google336aa3038a7d075c.html

Mantra knowledge

बीज मंत्रा अगोदर थोडे खाली बाबींचा विचार करूया… 

कोणत्याही सिद्धीची व बीज मंत्र, गुरुमंत्र, मूलमंत्र, महा बीजमंत्र अशा अनेक प्रकारात मोडणारे मंत्रांची साधना करताना,  त्या त्या मंत्रांचा एकाग्रतेने जप करायचा असतो. मंत्रजपाचे वाचिक, उपांशु, मानसिक असे तीन प्रकार आहे व चौथा अजपाजप हा दिव्य जप आहे.

वाचिक – जप करताना मंत्रांचा उच्चार दुसर्‍याला ऐकू येईल, इतक्या मोठ्याने केला तर त्याला वाचिक जप म्हणतात.

उपांशु – मंत्रांचा उच्चार केवळ आपला आपल्याला ऐकू येईल दुसर्‍याला ऐकू जाणार नाही, अशा रीतीने केला तर त्याला उपांशु जप म्हणतात.

मानसिक – ओठ व जीप जरासुद्धा न हलवता मंत्रांचा उच्चार केवळ आपल्या सूक्ष्म श्रवेंणद्रियाला ऐकू येईल, अशा पद्धतीने मनातल्या मनात केला जातो. अशा जपास मानसिक जप म्हणतात.

वरील तिन्ही पद्धती घेऊन निघाला असा अजपाजप.  हा कोणतीही क्रिया न करता अखंड मंत्र सुरूच असतो. हा अभ्यासाने साध्य होतो, त्यास दिव्य जप म्हणतात. वरील तिन्ही प्रकारच्या जप करण्यापूर्वी ओमकाराचे ध्यान करावे. मग जप करावा. शांती कर्मात उपांशु जप, संमोहनात मानसिक, विद्वेषण कर्मात वाचिक जप करावा लागतो.

प्रत्येक साधनेसाठी आसन हे वेगळे असते. जसे लोकरीच्या कपड्याचे, घोंगडी, दर्भाचे, मृग चर्म,  अश्व आसन…कुर्म चक्रावर वरीलपैकी योग्य ते आसन पसरवून बैठक करावी. स्वस्तिकासन, भद्रासन, कुक्कुटासन, पद्मासन, सिंहासन प्रत्येक साधनेसाठी वेगळी बैठक करावी.

शांती कर्मासाठी – मोत्याच्या मण्याची किंवा रुद्राक्षाच्या मण्यांची माळ वापरावी. 

संमोहनासाठी – पोवळ्याची, हिऱ्याची किंवा रत्नांची माळ असावी. 

आकर्षणासाठी – हस्तिदंत मण्यांची माळ.

स्तंभनासाठी  – मोत्याची माळ.

उच्चाटणासाठी  – घोड्यांच्या दातांच्या मण्यांची माळ.

धर्म अर्थ व काम – ह्यांच्या सिद्धीसाठी शंख, मोत्ये किंवा पवित्र वस्तूच्या मण्यांची माळ.

सर्व कामना सिद्धीसाठी – रुद्राक्षाची माळ.

लक्ष्मी, सरस्वतीच्या साधनेसाठी – स्फटिकाची माळ वापरली जाते.प्रत्येक साधनेत  मणीसंख्या,अंगुली नियम, दिशा वेगवेगळ्या असतात.


विशेष निर्देश –  साधकाने मंत्र-तंत्रादीचा  प्रयोग करण्यापूर्वी कुठल्याही ज्ञानी गूरूच्या जवळ बसून त्यांच्याकडून समस्त क्रिया विषयी पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे.  त्यानंतर भक्ती तसेच प्रबळ आत्मविश्वासाने गुरु आज्ञा प्राप्त करून साधना करण्यास प्रवृत्त व्हावे. ज्या दिवसापासून कुठलेही कर्म करावयाचे असेल तेव्हा प्रार्थना नित्य कर्मापासून निवृत्त होऊन एकांत ठिकाणी म्हणजे देव स्थान नदीत आपल्या देवघरात स्वच्छता पूर्वक साधनेसाठी अनुष्ठान करावे. 


