आईची माया अन् पोर जाईल वाया
फार लाड केले तर मुले बिघडतात

पालघरला राहणारे, श्री धर्माधिकारी नावाचे गृहस्थ सोहम भगवतीचे मासिक दहा वर्षापासून वाचत होते. बऱ्याच वेळा मला फोन करत करत असे व आपल्या समस्या सांगत होते. बरेच वेळा पत्रव्यवहार देखील झाला. परंतु त्यांचा व माझ्या भेटीचा योग आला नव्हता. पाच वर्षानंतर ते माझ्या भेटीस आले.
श्री धर्माधिकारी उच्चशिक्षित असून, मल्टिनॅशनल कंपनी मध्ये कामाला होते. तशा त्यांच्या बऱ्याच नोकऱ्या बदलून झालेल्या होत्या. त्यांची समस्या अशी की, त्यांचा मुलगा वीस वर्षाचा असून, तो सतत आजारी असे. त्यामुळे पुढे तो नोकरी कसा करेल ? त्याच्या शिक्षणात प्रगती होऊन चांगली नोकरी मिळण्यासाठी त्याला दैवी उपासना सांगावी. तसेच त्याच्या मार्गातले अडथळे दूर व्हावे, त्याचे रागावर नियंत्रण रहावे.
धर्माधिकारी ह्यांना उच्च पगाराची नोकरी प्राप्त व्हावी, तसेच हित शत्रूंचा त्रास कमी व्हावा. वरील समस्या घेऊन ते माझ्या भेटीस आले….
धर्माधिकारी यांंची माहिती पाहता, आदेश दाखल उत्तर असे आले की, त्यांनी सप्तशतीचे पाठ करावे. तसेच राहत्या वास्तुतला दोष काढावा. त्यांच्या मुलाने दोन मुखी रुद्राक्ष धारण करून, नजर दोषासाठी रक्षा कवच परिधान करावे. त्याच्या भावी आयुष्यासाठी दररोज स्पटिक गणेश मूर्तीचे पूजन करावे. गणेश मंत्राचा जप अवश्य करावा. श्रीगणेशाला सफेद अबीर व दूर्वा वहाव्यात. त्याच्या अभ्यासात सुधारणा होऊन भावी आयुष्य उज्वल होण्यासाठी वरील सर्व विधी मी श्री धर्माधिकारी यांना सांगितल्या. त्यावर त्यांनी, मी विचार करून कळवतो सांगीतले.
जवळपास सहा महिन्यांनी धर्माधिकारी यांचा मला फोन आला, गुरुजी नमस्कार, माझ्या समस्यांचे निवारण मला आपल्याकडून लवकरच करून घ्यायचे आहे. आपल्या बोलण्याकडे मी त्यावेळेस दुर्लक्ष केले. हि माझी चूक झाली.
माझा मुलगा दोन महिन्यापासून घरीच आहे. फायनल एक्झामला तो जाऊ शकला नाही. त्याची मती भ्रष्ट झाली. तुमचे त्या वेळेस मी ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती.
धर्माधिकारी यांच्या हवनासाठी शुभ तीथी, मुहूर्त काढण्यात आला. सहा महिन्यापूर्वी सांगितलेल्या उपायांमध्ये अजून थोडी उपासना वाढली होती. तसेच वनस्पतीमध्ये निश्चितच वाढ होऊन बदल झाला होता. त्यांचा खर्चही त्यामुळे वाढला. या सर्व गोष्टींची त्यांना कल्पना देऊन हवनाचा दिवस, वेळ ठरविला.
पालघरला ठरल्या दिवशी आम्ही त्यांच्या घरी गेलो. सर्वप्रथम त्यांच्या मुलाचा नजर दोष काढून, त्याला नजर रक्षा कवच धारण करण्यास दिले. घराचे नजर दोष काढून नाथपंथीय पद्धतीने घराचे वास्तु बंधन करून नवनाथ याग करण्यात आला. राहत्या वास्तूचे संरक्षण झाले होते. घरात नाथांचा सिद्ध नारळ दरवाज्याच्या वरच्या बाजूस लावण्यास सांगितला. तसेच घरातील सर्व लोकांना संरक्षणासाठी शाबरीकवच धारण करण्यास दिले.
त्या दिवशी आम्ही पालघर येथे थांबलो. हवनानंतर वास्तुमधील वातावरण मंगलमय, शांततेचे, उत्तम लहरीयुक्त असे झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश याग व कुलदेवी याग करण्यात आला. कुलदेवीच्या कृपेसाठी तसेच धर्माधिकारी यांच्या देवीच्या सप्तशतीच्या पाठाच्या पूर्णाआहुतीसाठी कुलदेवी याग करणे गरजेचे होते.

गणेश प्रिय वनस्पती व इतर सामग्री तसेच देवीसाठी विशिष्ट अशी वनस्पती ईतर हवन सामग्री, केशरयुक्त विडे याची आहुती हवनात देण्यात आली.
हवनानंतर कुमारिका पूजन, ब्राह्मण, सवाष्ण भोजनाचा कार्यक्रम झाला. धर्माधिकारी यांनी विशिष्ट अशा आचाऱ्याला बोलावून आमच्यासाठी त्यांनी सात्विक जेवणाचा आहार करून घेतला होता.
आम्ही सर्व दुपारी पालघरहून परतीच्या प्रवासास निघालो. धर्माधिकारी यांच्या मुलामध्ये हवनानंतर तब्येतीत व बुद्धीमत्तेत बराच फरक पडला होता. त्याने कॉलेजमध्ये परत ऍडमिशन घेऊन त्याचे शेवटचे वर्ष पूर्ण केले.
या गोष्टीला 5 वर्षे पूर्ण झाली असून, धर्माधिकारी फोनवरून त्यांची व मुलाची खुशाली कळवत असे. त्यांच्या बर्याच कामांमध्ये नाथांचा आशीर्वाद व माझा सल्ला ते घेत असे.
आज रोजी त्यांचा मुलगा पुण्याला राहत असून, आयटी क्षेत्रात नोकरी करीत आहे. धर्माधिकारी सुद्धा मोठ्या प्रोजेक्टवर काम करीत आहे. त्यांच्या उत्पन्नाचा काही अंशी भाग गोरगरिबांसाठी, निराधार मुलांसाठी, स्त्रियांसाठी ते खर्च करीत आहे. मला देखील त्यांनी आश्वासन दिले आहे. गुरुजी, माझे मोठे काम झाल्यावर मी सोहम अध्यात्मिक गुरुकुलासाठी मदत करेन. माझीही इच्छा आहे , चांगले साधना कक्ष, गोरक्ष मंदिर उभारावे. बघू देव त्यांना कधी बुद्धी देतो हे सर्व करण्यासाठी .
आज पर्यंत धर्माधिकारां सारखी बरीच माणसांची मी कामे केली व यापुढेही करीत राहीन. जीव ब्रह्म सेवेच्या व्रताचा विडा उचलला आहे. तो शेवटपर्यंत करायचा आहे. मग कोणी कसेही वागो.
एवढीच इच्छा नाथांचे मंदिर लवकरात लवकर उभे राहावे. गरजूंना, उत्तम साधकांना चांगली साधना करता यावी. आपले नित्य कामे करून उपासना, सेवा करावी हीच नाथांकडे सदिच्छा.
I l शुभम भवतू l l
A resident of Palghar, Shri Dharmadhikari, had been reading Soham Bhagwati’s magazine for ten years. He used to call me many times and tell me about his problems. There was also a lot of correspondence. But he and I did not get along. Five years later, he came to visit me.
Mr. Dharmadhikari is highly educated and works in a multinational company. That’s how many of their jobs changed. Their problem is that their son is twenty years old and he is always sick. So how will he do the job next? He should be taught to worship God to progress in his education and get a good job. Also, obstacles in his path should be removed; his anger should be controlled.
Dharmadhikari should get a high-paying job, and the enemies should be relieved. He came to me with the above problem…
Seeing the information of Dharmadhikari, the answer was that he should recite Saptashati. Also, the existing architecture should be blamed. Their child should wear a two-faced Rudraksha, a protective shield for eye defects. For his future life, Spatik Ganesh idol should be worshiped daily. Ganesha mantra must be chanted. Shriganesha should wear white abir and durva. I explained all the above rituals to Shri Dharmadhikari to improve his studies and brighten his future life. He said, “I will think and report.”
About six months later, I got a call from Dharmadhikari, Hello Guruji, I want to get rid of my problems from you soon. I ignored your words at that time. This was my mistake.
My son has been home for two months. He could not go to the final exam. His mind was corrupted. If I had listened to you then, this time would not have come today.
Auspicious date, muhurat was taken out for the funeral of Dharmadhikari. There was a little more worship in the measures mentioned six months ago. Also, the plant had grown and changed. It also increased its costs. He gave them an idea of all these things and decided on the day and time of the funeral.
On the day we arrived at Palghar, we went to his house. First, they removed their son’s eye defect and allowed him to wear eye protection. Navnath Yag was performed by removing the house’s eye defects and constructing the house in a Nathpanthi manner. The living quarters were protected. In the home, Nathan asked Siddha to put coconut on the top of the door. He also allowed all the people in the house to wear shabrikavach for protection.
That day we stopped at Palghar. After Havana, the atmosphere in Vastu was hopeful, peaceful, and well-mannered. The next morning Ganesh Yag and Kuldevi Yag were performed. It was necessary to play Kuldevi Yag for the grace of Kuldevi and the full sacrifice of Dharmadhikari’s Goddess Saptashati.
Ganesha’s beloved plants, other materials, and other plants specific to the Goddess, saffron video, were sacrificed in the havan.
After Havana, Kumarika Pujan, Brahmin, Swasna Bhojan was performed. Dharmadhikari had called an exceptional chef, and he had prepared a satvik meal for us.
We all set off on the return journey from Palghar in the afternoon. Dharmadhikari’s son had a big difference in health and intelligence after Havana. He completed his final year by taking back admission to college.
It has been five years since this incident, and Dharmadhikari used to greet him and his son over the phone. In many of his works, he used to take Nathan’s blessings and advice.
Today, his son lives in Pune and works in the IT sector. Dharmadhikari is also working on a big project. He is spending some of his income for the poor, destitute children and women. They have assured me too. Guruji, when my significant work is done, I will help for Soham Spiritual Gurukul. I also want to build a good sadhana room, Goraksha temple. Let’s see when God gives them the wisdom to do all this.
To this day, I have worked for many people like Dharmadhikar and will continue to do so. Jiva has taken up the vow of Brahma Seva. He wants to do it to the end. Then let someone do it anyway.
That is the wish of Nath’s temple to be erected as soon as possible. The needy, the best seekers, should be able to do good, sadhana. Nathan’s only wish is to worship and serve by doing his daily deeds.
I l Shubham Bhavatu l l

सोहम भगवती मासिकाचा ऑगस्ट २०२० चा “गणेश विशेषांक” प्रसिद्ध झाला आहे. तरी पुढील बटणावर क्लिक करावे.