google336aa3038a7d075c.html

The company of a wicked man

','

' ); } ?>

Reality – सत्य अनुभव – 45

It’s hard to find a person who doesn’t have a problem!
Photo by Sofia Garza from Pexels

One day a newcomer came to see me, and she was distraught. She wanted to tell me something, but she didn’t dare. Eventually, she began to express her grief, saying that her father used to come every day drinking alcohol, arguing a lot with her mother, beating her, and me, punishing her for not giving her food for hours. I have to steal it from their wallet because I don’t pay my school fees on time. I have got into the habit of gutkha due to this intense stress. Free me from all this trouble. The torture was visible on her awkward body. I felt so sorry for her and her age. There are weird problems in this world, but it’s hard to find a single person who doesn’t have a problem!

She certainly didn’t have the money to buy anything; she had borrowed money from her neighbor. Seeing her miserable condition, I gave her some items and nathbhasma and taught her to use it regularly. She fell at my feet, crying and left for her home. A few days later, she got a call that my dad is now paying proper attention at home. And their alcohol intake has also decreased, but my gutkha habit is not entirely gone, but I feel better. May your blessings be with me forever. I said thank you, Nathan. Keep chanting this mantra Om Chaitanya Gorakshanathaya Namah every day; it will benefit your life.

People with different thinking tendencies come in contact with me (seekers, beggars, cons) have a similar effect on the mind. But being Nathan’s cousin, I have persevered to this day.

समस्या नाही असा एकही माणूस मिळणे कठीण!

एके दिवशी माझ्याकडे नववीत शिकणारी मुलगी भेटीला आली ती खूप गांगरलेली होती. तिला मला काही सांगायचे होते पण तिची हिम्मतच होत नव्हती. शेवटी तिने आपली व्यथा सांगायला सुरुवात केली, ती सांगत होती की तिचे वडील रोज दारू पिऊन येतात आई बरोबर खुप भांडतात तिला व मला मारतात, जेवण देत नाही ही तासन् तास शिक्षा करतात. माझ्या शाळेची फी वेळेवर न दिल्याने मला ती त्यांच्या पाकिटातून चोरावी लागते. त्यात मला या तीव्र त्रासामुळे गुटख्याची सवय लागली आहे. मला या सर्व त्रासातून मुक्त करा. तिच्यावर झालेला अत्याचार तिच्या बेढप शरीरावरून चक्कपणे दिसत होता. मला तिला व तिच्या वयाला पाहून खूपच दया आली. या जगात चित्रविचित्र समस्या असतात पण समस्या नाही असा एकही माणूस मिळणे कठीण

Photo by Ketut Subiyanto from Pexels

तिच्याकडे काही वस्तू घ्यायला निश्चितच पैसे नव्हते, ती माझ्याकडे तिच्या शेजारच्याकडून उसने पैसे मागून आली होती. तिची दयनीय अवस्था पाहून मी तिला काही वस्तू व नाथभस्म दिला व त्याचा नियमित योग्य वापर करण्याचे शिकवले. ती रडत रडत माझ्या पाया पडली आपल्या घरी निघून गेली. काही दिवसांनी तिचा फोन आला की माझे बाबा आता घरात व्यवस्थित लक्ष देत आहे. व त्यांचे दारूचे प्रमाणही कमी झाले आहे, परंतु माझी गुटख्याची सवय पूर्णपणे गेलेली नाही, पण मला बरे वाटत आहे. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू द्या. त्यावर मी म्हटले तू नाथांचे आभार मान. रोज ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र जपत रहा ते तुझ्या आयुष्याचे कल्याण करतील.

विविध विचार प्रवृत्तीचे लोक माझ्या संपर्कात येत असतात, (साधक, याचक, बाधक ) यांच्या सानिध्याने मनावर तसतसे परिणाम होत असतात. परंतु नाथांची कास असल्याने आजवर मी तग ठेवून आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: