done to prevent it.

While repairing the above defects, the house can be rebuilt with a Vastu Shanti for the sake of Vastushalya without re-repairing the flaws.

The above faults should be avoided as much as possible but can be dealt with if accidentally settled.

It is as follows: Daily worship of those deities, offering, keeping them satisfied, performing Navchandi rituals before Gayatri, Mahamrityunjaya, Gurucharitra.

The worship of the house’s thresholds and doors by the rioters, and the fact that the person living in the building does not perform any religious rites before the vratavaikalya as a protection against the unknown forces, create defects and unrest in the building.

To do kula dharma, kulachar for this. To perform Panchmahayagya, to eradicate the practice of Jaran-Maranadi, to remove guilt by serving by Gurucharitra Navnath, Rudra, Gayatri.

Any gentleman should consider all the above aspects of the place where you live. If you find any of the high defects, you should get rid of those defects by planning the measures suggested by meditation and bringing happiness, prosperity, and peace in the family. If none of the above treatments can be done, everyone in the family should recite Navnath Bhaktisar, Chapter 40, in that space for six months. Even with this lesson, happiness can be created in reality.

Suppose you feel any defects in any of the structures. In that case, another simple solution is to take a handful of coconut and soak it in water in the three veins on it, respectively, and apply gulal, abir and lime from the eye to the base of the shendi. Initially, delete the coconut husk and roll it. Also, take burning camphor in the middle of the horizontal coconut and place it on the right side of the main door of the house (facing the door in this position from the inside out) by turning the coconut three times through the house and leaving it in running water. Throwing it in the gutter or on the terrace, don’t say anything to anyone while turning the coconut. We should also appeal to our beloved deity to carry the smoke of this work. Don’t talk to anyone if you want to throw coconuts. Or don’t look back.
Note: (The above action should be done if you believe in yourself. If you make a mistake, the defects in the house or unknown forces will bother you, and this action should be done by order of your authority guru. Otherwise, it should not be done.) But it requires mantras and specific actions. Therefore, its working method is not mentioned here on purpose. When building a house, it should not be tiger-faced, cow-faced. A tiger-faced home is a magnificent facade of a house that is a little wider and a little wider than the inside. Gomukhi means less width of the front part and more width of the rear section. This is called Gomukhi Vastu.

When constructing a house, the foundation should be dug. The pillars, frames, crossings should be erected at the right time, and after the construction of the entire house, its Vastushanti Vastu Bandhan Home Havan should be done correctly.

“Vastu Shanti” – Why “Vastu Bandhan” is needed?

Vastushanti and Satyanarayana worship at or after entering a new house. Some people decide on Vastushant according to their convenience, holiday. But this doesn’t seem right. It is necessary to look at Tithi, War, Nakshatra. So some Gurus suggest hosts worship when there is no auspicious moment. Havan is performed for the people who come to me by taking orders from Nath before performing Havan and Pooja.

Very few people know about Vastu Bandhan. The results are positive when the Nathpanthiya Vastu is bound. Just two months ago, I went to an architect’s house in Mumbai for an architectural test. Their home was as big as a two-bedroom hall. Five people were living in the house. Most of the corners were contaminated, the pipes were leaking, the holes in the house were dirty, there was a net. Everyone in the house was smiling. I felt the burden of the whole world.

After the architecture of the house, I told a few things to the doer. First of all, the architecture we have done before is not right, and the house is unclean. So the negative energy is here. The house has everything but the house of God. To the northwest, evil forces come and go in the house. Some corners of the house are contaminated.

First of all, we should do Vastu Shanti and Udak Shanti once again. And immediately after this puja, let’s do Vastu Bandhan on the next day. On the auspicious occasion, I sent my acquaintance Guruji to his house for Vastu Shanti. Vastushanta pooja was performed scientifically. This pooja was very popular among the people of the time. (Earlier Bhatji performed pooja only in a hurry)

The next day I went for architecture with my disciples. Navnath Yag was performed in a Nathpanthi manner by removing the visual defects of the building. The four corners of the building were built with unique vegetation and given to make a proven coconut on the inside of the house. All the people in the house were allowed to wear mercury.

Asked to set up a southern conch in the temple. Every evening while performing pooja, he was asked to burn incense of shabri powder on cow dung. Vishnu Mantra asked to change the water in the conch every day and sprinkle it in the whole house.

To reduce quarrels in the house, keep a vase in the drawing-room, and use compelling and architectural incense.

Don’t put God’s calendar photos in the bedroom. Instead, take pictures of natural beauty. The color of the bedroom wall should be pink. It gives peace of mind. Husbands and wives do not quarrel. The main door of the house should be cleaned. If it is unclean, there is a chance of problems in the home. The body has a body to enter the disease, just as the main door of the house is not clean, the way is open for problems. So the door should be cleaned.

Keep water in a clay pot on the window sill or the roof for the birds. So it helps to get rid of a lot of problems.

Remove the home clock. Speak positively at home. Every year the OT of the deity desired by God should be paid. Remember the name every day. Havan Pooja should be performed at least once in a year. Sacrifice according to the compound yag or your favorite deity.

Do not keep broken utensils in the house. Remove torn clothes. Give alms to the poor. Food donation, clothing donation, a patriarchal gift must be done. Navanatha or Datta, Swami, Gajanan Maharaj should be done once a year. Kumarika Pujan Swasna Pujan, Khana Coconut OT, should be filled.

Contact the office for more information … Click

Leave a Reply

%d bloggers like this: