google336aa3038a7d075c.html

A very hasty act.

','

' ); } ?>

Reality-सत्य अनुभव-46

A very hasty act.

One day a woman from Mumbai came to me early in the morning to read about her husband. The mental and physical abuse of the woman I heard about her husband was horrible. Till now, she had only been robbed by going to many fathers and grandfathers. Till now, she was in despair. She found many who took advantage of the situation, but she could not find a way out. It was just a waste of money and time. Ashamed, she was not reporting to the police. Her suffering was becoming unbearable day by day. She was willing to do anything to get out of this predicament, as well as she was starting to suffer financial losses in business.

First, I took Nath’s orders and performed Vishnuyag at her place of business. Also, a loss of Rs 7.5 lakh was saved. Transaction progressed, Kolhapur did not get land clearance; it was accomplished by Gomati Chakra experiment. Her son was smart in studies, but he also had a gap. He was getting worse in the company of friends. For him, he improved a lot with the three sutras of Rudraksha, Ganesh Havan, and medicine. His addiction stopped; progress was made in his studies.

The question remained suspicious – of an addicted perverted husband, for which I asked the woman to do a particular sadhana, according to which the woman did the sadhana very neatly. Within a few days, the energy of the sadhana began to change on her husband. As he was leaving, the positive energy of the place kept him away from this persecution.

And one day when my wife’s phone was not very well, my sister and I went to Gangapur with her. I tried so hard to convince them that he would recover in a few days. He is enjoying the fruits of his deeds. Let him enjoy it. He will not bother you again.

Photo by Yogendra Singh from Pexels

But the woman did not understand what I was saying. She took her husband to Gangapur. A few days later, with the blessings of the Maharaja, he recovered and started showing his Rudra incarnation to the woman. Chanting fell on the instrument made by the left, and so she has been a victim of her husband’s harassment till today. Many remedies failed for her, she did not have the wisdom to go beyond the Guru’s order, she wanted to get me out of this torment, but in the end, I am nothing before the law. The boy was married to a good girl. The job is great too. They are all happy in a small family.

अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप

मुंबईहून एके दिवशी एक बाई आपल्या नवऱ्याचे पाढे वाचायला माझ्याकडे पहाटेच आली तिच्या नवऱ्याबद्दलच्या येथेच्छ गोष्टी मी ऐकून घेतल्या त्या बाईला होणारा मानसिक व शारीरिक छळ हा भयंकर होता. आत्तापर्यंत बऱ्याच बाबा व बुवाकडे जाऊन तिची केवळ लुबाडणूक झाली होती. आत्तापर्यंत तिच्या पदरात केवळ निराशाच पडली होती. या परिस्थितीचा फायदा घेणारे तिला असंख्य सापडले पण तिला यातून बाहेर काढणारा कैवारी मिळत नव्हता. पैसा व वेळ यांचा केवळ अपव्यय झाला होता. शरमेने ती पोलिसात तक्रार करीत नव्हती. तिला होणारा त्रास हा दिवसेंदिवस असह्य होत होता. ह्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी ती काहीही करायला तयार होती, तसेच तिला व्यवसायात आर्थिक नुकसान व्हायला लागले होते. 

प्रथम मी नाथांचा आदेश घेऊन तिच्या व्यवसायाच्या ठिकाणी विष्णूयाग केला. त्याबरोबरच साडेसात लाखाचे नुकसान वाचले. व्यवसायात प्रगती झाली, कोल्हापूरला जमिनीचा निकाल लागत नव्हता, तो गोमती चक्र प्रयोगाने सिद्धीस गेला. तिचा मुलगा अभ्यासात हुशार होता परंतु त्यालाही अवकळा आली होती. तो मित्रांच्या संगतीत बिघडत चालला होता. त्याच्यासाठी रुद्राक्ष, गणेश हवन व औषध या त्रिसुत्रीने तो खूप सुधारला त्याला लागलेलं व्यसन बंद झाले, अभ्यासात प्रगती झाली.

Photo by Rajreeta Sen from Pexels

राहता राहिला प्रश्न संशयी – व्यसनी विकृत नवऱ्याचा, त्यासाठी मी त्या बाईला एक विशिष्ट साधना करायला सांगितली, त्यानुसार त्या बाईने अगदी नीटनेटक्याने साधना केली व काही दिवसातच तिच्या नवऱ्यावर साधनेच्या ऊर्जेचा फरक पडू लागला आपल्याला त्रास होत आहे हे त्याच्या लक्षात आले,  तो जसा बायकोला त्रास करायला जात असे तेव्हा तेथील सकारात्मक ऊर्जा त्याला या छळासाठी मज्जाव करीत असे.

आणि असाच एके दिवशी त्या बाईचा मला फोन माझ्या नवऱ्याची तब्येत जास्त बरी नाही तेव्हा त्याला घेऊन मी व माझे दीर गाणगापूरला चाललो आहोत. मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला की तो काही दिवसात बरा होईल. तो त्याच्या कर्माची फळे भोगतो आहे त्याला ती भोगू द्या. यापुढे तो पुन्हा तुम्हाला त्रास देणार नाही.

परंतु माझे म्हणणे त्या बाईला समजलेच नाही, तिने आपल्या नवऱ्याला गाणगापूरला नेले काही दिवसांनी महाराजांच्या आशीर्वादाने तो ठीक झाला आणि आपला रुद्र अवतार बाईला दाखवू लागला. बाईंनी केलेल्या साधनेवर जाप पडला आणि त्यामुळे ती आजवर नवऱ्याच्या छळाला बळी पडत आली आहे. अनेक उपाय तिच्यासाठी विफल झाले, गुरूच्या आदेशापुढे जाण्याचा शहाणपणा तिला पुरता नडला, या यातनातून मला बाहेर काढा असे, पण मी शेवटी आदेशापुढे काही नाही.,…… आज मितीस तिने आपल्या नवऱ्यापासून फारकत घेऊन आपल्या मुलासोबत वेगळी राहत आहे. मुलाचे लग्न एका सुशील मुलीबरोबर झाले. नोकरीही उत्तम आहे. ते सर्व एका छोटाशा कुटुंबात सुखी आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: