Indian architecture
Our ancient architects have thought very carefully about what should be in the architecture, and it is scientific. Of course, it should not be exaggerated. If something is not in a specific direction, then the building should not be demolished at the cost of a thousand rupees. Because everything has a choice. For example, if the door of one’s house is on the south side and there are another building and block in front of it, then the defect of the south door is much less. If there is an open field in front, keep in mind that this defect remains. Some people put a thick curtain on the south door so that the south wind blows, and the error is significantly reduced.

However, those who want to build a new building should do so by following the rules of architecture. The other thing is that we made the Vastu with very scientific thought, but there is no worship in that Vastu; on the contrary, there is eating, drinking, or worshiping God, or menstruation is not observed, but scientifically. Your abode in that built building will never be very comfortable.
From my experience, I would like to emphasize that religious activities like Navnath or Datta Pothivachan Stotra, Goraksh Yag, Navnath Yag, Ganesh Yag, Gayatri Yag, Kuldevi Yag, Datta Yag, etc. must take place to have a comfortable stay in any building.
Our architect has made a very thoughtful decision about what direction the object should be in the architecture. Let’s see where it should be accordingly!
These directions should be determined using a compass without estimating.
Poojasthan-Devghar – The northeast god should face west.
Kitchen – Southeast
Vault – North
Bathhouse – east or northwest.
Meeting Room – East Northeast and North
TV – southeast or south.
Toilet – West. But the person sitting there should face north.
Porch – East
Water Tank – West
Attic – West, and South
Gas – Igneous
Stair – Southwest South
Basement – should not be possible. If northeast corner.
Well – northeast or north.
The roof of the house – should be sloping from south to north.

Cooking Platform – southeast
Parking – Southwest or South
Trash – Northwest
Factory boiler – Southeast
Balcony – East or North
Furniture – South and West
Garden – North
Tulsi Vrindavan – Northeast
Pets – West
Store Room – South
Footwear space – Northwest
Fountain – northeast or north
Playground – East-North
The main entrance of the temple – to the east
Bedroom – south-southwest.
भारतीय वास्तुशास्त्र
आमच्या प्राचीन वास्तू शास्त्रज्ञांनी वास्तुत कोणती गोष्ट कोठे असावी, याबाबत फार बारकाईने विचार केला असून तो शास्त्रशुद्ध आहे. अर्थात त्याचा अतिरेक करू नये. एखादी गोष्ट विशिष्ट दिशेला नसेल तर उगाच हजार रुपये खर्चून वास्तूची पाडापाड करू नये. कारण प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. उदाहरणार्थ एखाद्याच्या घराचे दार दक्षिणेला असेल व त्याच्यासमोर दुसरी इमारत व ब्लॉक असेल तर दक्षिणेकडील दाराचा दोष पुष्कळच कमी होतो. समोर मोकळे मैदान असेल तर हा दोष राहतो हे लक्षात ठेवावे. काहीजण दक्षिणेकडील दारावर जाड पडदा लावतात त्यायोगे दक्षिण दिशेकडून येणारा वारा जातो व दोष खूप अंशी कमी होतो.
ज्यांना नवीन वास्तू बांधायची आहे अशांनी मात्र शक्यतो वास्तुशास्त्राचे नियम पाळूनच वास्तूचे बांधकाम करावे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण वास्तू अगदी शास्त्रशुद्ध विचार करून बांधली, परंतु त्या वास्तूत कोणती उपासना होत नसेल उलट मांसाहार, मद्यपान असे प्रकार होत असतील किंवा देवपूजा ही काहीतरी उरकली जात असेल वा लहरी नुसार केव्हातरी केली जात असेल, मासिक धर्माची पाळवणणूक होत नसेल, तर शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधलेला त्या वास्तूतील तुमचा निवासही फारसा सुखावह कधीच होणार नाही .
माझ्या अनुभवावरून मी ठामपणे सांगू इच्छितो की, कोणत्याही वास्तूतील निवास सुखावह होण्यासाठी तेथे नवनाथ किंवा दत्त पोथीवाचन स्तोत्र वाचन गोरक्ष याग, नवनाथ याग, गणेश याग, गायत्री याग, कुलदेवी याग, दत्त याग इत्यादी धार्मिक गोष्टी होणे आवश्यक असते.
आमच्या वास्तुशास्त्रज्ञानी वास्तुमध्ये कोणती गोष्ट कोणत्या दिशेला असावी याबाबत फार विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार कोठे काय असावे हे आता आपण पाहू या!
या दिशा अंदाजाने न ठरविता होकायंत्राचा उपयोग करूनच ठरवाव्यात.

पूजास्थान-देवघर – ईशान्य देवाचे तोंड पश्चिमेच्या दिशेला असणे चांगले.
स्वयंपाकघर – आग्नेय
तिजोरी – उत्तर
स्नान गृह –पूर्व किंवा वायव्य .
बैठकीची खोली – पूर्व ईशान्य व उत्तर
टीव्ही – आग्नेयस किंवा दक्षिणेस.
शौचगॄह ( टॉयलेट ) – पश्चिम. मात्र तेथे बसणाराचे तोंड उत्तरेस यावे .
वरांडा – पूर्व

पाण्याची टाकी – पश्चिम
पोटमाळे – पश्चिम व दक्षिण
गँस – आग्नेय
जिना – नैऋत्य दक्षिण
तळघर – शक्यतो नसावे. असल्यास ईशान्य कोपर्यात.
विहीर – ईशान्य किंवा उत्तरेस
घराचे छप्पर – दक्षिणेकडून उत्तरेकडे उतार असणारे असावे .
स्वयंपाकाचा ओटा – आग्नेय
वाहनतळ – नैऋत्य वा दक्षिण
कचराकुंडी – वायव्य
कारखान्याचा बॉयलर – आग्नेय
गच्ची – पूर्व किंवा उत्तरेस
फर्निचर – दक्षिण व पश्चिमेस
बाग – उत्तर
तुळशी वृंदावन – ईशान्य
पाळीव प्राणी – पश्चिम
अडगळीची खोली – दक्षिण
पादत्राणांची जागा – वायव्य
कारंजे – ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस
खेळण्याची जागा – पूर्व-उत्तर
देवस्थानाचे महाद्वार – पूर्वेस
शयनगृह – दक्षिण-नैऋत्य.
अधिक माहितीसाठी संपर्क करा. Contact for more information. myspag69@gmail.com
