google336aa3038a7d075c.html

Senseless persons

','

' ); } ?>

Reality-सत्य अनुभव-47

Although I have said a lot about my disciple Amol before, I think his behavior needs to be discussed. After performing the Beej Mantra one by one, it was as if his wings were broken, and he reduced his visits to my house. On a later brief stay, he began to give me advice. His arrogance had boiled over. All the churches around me hated him. But he was polite to me and eventually stopped talking to others. It was only skepticism that made him feel better, despite my repeated warnings. Finally, he stopped coming to me.

A few months later, I got a call from his brother. “I want to meet you,” he said when asked why. “I want to give Amol’s wedding magazine.” At the appointed time, Amol’s brother and his father brought me a wedding magazine and invited me to the wedding. I will not come to the wedding until Amol arrives. His father told me that Amol would come to you after I told him this.

Photo by Leo Cardelli from Pexels

Amol himself had gone to all the other places and handed over the wedding papers. On the day of the wedding, I solved the problem of his acquaintance, Maya Ji, with the grace of Nath. Amol was telling her that Guru would come to my wedding. But I was adamant because you should not remember in your happiness the Nath who brought Amol and his family out of a difficult situation? What is his second insult? Amol himself had to come and place his wedding card and sweets on Nath’s throne. When this did not happen, I was angry because of the insult to my Nath, but in the end, I handed it over to all the Naths.

A few days later, I found out that Amol had gone to Dubai with his wife. Even after the marriage, he did not come to see his wife, Nath. A few days later I got a call from Amol’s brother that I have two cousins ​​in Kolhapur, they have some problem in their business, please solve their problem. I told him to send them their customary information.

According to the answer to the question, Kuldevi and Vishnuyag were performed at their house. According to Amol, I was taken care of on my journey from Mumbai to Kolhapur. “Amol has asked you to take special care.” That’s what his father told me.

When I went to his house in Kolhapur, I realized that I had been appointed to rescue Amol, who had caused a lot of confusion here, but I had accepted it on Nath’s orders. Both his siblings were given seed mantras for their next journey.

In the meantime, Amol had slandered Maya and my family because she wanted to stop Maya from coming to me, but since Maya was a well-educated housewife, she could see her bad. So she kept in touch with me at her discretion. She consults them in her big small trouble. I have also made her obligated by the mantra.

Amol, who is currently in the throes of Swadhisthan Chakra, had gone abroad for further studies with my supposed blessings. Sometimes all of a sudden, we had an online visit on the computer. He used to sing my praises in it.

Two years later, Amol’s father called him to India because his father was not well. His wife went to Maheri, and he came to his mother. He started a botanical remedy with medical treatment on his father, but the opposite effect was seen. Within a few months, his father went home.

Meanwhile, his visits to me began to increase. He started coming with me for architecture-havan; he asked me his questions again. In the meantime, he had lost his job abroad. He was looking for a new job. Meanwhile, his relatives and his wife’s men started experimenting with him. Amol was suffering from this frequently. His wife asked him for a divorce. (That is why it is necessary to have Nathan’s blessing in every work.)

Seeing his information, I removed Amol’s eye defect and let him wear the shield. Also, his Kuldevi Yag, Dattayag, was performed. The tool was attached. Today, he has got a job in India, and he manages his career. He attends the funerals of others as he pleases.

याआधी मी माझा शिष्यतुल्य अमोल बद्दल बरेच काही सांगून झाले आहे तरी त्याच्या वर्तणुकीबद्दल विवेचन होणे गरजेचे वाटते. एकपाठी बीज मंत्राचे अनुष्ठान केल्यानंतर त्याला जणू पंखच फुटले होते व त्याने माझ्या घरी येणे कमी केले. नंतरच्या तात्पुरत्या भेटीत तो मला सल्ले देऊ लागला. त्याच्यातली घमेंड उफाळून आली होती. माझ्या अवतीभोवतीची साऱ्या मंडळींचा त्याला तीव्र तिरस्कार येत असे. परंतु तो माझ्याशी अदबीने वागत असत शेवटी त्याने इतरांशी बोलणंच बंद केलं. फक्त संशयितवृत्तीने तो बळावला माझ्या अनेकदा ताकीदीनंतरही त्यात तूसभरही फरक पडत नव्हता, शेवटी त्यांने माझ्याकडे येणे बंद केले.

काही महिन्यांनी त्याच्या भावाचा मला फोन आला. “मला तुम्हाला भेटायचे आहे,” मी कारण विचारले असता तो “अमोलच्या लग्नाची पत्रिका द्यायची आहे” असे म्हणाला. ठरल्या वेळेप्रमाणे अमोलचा भाऊ व त्याचे वडील माझ्याकडे एक लग्न पत्रिका घेऊन आले मला लग्नाचे निमंत्रण देऊन गेले. अमोल आल्याशिवाय मी लग्नाला येणार नाही. हे त्यांना मी ठाम सांगितले त्यावर अमोल तुमच्याकडे नक्की येईल असे त्याच्या वडिलांनी मला सांगितले.

