google336aa3038a7d075c.html

साधना / Meditation

','

' ); } ?>
Sadhana Kundalini Awakening (Bhagwati Mata), Sarpin, Shivshakti *

Let’s get a glimpse of the Vijay Mantra given by the Guru after receiving the Beej Mantra along with the Six Karma Method, Siddha Chakra, Asana, Baitak, Japmal, Yogini Chakra and Anmol.

Mantra shastra is the actual Shastra, which means the means of self-vision are explained in this Shastra. Because it is a matter of practical experience, this scripture is a means of curing diseases and afflictions and has shown how to the self-reliance of all human beings. At the root of all creation is the gross creation created by the mind. The ritualistic conduct awakens the mantra’s mystical power, and the rites of the Guru and the Guru have established it on the spirit of the disciple. The disciple must have this right to be effective. As the disciple purifies his conduct, so does his authority.

Asking for forgiveness for your wrongdoing, begging for something to be done, does not fit into the main virtue of Mantra Shastra. So don’t just worship or pray. So the main thing is to unite men and nature. Prakriti means Saguna, and Purushatva means Nirguna. Therefore, to achieve this sadhana, one has to awaken the occult power in the body, and this is called Kundalini awakening. Mindfulness images make subtle predominance, and magical images achieve emotion. Mantra vidya was known to Shrigyaneshwar Maharaj and Shri Eknath Maharaj. Because the ritual of Mantra Purcharan Havan is described in Shree Eknath Bhagwat. Shri Samarth Ramdas Swami was aware of Mantra Shastra because he had realized the virtues of Shri Ramraya by reciting Shri Gayatri Mantra.

Enthusiasm, consolation, exhortation words spoken for pleading, etc. to know the difference between words in a group of mantras and concepts in other words, etc. The strength or power in a word group is momentarily sufficient. But the mantra power in the mantra word is constant. This must be convinced.

For example, when a person listens to the national anthem, he is proud of his country. That is, the pronunciation seems to be eternal because from chanting mantras, very human power arises. We call this constant supernatural power an achievement or a miracle.

Notice that in Mantra Shastra, mantras bear fruit over time, Moolmantras become fruitful only after Japhoma, and Siddha mantras bear fruit immediately. But Ari Mantra for Shatkarma becomes the destroyer of Japka. Mantra has to be indebted, and Japak has to be productive. The Akadamchakra and the Ghatchakra can determine this task. Still, to avoid the chaos of Siddharichakra’s discovery, the powerful Guru keeps the name of the disciple different. Doing so gives the disciple a new birth.

In Yogashastra, for the achievement of Mantra Yoga, sixteen parts have been mentioned …..

Bhakti, Shuddhi, Asana, Panchangasevan, Achar, Dharana, Divyadasesevan Pranakriya, Mudra Tarpan, Havan, Bali, Yag, Japa, Dhyana, Samadhi, etc. They feel the seeker in different forms. For example, when we start chanting a mantra Om Rim Namah, then Om is Pranav, Rim Rim means Beejshakti (Mayashakti Girija Beej), Namah is Pallava. When it is uttered in our verbal and mental form, at that time, those metaphysical Manashakti waves are awakened and spread from the inner mind of the seeker to the outer brain. The power of those waves is so high that when the world is contained in this Maya power, the seeker can feel many things about it.

First, the seeker pays attention to other things along with Mantradhyana … He becomes involved in the five senses of touch, smell, hearing, taste, and visual.

Tactile – If the seeker touches any part of his body while meditating or chanting mantras, he pays attention to it. For example, a mosquito, a fly, or an animal, or any of them, is touching you. Someone is gently touching him with his fingers all over his body, sometimes tickling Sahasrachakra. The movement of any of the 72,000 pulses and any other tactile sensation can depend on the power of the mantra alone.

Odor Knowledge – While meditating or chanting mantras, the seeker may encounter various odors and fragrances depending on which mantra chanting.

Listening Knowledge – While meditating or chanting mantras, the seeker first pays attention to what is going on around him. Also, sometimes the footprints of Shakti or her gang, etc.

Photo by Prasanth Inturi from Pexels

Taste Knowledge – While meditating or chanting mantras, the seeker gets various tastes in between, and he becomes restless and satisfied, and the meditation becomes corrupt.

Visual Knowledge – While meditating or chanting mantras, the seeker has knowledge of the form of Chaitanya or Chaitanya in the Arya Chakra in various colors. The seeker can become distracted or enlightened by becoming acquainted with the familiar-unfamiliar aspects of any existing or non-existent animal.

We have already studied the alphabet in the Beej Mantra. Each of those letters is in contact with the Mahabeej letter in the six chakras. When we chant the names of those mantras, the Mahabeej Shakti in the Chakra begins to vibrate, and the seeker receives various signals, and he goes away with that blissful bliss.

In the next blog, we will know many things while going through all kinds of spiritual journeys.

कुंडलिनी जागृती (भगवती माता), सर्पिण, शिवशक्ती*

गुरूकडून बीजमंत्र सोबत षटकर्म पद्धत, सिद्धचक्र, आसन , बैठक, जपमाळ, योगिनी चक्र व अनमोल निर्देश मिळाल्यावर दिलेल्या विजय मंत्राचे जेव्हा नामस्मरण सुरू होते त्या वेळी प्रत्यक्ष त्याची प्रचिती कशी येते ते पाहूया .

मंत्रशास्त्र हे प्रत्यक्ष शास्त्र आहे म्हणजे या शास्त्रात आत्म दर्शनाची साधने सांगितली आहेत. कारण यात प्रत्यक्ष अनुभवाचेच विषय असतात. हे शास्त्र रोग कष्ट पिडा यांचे निवारण करणारे व शरीरसुखलब्धीस साधनभूत आहे व सर्व मानवास आत्मोद्धाराचा मार्ग निदर्शित केलेला आहे. सर्व सृष्टीच्या मुळाशी मनसृष्टीनेच स्थूल सृष्टी निर्माण झाली आहे. मंत्रातील गुढ शक्ती विधीयुक्त आचारांनी व गुरूच्या संस्काराने जागृत होते व गुरुंनी ती शिष्याच्या मनःपटलावर स्थापित केलेली असते. ती प्रभावशाली होण्यास शिष्याचा ही अधिकार असावा लागतो. जशी ज्या शिष्याच्या आचार शुद्धी, जसा त्याचा अधिकार तशी त्याचे ठिकाणी मंत्रशक्ती आरूढ होते .

आपणाकडून झालेल्या चुकीची क्षमा याचना करणे, एखादी गोष्ट पूर्ण व्हावी म्हणून याचना करणे या गोष्टी मंत्र शास्त्राच्या मुख्य गुणात बसत नाही. तर केवळ पुजा अगर प्रार्थनाही नको. तर पुरुष व प्रकृती ऐक्यसाधन करणे ही गोष्ट प्रामुख्याने येते. प्रकृती म्हणजे सगुण व पुरुषत्व म्हणजे निर्गुण या दोन्ही तत्वाची ऐकत्या करण्याचे साधन म्हणजे एका विशिष्ट पद्धतीची पूजा साधन आहे आहे. म्हणून ही साधना साध्य करण्याकरिता शरीरांतील गूढशक्ती जागृत करावी लागते आणि यालाच कुंडलिनी जागृती असे म्हणतात. सूक्ष्म प्राधान्य भावना मनोमनी प्रतिमांनी साध्य होते व परभावना मंत्रमय प्रतिमांनी साध्य होते. मंत्रविद्या श्रीज्ञानेश्वर महाराज व श्री एकनाथ महाराज यांस अवगत होती. कारण मंत्र पुर:श्चरण हवन हे विधी श्रीएकनाथी भागवतांत वर्णन केलेले आहे. श्री समर्थ रामदास स्वामींना मंत्रशास्त्र अवगत होते कारण त्यांनी श्री गायत्री मंत्राची पुर:श्चरणकरून श्रीरामरायाचा सगुण साक्षात्कार करून घेतला होता .

