google336aa3038a7d075c.html

Real Experience-सत्य अनुभव-Episode-42

','

' ); } ?>

खऱ्याला मरण नाही

कल्याणहुन विरकर नावाचे गृहस्थ माझ्याकडे त्यांच्या समस्या घेऊन आले. त्यांच्या पत्नीने घटस्फोटाची मागणी केली होती. परंतू  विरकरांना घटस्फोट नको होता.  परंतु बायकोच्या घरचे खूप त्रास देत होते. वीरकर खूप त्रस्त झाले होते. त्यांनी त्यासाठी जंगजंग पछाडले. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच येत होती. त्यांच्या कोणत्याही कार्यात यश मिळेनासे झाले.

एके दिवशी त्यांना कल्याण स्टेशनला सोहम भगवती “स्वामी समर्थ विशेषांक” मिळाला.  स्वामींची इच्छा असावी, या प्रेरणेने त्यांनी सोहम कार्यालयात फोन करून भेटण्याची इच्छा दर्शवली व त्याप्रमाणे ते येऊन भेटले. त्यांचे त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम होते. परंतु पत्नी संशयी वृत्तीची होती. तिला स्वतंत्र संसार थाटायचा होता. खरं तर त्यांच्या घरी फक्त सासुबाई एकट्याच होत्या किंवा इतर कोणीही नातेवाईक यांच्या सोबत नव्हते. तरीही विरकरांच्या पत्नीला वेगळे राहायचे होते. त्यांना कुठलेही व्यसन नव्हते. त्यांची मिळकतही तशी चांगली होती. परंतु पाच वर्षानंतर ही त्यांना अपत्य झाले नव्हते..

Photo by Rio Kuncoro from Pexels

कदाचित या मानसिक ताणाने सौ. वीरकर बेताल झाल्या होत्या. नवीन वास्तूत संसार का करावा याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते त्यांना कुणीतरी तुमच्या वास्तूत दोष आहे. तुम्हाला ही वास्तू बदलावी लागेल असे सांगितले होते. चुकीचे मार्गदर्शयामुळे त्यांचा संसार मोडकळीला आला होता.

आपल्या प्रथेप्रमाणे श्री विरकराची संपूर्ण माहिती घेतली व त्यांचा प्रश्न नाथांचा समोर मांडला. त्यावर त्यांना शिव यागाचा आदेश आला होता. व काही दुर्मिळ वनस्पती जवळ बाळगण्याचे संकेत मिळाले. शिवयागाचा आणि माझ्या संसाराचा काय संबंध आहे? हे काही विणकरांना कळेना शेवटी माझ्या शब्दावर विश्वास ठेवून, ते शिवयागाला तयार झाले. ज्या दिवशी शिवयाग होता, त्यांच्या दुसर्‍या दिवशी त्यांच्या केसची सुनावणी होती. हवनाच्या दिवशी मी त्यांना धीर देत म्हटले की, आदेश आहे तेव्हा तुम्ही अजिबात धीर सोडू नका. परमेश्वर नक्की चमत्कार करू शकतो. यावर विश्वास ठेवा माझ्या सांगण्याने विरकरांना खूप धीर आला.
दुसऱ्या दिवशी विरकरांच्या जजने दोघांनाही सामोपचाराची सूट दिली व काही कालावधी राखून ठेवला. त्या कालावधीत श्री. विरकरांची समेट घडून आली. विनाशर्त सौ. विरकर पुन्हा संसार करण्यासाठी उत्सुक होत्या.  या चमत्काराने श्री विरकरानी मला फोन केला व मी आपला शतशः ऋणी असल्याचे बोलून दाखवले. नंतर श्री विरकरांच्या आईनेही मला धन्यवाद दिले. त्यांच्या या सुखामुळे मलाही माझ्या अभ्यासाचा फार फार आदर वाटू लागला.  नाथांच्यापुढे शरण जात केवळ मी आदेश आदेश बोलू लागलो……

The truth is not death

A householder named Virkar from Kalyan came to me with his problems. His wife had filed for divorce. But Virkar did not want a divorce. But his wife’s house was very troublesome. Veerkar was very distressed. They fought for it. But every time his pastor was disappointed. He did not succeed in any of his endeavors.

One day he got Soham Bhagwati “Swami Samarth Special” at Kalyan station. Inspired by Swamiji, he called Soham’s office and expressed his desire to meet him. He loved his wife very much. But the wife was skeptical. She wanted an independent world. Their mother-in-law was alone in their home, and no one else was with them. Still, Virkar’s wife wanted to separate. They had no addictions. His income was just as good. But after five years, they did not have children.

Probably due to this mental stress. Veerkar had become absurd. They didn’t have the answer as to why the world should be built in a new architecture. Someone is to blame for your architecture. You were told to change the structure. The wrong guidance ruined his life.

Photo by TOPHEE MARQUEZ from Pexels

As per his custom, he took complete information from Mr. Virkara and asked his question to Nath. He was ordered to perform Shiva Yaga. And some rare plants. What is the relationship between Shivayaga and my world? Some weavers did not understand this, and finally, believe my word, they prepared Shivayaga. On the day of Shivayag, his case was heard the next day. On the day of Havan, I reassured them, saying, “Don’t be impatient when there is an order.” The Lord can do miracles. My words made Virkar very patient.

The next day, Virkar’s judge granted relief to both of them and remanded them for some time. During that period, Shri. Virkar was reconciled. Unconditionally Virkar was eager to make a living again. With this miracle, Mr. Virkarani called me and said that I am indebted to him. Later, Mr. Virkar’s mother also thanked me. Their happiness made me respect my studies very much. Surrendering in front of Nathan, only I started saying orders ……

Leave a Reply

%d