बाकीच्या सर्व ठिकाणी अमोल स्वतः जाऊन लग्नपत्रिका देऊन आला होता. लग्नाच्या दिवशी त्याच्या ओळखीची माया जीचा प्रश्न मी नाथांच्या कृपेने सोडविला होता. तिला अमोल आवर्जून सांगत होता की, माझ्या लग्नाला गुरु नक्की येतीलच. परंतु मी ठाम होतो कारण ज्या नाथांनी अमोल व त्याच्या घरच्यांना बिकट प्रसंगातून बाहेर काढले, त्या नाथांची तुम्ही तुमच्या सुखात आठवण करू नये? याहून त्यांचा दुसरा अपमान तो काय? अमोल ने स्वतः येऊन नाथांच्या गादीवर त्याची लग्नपत्रिका व मिठाई श्रीफळ ठेवणे गरजेचे होते. तसे न झाल्याने माझ्या नाथांच्या अपमानामुळे माझा संताप झाला होता परंतु शेवटी मी सर्व नाथांवरच सोपविले.

काही दिवसाने अमोल आपल्या पत्नीबरोबर दुबईला गेल्याचे मला कळेल लग्नानंतरही तो सपत्नीक नाथ दर्शनाला आला नाही. काही दिवसांनी अमोलच्या भावाचा मला फोन आला की, कोल्हापुरात माझे दोन चुलत भाऊ आहेत, त्यांना त्यांच्या व्यवसायात काही अडचण आहे कृपया तुम्ही त्यांच्या समस्येचे निराकरण करा. त्यावर त्यांना त्यांची रीतसर माहिती पाठविण्यात सांग असे मी त्याला सांगितले.

प्रश्न दाखल उत्तरानुसार त्यांच्या घरी कुलदेवी व विष्णूयाग करण्यात आला. मुंबईहून कोल्हापूरच्या प्रवासात अमोलच्या सांगण्यानुसार माझी काळजी घेण्यात आली. त्यावर “अमोलने तुमची विशेष काळजी घ्यायला सांगितली आहे.” असे त्याच्या वडिलांनी मला आवर्जून सांगितले.

कोल्हापूरला त्यांच्या घरी गेल्यावर माझ्या हे लक्षात आले की, अमोलने येथे बराच गोंधळ घालून ठेवला होता तो निस्तरण्यासाठी माझी नियुक्ती झाली होती, मी पण नाथांच्या आदेशाने ती स्वीकारली होती. त्याच्या दोन्ही भावंडांना त्यांच्या पुढील वाटचालीकरिता बीजमंत्र दिला होता.

जे दरम्यानच्या काळात अमोल यांनी मायाकडे माझी व माझ्या घरच्यांची यथेच्छ बदनामी केली होती कारण असे जेणेकरून माया माझ्याकडे येण्याचे बंद करावे परंतु माया एक सुशिक्षित गृहिणीअसल्याने तिला आपले बरेवाईट सारेच दिसत होते. त्यामुळे ती तिच्या सदसद विवेकबुद्धी नुसार तिने माझ्याशी संपर्क ठेवला. ती तिच्या छोट्या मोठ्या अडचणीत त्यांचा सल्ला घेत असते. तिलाही मी मंत्राने उपकृत केले आहे.

सध्या स्वाधिष्ठान चक्राच्या कैचीत सापडलेला अमोल माझा गृहीत आशीर्वाद घेऊन परदेशात पुढील अभ्यासासाठी गेला होता. कधीतरी अचानक आमची ऑनलाइन संगणकावर भेट होत असे. त्यात तो माझे खूप गुणगान गात असयाचा.

Photo by Máximo from Pexels

दोन वर्षांनी अमोलच्या बाबांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्याच्या आईने त्याला भारतात बोलावून घेतले . त्याची पत्नी माहेरी गेली व तो त्याच्या आईकडे आला. डॉक्टरी उपायाबरोबर वनस्पती शास्त्राचे ऐकिवात असलेले उपाय त्यांनी त्याच्या वडिलावर सुरू केले , पण त्याचे विपरीत परिणाम दिसले. काही महिन्यातच त्याचे बाबा देवाघरी गेले.

याच दरम्यान त्याचे माझ्याकडे येणे-जाणे वाढू लागले. तो माझ्यासोबत वास्तूपरीक्षण-हवन यासाठी येऊ लागला, त्याने परत स्वतःचे प्रश्न माझ्यासमोर मांडले. या दरम्यान त्याची परदेशातील नोकरी सुटली होती. तो नव्याने नोकरीच्या शोधात होता. याच दरम्यान त्यांच्या नातेवाईकांकडून व पत्नीच्या माहेरच्या माणसांकडून त्याच्यावर अनिष्ट प्रयोग सुरू होते. याचा त्रास अमोलला वारंवार होत होता. पत्नीने त्यापासून घटस्फोट मागितला. (म्हणूनच प्रत्येक कार्यात नाथांचा आशीर्वाद असणे गरजेचे आहे.)

त्याची माहिती पाहून मी अमोलचा नजर दोष काढून त्याला सिद्ध कवच परिधान करण्यास दिले. तसेच त्याचे कुलदेवी याग , दत्तयाग ही हवने करण्यात आली. सोबत साधनेची जोड होती. आज रोजी त्याला भारतातच नोकरी मिळाली असून तो त्याची नोकरी सांभाळून साधना करतो. जमेल तशी इतरांच्या हवनाला उपस्थिती लावतो.

Leave a Reply

%d bloggers like this: