Site icon Spiritual-communions

Reality_44

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा

एकदा माझ्याकडे केतकर नावाचा मुलगा वाशीवरून भेटीसाठी आला.  त्यांचे गुरू श्री. दांडेकर (अप्पा) यांनी पाठविले होते. माझे एकंदर स्वरूप व प्रथा काय आहे हे त्यांना जाणून घ्यायचे होते. त्यात केतकर यांनी आपली समस्या मांडली होती. त्याला व्यवस्थित नोकरी नव्हती, तसेच त्याचे एका मुसलमान मुलीशी प्रेमसंबंध होते, परंतु घरचे तयार नव्हते. तसेच मुलीचे नातेवाईक केतकरांच्या जीवावर उठले होते. 

नाथांच्या आदेशाने त्याचा विवाह झाला. त्याला नोकरी ही चांगली मिळाली. परंतु जीवब्रह्मसेवेसाठी काहीही करण्याची त्याची तयारी नव्हती. त्याच्या ओळखीने “ताई” आल्या ज्या त्यांच्या ग्रुपमध्ये थोड्या श्रेष्ठ होत्या. ताई व त्यांच्या नवऱ्यात फारकत होती, तसेच काही महाराजांकडून त्यांची घोर फसवणूक झाली होती. त्यांना शारीरिक पीडाही होत असे, विशेष करून अमावस्या-पौर्णिमेला. 

माझ्याकडून एकदा त्यांच्यावरून उतारा करायचे ठरले त्याप्रमाणे तसे केलेही, त्याने ताईंना खूप बरे वाटले. उताऱ्यातील सर्व वस्तूंची माझ्याकडून माहिती करून घेतली. “यापुढे हा उतारा आपण आपलाच करून घेऊ” असे  त्यांचे गुरु व ताईनी ठरवले. एका माणसाला पकडून त्यांच्याकडून वरील उतारा करून घेतला व त्याचा दुष:परिणाम झाला. ताईंनी थेट बिछाना पकडला. मी रिटायर्ड झाले की तुमच्या गुरुकुलाला आर्थिक मदत करीन. काही महिन्यांनी त्या रिटायर्ड झाल्या, परंतु त्यांनी आमच्याकडे कायमची पाठ फिरवली (गरज सरो वैद्य मरो.)

Photo by Antonio Dillard from Pexels

त्यांच्या ग्रुपमधला महेंद्र जो बाहेरगावी जाण्यासाठी खूप प्रयत्न करीत होता, त्याला ताईंच्या गुरूंकडून अपयश येत होते, परंतु आपल्या नाथांच्या आदेशाने त्याला परदेशी जाण्याचा योग आला.  मला हा लंडन वरून फोन करीत असे व मला बाबा संबोधून मी तुमच्या गुरुकुलासाठी मदत करीन असे वेळोवेळी आश्वासन देत असे, परंतु प्रत्यक्षात मदतीच्या नावाखाली त्यांनी अनेक सबबी दिल्या.

केतकरांची आई तहसिलदाराकडे कामाला होती तिचे कोर्ट मॅटर सुरू होते. नोकरीवर शत्रूचा त्रास होत होता. त्याही रिटायर्ड होण्याच्या मार्गावर होत्या.  “महाराज मी तुमच्या गुरुकुलाला नक्की मदत करीन, मी इतराप्रमाणे बेईमान होणार नाही.” तशी त्यांनी पुस्ती जोडली होती. त्यांचे सर्व कामे झाल्यावर त्यांनी आपले हात वर केले व आम्हाला टाटा केला. 

खरं तर ह्या सर्व मंडळीकडून मला कोणत्याच अपेक्षा नव्हत्या. परंतु या सर्वांची मनोवृत्ती सारखीच होती. हे कटाक्षाने जाणवत होते. परंतु मी घेतलेल्या जीवन ब्रह्म सेवेच्या व्रतासाठी मी त्यांची सेवा करीत होतो.
पदोपदी अशा नाना प्रकारच्या व्यक्तींशी माझा परिचय होत असतो. आपली कामे होईपर्यंत अनेक शपथा घेतात परंतु जसे काम झाले की, “कोण आणि कुठला गुरू ?” अशाही कारणाने अध्यात्म बदनाम होत चालले आहे आणि त्यात काही भोंदूची भर पडल्यामुळे श्रद्धेला अंधश्रद्धेचा मुलामा चढला आहे. त्यात खरे कोठे सारेच पीसले जात आहे.

Extremely Stupid

Once a boy named Ketkar came to visit me from Vashi. His mentor Shri. It was sent by Dandekar (Appa). They wanted to know what my overall appearance and practice was. In it, Ketkar had presented his problem. He did not have a proper job, and he had an affair with a Muslim girl, but he was not ready for home. Also, the girl’s relative Ketkar was going to be killed.

He got married to Nathan’s orders. He got a good job. But he was not ready to do anything for Jivabrahmaseva. His acquaintance came from “Tai” who was a little superior in his group. Tai and her husband were separated, and some maharajas betrayed them. They also suffered from physical pain, especially during the new moon-full moon.

He did it just as I had once decided to do, but he was pleased. All the items in the transcript were learned from me. “From now on, we will make this excerpt our own,” his guru and aunt decided. He grabbed a man and took the excerpt from them, and it had an adverse effect. She grabbed the bed directly. I will help your Gurukul financially when I retire. She retired a few months later, but she turned her back on us forever.

Photo by WoodysMedia from Pexels

Among his group, Mahendra, who was trying very hard to go abroad, was getting failure from his mother’s guru, but he was allowed to go overseas by order of his grandfather. He used to call me from London and call me Baba and assure me from time to time that I would help your Gurukul, but in reality, he gave many excuses in the name of help.

Ketkar’s mother was working for the tehsildar. The enemy was harassing the job. She was also on the verge of retiring. “Maharaj, I will help your Gurukul. I will not be dishonest, like others.” That’s how he added the book. When all their work was done, they raised their hands and greeted us.

I had no expectations from the congregation. But all of them had the same attitude. It was palpable. But I was serving them for the vow of Jeevan Brahma Seva that I took.

Gradually I get acquainted with different types of people. Many take oaths until their work is done, but as the work goes on, “Who and what guru?” Due to such reasons, spirituality is being discredited, and due to the addition of some lies, faith has become covered with superstition where the truth is being grounded.

Exit mobile version