मंत्रशब्द समुहांतील शब्द व इतर शब्द समुहातील शब्द यातील फरक जाणून घेण्यासाठी उत्साह, सांत्वन, याचना करण्याकरिता बोललेले उपदेशपर शब्द इत्यादी शब्द समूहातील सामर्थ्य अगर शक्ती क्षणिक परिणामकारक असते. परंतु मंत्रशब्दस्थित मंत्रशक्ती निरंतर टिकणारी असते. हे पटवून घेतले पाहिजे.

उदाहरणार्थ – राष्ट्रगीत म्हटल्यावर ऐकणाऱ्या मनुष्याला देशाचा अभिमान मनी सळसळतो परंतु एका सिद्ध पुरुषाने काही मंत्र म्हणून, उपांशु व वाचीक उच्चारला व त्याचा अर्थ श्रोत्याला होवो वा न होवो त्याचा प्रभाव त्या बाबतीत पडलेला दिसतो. म्हणजे ते उच्चार चिरसिद्ध आहे असे दिसून येते. कारण मंत्रोंच्चारापासून अति मानुष शक्ती उत्पन्न होते. या अतिमानुष चीरसिद्ध शक्तीलाच आपण सिद्धी अगर चमत्कार म्हणतो .

हे पहा की, मंत्रशास्त्रात मंत्र कालांतराने फल देतात, मूलमंत्र जपहोमानंतरच फलप्रद होतात व सिद्ध मंत्र त्वरित फल देतात. पण षटकर्मासाठी अरि मंत्र हे जापकाचा नाश करणारे होतात. मंत्र ऋणी व जापक धनी असावा लागतो. हे कार्य अकडमचक्र व घातचक्र हयावरून ठरविता येते परंतु सिद्धारीचक्र शोधनाची भानगड चुकवण्यासाठी सामर्थ्यसंपन्न गुरू आत्म तेजाने शिष्याचे दिशा नावच निराळे ठेवतात. तसे केल्याने शिष्याचा नवीन जन्म होतो असे शास्त्र आहे..

योगशास्त्रात मंत्रयोग सिद्धी हयासाठी सोळा अंगे सांगितले आहेत…..

भक्ती, शुद्धी, आसन, पंचांगसेवन, आचार, धारणा, दिव्यदेशसेवन प्राणक्रिया, मुद्रा तर्पण, हवन, बली, याग, जप, ध्यान, समाधी इत्यादी.वरील मंत्रशास्त्राबाबत ज्या लहरी उत्पन्न होतात त्या सुप्त पण अगाध असतात. त्या साधकाला निरनिराळ्या स्वरूपात जाणवतात. उदाहरणार्थ जेव्हा आपण एखाद्या मंत्रजप सुरु करतो ओम रिम नमः तेव्हा ॐ हा प्रणव, रिम रिम म्हणजे बीजशक्‍ती (मायाशक्ती गिरिजा बीज), नमः हे पल्लव आहे. जेव्हा याचा उच्चार आपल्या वाचिक उपांशु व मानसिक रूपात होतो. त्यावेळी त्या त्या रूपातम्क मनशक्ती लहरी जागृत होतात आणि त्या साधकाच्या अंतरमनापासून बहिर्रमनापर्यंत पसरत जातात. त्या लहरींचे सामर्थ्य हे महान असते की, या माया शक्तीत विश्व सामावलेले आहे तेव्हा त्या साधकाला त्याबाबत अनेक गोष्टी जाणवू शकतात.

प्रथम तो साधक मंत्रध्याना बरोबर इतर बाबींकडे लक्ष देतो …स्पर्शज्ञान, गंधज्ञान, श्रवणज्ञान, स्वादध्यान , दृश्यज्ञान अशा पंच ज्ञानात तो गुंतून जातो.

स्पर्शज्ञान – ध्यान किंवा मंत्रजप करीत असता साधकाला त्याला त्याच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श झाल्यास तो त्याकडे लक्ष केंद्रित करतो. उदाहरणार्थ एखादा मच्छर, माशी व प्राणी किंवा पुढे पुढे त्यापैकी आपल्याला कोणीतरी स्पर्श खरोखरीचाच करीत आहे याचा प्रत्यय येतो. कुणीतरी त्याला हळुवारपणे संपूर्ण अंगावरून हाताच्या बोटाने स्पर्श करीत आहे, कधी तर सहस्त्राचक्रावर गुदगुल्या होत आहे. 72,000 नाड्यापैकी कोणत्याही नाडीतील हालचाल व इतरही काही स्पर्शज्ञान होऊ शकते हे केवळ मंत्र सामर्थ्यावर अवलंबून असते.

गंधज्ञान – ध्यान किंवा मंत्रजप करीत असता साधकाला निरनिराळे दुर्गंध व सुगंध येऊ शकतात मंत्रजप कोणता त्यावर ते अवलंबून आहे.

श्रवण ज्ञान – ध्यान किंवा मंत्रजप करीत असता साधकाला प्रथम त्याच्या आजूबाजूला काय चालले आहे यावर लक्ष जाते, अथक अजोड अभ्यास आणि ध्यान लागल्यास त्याला कुंडलिनी शक्ती रूपाच्या इच्छेनुसार अनेक नाद व नामापासून ते वाद्य वाजंत्री ते श्वासोच्छवासात ढवळाढवळ होणे, विकृत आक्रोश पर्यंत नानातर्‍हेचे श्रवण ज्ञान होते. तसेच कधीकधी शक्ती वा तीचे गण यांच्या पावलांची चाहुल खूण इत्यादी.

स्वाद ज्ञान – ध्यान किंवा मंत्रजप करीत असता साधकाला मध्येच नाना तरेचे स्वाद मिळाल्याने तो बैच्चन व संतुष्ट होऊन ध्यान भ्रष्ट होतो.

दृश्य ज्ञान – ध्यान किंवा मंत्रजप करीत असता साधकाला आपल्या आज्ञा चक्रावर विविध रंगरूपात अमर्याद व त्रिकालातील चैतन्य वा चैतन्य स्वरूपाचे ज्ञान होते. ते कुणाही स्थित वा अस्थित वस्तूंचे प्राण्याचे परिचित-अपरिचित बाबींचे स्वरूपी ज्ञान होऊन साधक विचलित वा ज्ञानी होऊ शकतो.

बीज मंत्रात जी वर्णाक्षरे आहेत त्याचा आपण मागेच अभ्यास केला आहे. त्या प्रत्येक अक्षराचा षटचक्रातील महाबीज अक्षराशी संपर्क असतो. जेव्हा आपण त्या मंत्रांचे नामस्मरण करतो त्या वेळी चक्रातील महाबीज शक्ती स्पंदन होण्यास सुरुवात होते व निरनिराळे संकेत साधकाला प्राप्त होतात व तो त्या परमानंद कोटी सुखावून निघतो.जन्म जन्माचे हेच का ते देणे असा प्रश्न साधकाला पडतो व खऱ्या अर्थी तो सोहम चा अर्थ जाणू लागतो.

सर्व प्रकारातून अध्यात्मिक प्रवास करीत असता अनेक गोष्टींचे ज्ञान होत असते तसेच आता आपण कुंडलिनी म्हणजे काय तिला सर्पिण शक्ती आदिमाया अशा अनेक रूपाने बोलण्याचे कारण काय ते पुढील ब्लॉगमध्ये पाहू…

Leave a Reply

Discover more from Spiritual-communions

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading