google336aa3038a7d075c.html

Real Experience-सत्य अनुभव-Episode-43

','

' ); } ?>

करावे तसे भरावे

आमच्याकडे सतीश नावाचा मुलगा ऑफिस कामासाठी येत असे, एके दिवशी त्यांनी त्याच्या बहिणीला (रेखा हिला) तिच्या समस्यासाठी घेऊन आला. तिचा दोन  महिन्यापूर्वीच प्रेमविवाह  मोडला होता व तिने दोन वेळा जीव देण्याचा प्रयत्न केला होता. तिला अनेकांनी सहानुभूतीच्या नावाखाली सर्वस्वी फसवले होते. तिला माझ्याकडे साधना करून खंभीर व्हायचे होते. माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तींचे निराकरण केले केलेले सतीशने त्याच्या बहिणीला सांगितले  होते.

नाथांचा आदेश घेऊन मी तिला साधना कशी करावी याची सुरुवात केली, नाथ समाधीस्थळी तिला नेऊन बीज मंत्र देऊन पुढचा मार्ग दाखवला, त्याप्रमाणे ती  नित्यनेमाने माझ्या घरी साधना करायला लागली परंतु साधना झाल्यावर काय करावे? आपण पैसे न देताच असेच त्यांच्याकडे राहतो आहे, याचा तिला त्रास होऊ लागला. तसे त्या बाबतीत तिला कोणी बोलले नव्हते परंतु काहीतरी सेवा हातून घडावी म्हणून तिने आमच्या घरी  घरकामाला सुरुवात केली.

Photo by Masha Raymers from Pexels

ती जसजशी साधना करत होती तसतशी तिच्या अंगातून दुर्गंधी येत असे. तिच्यावर असणारी पीडा बाहेर पडत होती ती इतकी होती की तिला स्वतःला ते सहन होईना! साधनेच्या काळात तिला अनेक आत्मिक अनुभव आले माझ्यासोबत ती लोकांकडे पूजेला (हवनाला) सोबतीला म्हणून येऊ लागली. तिला ही श्रद्धेने नमस्कार करू लागले. जीवन किती आनंदी आहे आणि आपण प्रत्येक वेळेस हताश व निराश होऊन जीव देण्याचा प्रयत्न करीत आलो याची तिला लाज वाटू लागली.

दिवसामागून दिवस जात होते माझ्याकडे इतरही मंडळी येत असे. त्यांच्याशी झालेली जवळीक रेखाला आवडत नसे. तिला असे वाटे की केवळ सरांची (माझी) सेवा फक्त मीच करावी परंतु समान हक्कामुळे तिला खूप त्रास होत होता, त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या व्यक्तींकडे तिची वादावादी होऊ लागली. तिची सीमारेषा नाथांनी निश्चित केली. मी तिला दुसऱ्या ठिकाणी कामावर लावले, परंतु आमच्याशी लळा लागल्याने तिला ते खूप कठीण जात होते ती स्वाधिष्ठान चक्रावर नापास झाली होती.

ज्या भावाने सतीशने आमच्याकडील नोकरी सोडून नको त्या नादाला लागला होता मी त्याला वारंवार सूचना दिल्या त्यावर त्याने त्या वेळेस केवळ दाखवण्यासाठी शपथा घेतल्या परंतु नंतर जैसे थे!
काही दिवसापूर्वीच  कळले की, सतीशला एड्स झाला आहे व त्याची प्रकृती खालावत चालली आहे. परंतु करावे तसे भरावे या उक्तीप्रमाणे त्याला शिक्षा मिळाली होती. केवळ त्याच्या अनैतिक कृत्याची शिक्षा त्याला नाथांनी दिली. त्यांच्या सर्व कुटुंबांना त्याचा पश्चाताप होतो आहे परंतु नाथआदेशापुढे काही नाही…..

Fill as you should

A boy named Satish used to come to us for office work; one day, he brought his sister (Rekha Hila) for her problem. Her love affair had ended two months ago, and she had tried to give up her life twice. She was deceived by many in the name of sympathy. She wanted to be secure by doing Sadhana with me. Satish had told his sister that he had solved the problem of people coming to me.

Taking Nath’s order, I started doing Sadhana for her. Nath took her to the tomb and showed her the way forward by chanting the Beej Mantra. She started bothering us that we are living with them without paying. No one told her about it, but she started doing housework in our house to get something done.

As she was doing Sadhana, her body started smelling bad. The pain was so intense that she could not bear it herself! During Sadhana, she had many spiritual experiences. She started coming to people with me as a companion for worship (Havana). She began to greet him with faith. She began to feel ashamed of how happy life was and how desperate and frustrated we were each time.

Photo by Orione Conceição from Pexels

Day after day, other congregations came to me. He didn’t like the closeness with them. She felt that I should be the only one to serve Sara (me), but she was suffering a lot because of equal rights, so she started arguing with the people who came to me. Nathan fixed its boundaries. I hired her in another place, but she was having a hard time with us, and she had failed in the Swadhisthan Chakra.

The brother who had told Satish that he did not want to leave our job, I repeatedly instructed him, but he swore to show it at that time, but then it was like that!

A few days ago, it was learned that Satish had contracted AIDS, and his health was deteriorating. But he was punished as he was told to pay. Only Nathan punished him for his immorality. All his family is regretting it, but there is nothing before Nath Aadesh…

Leave a Reply

%d