या वेळी खालील गोष्टींची दखल घ्यावी.
  • गुरुवर संपूर्ण विश्वास ठेवा व समर्पण करा.
  • मंत्रावर आत्मविश्वासाने लक्ष केंद्रित करा.
  • मनात चंचलता नको.
  • साधना करतेवेळी भयभीत होऊ नये.
  • आपला मंत्र दुसऱ्याला सांगू नये.
  • जोपर्यंत अनुष्ठान पूर्ण होत नाही तोपर्यंत स्थान बदलू नये.
  • प्रारंभापासून समाप्तीपर्यंत दीप, धूप, आसन, माळ वस्त्रांचे परिवर्तन करू नये.
  • मादक पदार्थांचे सेवन करू नये.
  • भूमीवर शयन करावे.
  • वस्त्र नेहमी धूऊन वापरावे.
  • स्नान-ध्यानानंतर अनुष्ठान करावे.
  • कपाळास भस्म किंवा चंदन लावावे. शुद्ध तुपाचा दिवा लावावा. संयम ही सिद्धीची पहिली पायरी आहे. अनुष्ठान नंतर हवन करावे, तसेच श्रद्धेनुसार ब्राह्मण भोजन करावे.
  • सद्गुरु सानिध्यात असावे. शंका-कुशंका त्याकाळात काढू नये.
  • काही कारणास्तव अडथळा आलाच तरी पुन्हा दृढनिश्चयाने साधनेस प्रारंभ करावा. कारण चिकाटी व जिद्द ही दुसरी पायरी आहे. वरील निर्देश साधकाला साधना काळात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये व त्याचे मनोरथ पूर्ण सफल व्हावे याकरिता आहे.
  • प्रत्येकाच्या जीव तत्वानुसार बीजमंत्र, महाबीज मंत्र, अनुग्रहित केले जातात. अर्थात हा मंत्र मिळाल्यावर अध्यात्माच्या साधनेचा पाया रचण्यास आपणास मिळाला असे समजावे.  कारण बीज मंत्र हा इतर मंत्राचा मुख्य पाया आहे. कारण तत्त्वानुसार ज्याला जो बीजमंत्र मिळतो त्याने त्याची कुंडलिनी जागृतीची सुरुवात होते. तसेच त्यातील देवता ह्या साधकाची अनेक तऱ्हेने परीक्षा घेऊन शेवटी त्यावर प्रसन्न होऊन जाते व साधकाला पुढील अध्ययनात अधिकाधिक रुची निर्माण होते. बीजमंत्रसाठी केवळ दृढ विश्वास व गुरुनिष्ठा भक्ती प्रेम हे असावे लागते, थोडक्यात समर्पणाची भावना असावी लागते.  कारण बीजमंत्र देण्याची प्रथा फार कमी आहे. त्याला जो मिळाला तो योग्य टिकवला पाहिजे. ज्यांचा परमेश्वरावर विश्वास नाही, त्यांनाही याची प्रचिती आल्याखेरीज राहणार नाही. परंतु त्यासाठी जिद्द असावी लागते. तूप खाऊन रूप येण्याच्या गोष्टी करू नये.  कारण हा डोंबाऱ्याचा खेळ नाही की, सिद्ध करून दाखवा म्हटलं आणि सिद्ध झालं, तर ते असे नाही. सातत्य-अभ्यास याची नितांत जोड असावी लागते. खऱ्या अध्यात्म प्रेमींना याची प्रचीती आल्यावाचून राहणार नाही. असा माझा अनुभव आहे. “अपनी अंतरात्मा को इतना जागृत करो, की जो चाहे वही हो.”  हे साईनाथांचे सत्य वचन आहे.
  •  तसेच बीजमंत्राची ज्याला मिळे गोडी त्याला ही दुनिया बहुत थोडी असेच म्हणावे लागेल. ह्याअंतरंगातून व बहिरंगातून चमत्कार पहावयास मिळतात. पण त्यासाठी तितकी साधना आवश्यक आहे.
  • वरील विवेचनावरून आत्तापर्यंत आपणास हे समजले असेलच की गुरु व शिष्य, मंत्र व त्याची शक्ती या किती साम्य व ताकद आहे. पुढील प्रकरणात आपण बीजमंत्र घेतल्यावर किंवा त्राटक व इतर मंत्राद्वारे कुंडलिनी जागृती कशी होते, यावर दृष्टीक्षेप करणार आहोत.
Let’s think about the following things a little before the Beej Mantra …

While practicing any achievement and breaking mantras like Beej Mantra, Gurumantra, Moolamantra, Maha Beej Mantra, one has to chant those mantras with concentration. There are three types of mantra Japa, verbal, upanshu, mental, and the fourth ajapajapa is divine chanting.

Vocal – The chanting of mantras can be heard by others while chanting, so loud it is called vocal chanting.
Upanshu – Mantras are chanted in such a way that only you can hear them and not others.
Mental – The chanting of mantras is done in mind in such a way that only your subtle auditory can be heard without moving your lips and jeep at all. Such chanting is called mental chanting.

Ajapajap took the above three methods. This continuous mantra continues without any action. This is achieved through practice; it is called divine chanting.
Meditate on Omkara before chanting the above three types. Then chant.

The seat is different for each device. Like woolen cloth, blanket, darbha, deerskin, horse seat …
Sit on the Kurma Chakra by spreading the seat as appropriate as above. Swastikasana, Bhadrasana, Kukkutasana, Padmasana, Simhasana should be done separately for each instrument.

For Shanti Karma – Use a string of pearl beads or Rudraksha beads.
For hypnosis – there should be a necklace of pearls, diamonds, or gems.
For attraction – a necklace of ivory beads.
For the pillar – a string of pearls.
For exfoliation – Horseshoe beads.
Dharma means and works – a necklace of conch shells, pearls, or sacred objects for their accomplishment.
For the fulfillment of all desires – Rudraksha necklace.
Lakshmi, for the instrument of Saraswati – a string of crystals is used.
Each tool has a different number of beads, finger rules, directions.

Special Instructions – Before practicing Mantra-Tantradi, the seeker should sit near any wise Guru and get complete knowledge about all the Kriyas from him. After that, one should be motivated to do sadhana by receiving Guru’s orders with devotion and strong self-confidence. From the day on which any karma is to be performed, the prayer should be retired from the nitya karma, and the ritual should be performed in a secluded place i.e., in the river Deva Sthan in your Deoghara for a clean instrument.

The following should be noted at this time.

  • Have complete faith in Guru and surrender.
  • Focus on the mantra with confidence.
  • Don’t be fickle in mind.
  • Don’t be afraid while doing sadhana.
  • Don’t tell your mantra to others.
  • The place should not be changed until the ritual is completed.
  • Lamps, incense, seats, garments should not be changed from beginning to end.
  • Do not use drugs.
  • Lie on the ground.
  • Clothes should always be washed and used.
  • A ritual should be done after bath-meditation.
  • Apply bhasma or sandalwood on the forehead. Light a pure ghee lamp. Patience is the first step to success. Havan should be performed after the ritual, as well as Brahmin meal according to the faith.
  • Sadguru should be in the company. Doubts should not be removed at that time.
  • Even if, for some reason, it gets interrupted, you should start the tool again because perseverance is the second step. The above instruction is for the seeker not to face any difficulty during the period of sadhana and for his aspiration to be ultimately successful.
  • Beej mantras, Mahabeej mantras, are graced according to the life principle of each. Of course, after receiving this mantra, it should be understood that you have got to lay the foundation of the tool of spirituality because the seed mantra is the main foundation of other mantras. Because according to the principle, whoever receives the Beej Mantra, his Kundalini awakening begins. Also, the deity in it tests the seeker in many ways and finally becomes pleased with him, and the seeker becomes more and more interested in further studies. For Beej Mantra, one has to have an only strong faith and Gurunishtha Bhakti Prem, in short, a sense of dedication. Because the practice of giving seed mantra is sporadic. He should get what he deserves. Even those who do not believe in the Lord will not live until it is realized. But it takes perseverance. Don’t eat ghee to make things look good. Because this is not a game of dumbass, if you say prove it and prove it, then it is not like that. Continuity-study has to be an integral part of this. True spiritual lovers will never fail to realize this. That is my experience. “Awaken your conscience as much as you want.” This is the right word of Sainath.
  • Also, whoever gets the sweetness of the seed mantra has to say that this world is tiny. Miracles can be seen from inside and outside. But it requires so much sadhana.
  • From the above discussion, you must have understood by now that the Guru and the disciple, the mantra, and its power are very similar and powerful. In the next case, we will look at how Kundalini awakening occurs after taking the Beej Mantra or through Tratak and other mantras.
  • Easy to use Produce less smoke very easy for cleaning, Heavy Duty Coil.
  • It is used for burning incense which is to the gods and goddesses or for aroma.
  • Electric Burner saves your time in burning charcoal and also produces less smoke.
  • Bakhoor Burners /Dhoop Dani / Incense Burner are a beautifully ornate way of filling your rooms full of wonderful fragrances.
  • Insert the plug into the socket and switch on the button for few minutes and put some Bakhoor / Dhoop / Incense on the top plate & Enjoy.DO NOT LET IT ON FOR MORE THAN 10 MINUTES

25% OFF OFFER

Odishabazaar Electric Camphor Diffuser for Home Office Temple God Puja

1 thought on “Mantra knowledge”

  1. Pingback: Mantra knowledge — Spiritual-communions | Mon site officiel / My official website

Leave a Reply

%d bloggers like this: