
कोणतीही नवी वास्तू विकत घेतल्यानंतर तेथील वास्तू देवता प्रसन्न व्हावी व आपले तेथील वास्तव्य सुखाचे व्हावे यासाठी वास्तुशांती करण्याची प्रथा आहे. घरात कोणाचा मृत्यू झाल्यास उदक शांती करून घ्यावी. वास्तु शांती साठी योग्य मुहूर्त पाहणे आवश्यक असते. वास्तुशांतीसाठी किंवा अन्य कोणत्याही शुभकार्यासाठी गुरु, शुक्र यांचा काल पूर्णपणे वर्ज्य समजावा. या शांतीसाठी वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, कार्तिक मार्गशीर्ष व फाल्गुन हे महिने योग्य सांगितलेले आहे.
त्याज्य तिथी – चतुर्थि, नवमी, चतुर्दशी या तीन रिक्ता तिथि तसेच व वृद्धी तिथी त्याचप्रमाणे कृष्ण त्रयोदशी पासून शुद्ध प्रतिपदा पर्यंतचे चार दिवस.
त्याज्य वार – रविवार व मंगळवार त्यांच्या योग व्यतिपात , वैधृती पूर्ण व काही योगांच्या पहिल्या काही घटिकावर्ज दिन- करिदिन, भद्रा ( विष्टि )
ग्राह्य नक्षत्रे – अश्विनी, रोहिणी, मृग, पुनर्वसु, पुष्य, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, अनुराधा, मूळ, उत्तराषाढा, श्रवण , धनिष्ठा, उत्तराभाद्रपदा व रेवती. घरात कोणाच्या मृत्यू झाल्यास उदक शांती करून घ्यावी. पंचांगाचे मुहूर्त दिलेले असतात त्यांचा उपयोग करावा त्या व्यतिरिक्त मूहुर्त हवे असल्यास तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा. घरावर छप्पर बांधल्याशिवाय वास्तुशांत करू नये.
वास्तुबंधन
वास्तुशांती प्रमाणे घराचे वास्तुबंधन करून नवनाथयाग, दत्तयाग करणे आवश्यक आहे. वास्तुबंधनाच्या क्रियेत नाथपंथीय पद्धतीने वास्तूचे नजर दोष काढून, नाथांचे विशिष्ट तांत्रिक वनस्पती द्वारे हवन केले जाते. वास्तूचे चारी कोपरे सुरक्षित केले जातात. तसेच वास्तू रक्षणासाठी दरवाजाच्या आतील बाजूस लावावयास नारळ दिला जातो. वास्तु बंधन केल्यामुळे तेथे राहणारे कुटुंब 100% सुरक्षित होते. अनिष्ट क्रियेचे प्रयोग त्या वास्तूत चालत नाही. नाथांचा वरदहस्त त्या घरावर राहतो. ज्या व्यक्तीचे घर भाड्याचे आहे. त्यांनी तात्पुरते वास्तुबंधन करून दत्तयाग करून घ्यावा. तसेच आपल्या राहत्या वास्तूत दरवर्षी नवनाथयाग अथवा दत्तयाग करावा.
वास्तूत प्रवेश कधी करावा ?
प्रवेशकाळी स्थिर लग्न असावे. ( वृषभ, सिंह, वृश्चिक, वा कुंभ ) मेष, कर्क, तूळ व मकर ही चार लग्ने वर्ज्य करावेत.वास्तुप्रवेश दिवसाच करावा.गृहप्रवेश व पायाभरणी रात्रीच्या वेळी केल्यास घर मालकास अनेक उपद्रव होतात.घरातील एखादी स्त्री गरोदर असता वास्तुशांती, गृहारंभ अथवा पायाभरणी करू नये.ज्या घरावर छप्पर नाही अगर ज्यांची दारे बसविलेले नाही. अशा घरात कधीही प्रवेश करू नये. वस्ती तर कधीच करू नये.वास्तुशांती केल्याखेरीज नव्या घरात राहण्यास जाऊ नये, असे नाही . काही अडचणी असल्यास वास्तुशांत न करताही रहावयास जाण्यास हरकत नाही. परंतु अशा वेळी गृह यज्ञ अवश्य करावा. त्यादिवशी शुभमुहूर्तावर हळद-कुंकू पाणी भरलेल्या स्वच्छ तांब्या, दही , फळे घरात नेऊन ठेवावे. नंतर मुहूर्ताच्या वेळी यजमान दही, अक्षदा, गंध, पंचपल्लव, फुले व पाने घेतलेला एक कलश हातात घेऊन उभा राहतो व गृह प्रवेश करतो. त्यावेळी गृहा मा बिभार्त्त या मंत्राचा जप करण्याची पद्धत आहे. गृह प्रवेश केल्यावर यजमान गणपती पूजन व पुण्याहवाचन करतो .
वरील धार्मिक कृत्य करून घरात राहावयास जाण्यास हरकत नाही. त्यापूर्वी दारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावतात व दारावर शुभ-लाभ असे लिहून स्वस्तिक काढतात व दारावर मंगलमुर्ती गणेशाचे चित्र लावतात. पुढे लवकरात लवकर वास्तुशांती करून घ्यावी.
आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी….
- प्लॉट किंवा घराच्या जवळ देवालय व स्मशानभूमी नसावी. देवालयाची अथवा ध्वजाची छाया घरावर पडत असेल तर अशा वास्तूत दुःखदायक घटना घडतात.
- कोणत्याही झाडाची व विषेशत पिंपळ, वड अथवा उंबऱ या झाडाची सावली आपल्या प्लॉट वा घरावर पडू नये.
- शेजारील प्लॉटमधील सांडपाणी आपल्या प्लॉटमध्ये येऊ नये.
- आपल्या प्लॉटच्या शेजारचा प्लॉट खरेदी करावयाचा असेल तर तो पूर्वेकडील व उत्तरेकडील असावा. दक्षिण व पश्चिम दिशेकडील प्लॉट शक्यतो घेऊ नये.
- प्लॉटच्या चारही बाजूंना रस्ते असणे फार चांगले त्यातील वास्तव्य लाभदायक ठरते.
- प्लॉटच्या पूर्व व उत्तर दिशेला असलेले रस्ते अतिशय लाभदायक असतात.
- प्लॉटचे उत्तरेस वा दक्षिणेस डोंगर वा उंच इमारती असणे चांगले.
- या गोष्टी प्लॉटच्या पश्चिमेस अथवा दक्षिणेस नसाव्यात. या दिशांना नदी जलाशय वा दरी नसावी.
- प्लॉटची नैऋत्य बाजू उंच असावी व तो ईशान्येकडे उतरता असावा.
- प्लॉटमध्ये मुंगूस, ससा यांचा वावर असल्यास त्या प्लॉटमधील वास्तव्य सुखाचे होते. याउलट कोल्हा लांडगा यासारखे हिंस्त्र पशू असल्यास तो प्लॉट सुखावह होत नाही.
- प्लॉटची परीक्षा करण्यासाठी त्यात मोहरीचे बी टाकावे. तीन-चार दिवसात तेथे छोटी रोपे दिसू लागल्यास तो प्लॉट उत्तम समजावा.
- पाया खणताना लगेच पाणी लागल्यास तो प्लॉट घरबांधणीला फारसा चांगला नव्हे.
- प्लॉटच्या प्रवेशद्वाराशी सुंदर कमान बांधल्यास त्या घरातील वास्तव्य सुखावह होऊन समृद्धीही नांदते.
- प्लॉटमध्ये तुळशीवृंदावन अवश्य असावे. त्यायोगे ईश्वरी कृपा राहते.
- प्लॉटमध्ये कोणतीही काटेरी झुडपे लावू नयेत. असल्यास काढून टाकावी.
- प्लॉटमध्ये बाभूळ, चिंच , पिंपळ ही झाडेही नसावीत. कारण अशा वृक्षावर शक्तींचा वास असतो.
- प्लॉटवर उभे राहिल्यानंतर मन प्रसन्न झाल्यास तो प्लॉट आपणास लाभदायक आहे, असे समजावे.
- प्लॉटच्या शेजारी हॉस्पिटल, ओढा, नदी इत्यादी असू नये. कारण तेथे मृतात्मे यांचा वावर असण्याची शक्यता असते. तसेच शेजारी शाळा, मोटारी वा ट्रक रिपेरिंगचे गॅरेज अशा गोष्टीं नसाव्यात. कारण त्यायोगे शांतता बिघडते.

* Tips Indian architecture *
After purchasing any new Vastu, it is customary to do Vastu Shanti so that the Vastu Devta there may be pleased, and our living there may be happy. If someone dies in the house, Adak should make peace. It is necessary to see the right moment for Vastu Shanti. For Vaastu Shanti or any other good deed, the day of Jupiter and Venus should be considered wholly forbidden. The months of Vaishakh, Jyeshtha, Ashadh, Shravan, Kartik Margashirsha, and Falgun are suitable for this peace.
Discharge date – Chaturthi, Navami, Chaturdashi are the three vacant dates as well as the date of growth as well as four days from Krishna Triodashi to pure Pratipada.
Waste War – Sunday and Tuesday In addition to his yoga, Vaidhriti is complete and the first few hours of some yogaVarj Din- Karidin, Bhadra (Vishti)
Acceptable constellations – Ashwini, Rohini, Mrig, Punarvasu, Pushya, Uttara, Hasta, Chitra, Swati, Anuradha, Mool, Uttarashadha, Shravan, Dhanishtha, Uttarabhadrapada, and Revati.If someone dies in the house, make peace. The moments of the almanac are given. In addition to using them, if you want a moment, you should consult an expert astrologer.The house should not be built without a roof.
Architecture
Navanathayag, Dattayag, must be done by constructing a house like Vastushanti. In the act of architecture, the Nathpanthi method removes the eye defects of the architecture, and a particular technical plant cremates the Nath. The four corners of the building are secured. Coconut is also provided on the inside of the door to protect the structure. The Vastu Bandhan made the families living there 100% safe. The experiment of undesirable action does not work in that architecture. Nathan’s bounty stays on that house. The person whose house is rented. They should do Dattayag with temporary architecture. Also, do Navanathayag or Dattayag every year in your residence.
When to enter the building?
Admission should be a stable marriage. (Taurus, Leo, Scorpio, or Aquarius) Aries, Cancer, Libra, and Capricorn are the four marriages to be forbidden.Architecture should be done on the same day.Entering the house and laying the foundation at night causes many inconveniences to the homeowner.When a woman in the house is pregnant, she should not do Vastushanti, Griharambha, or Paabharan.A house that has no roof or no doors. Never enter such a house. Never settle down.This is not to say that you should not move into a new house unless you have peace of mind. If there are any problems, it is okay to go without living. But at such a time, a home sacrifice must be made. On the auspicious occasion of that day, clean copper, curd, fruits filled with turmeric-kumkum water should be taken home. Then at the time of muhurat, the host stands with a Kalash in his hand carrying curd, Akshara, gandha, panchapallava, flowers, and leaves, and enters the house. At that time, there is a method of chanting the mantra Griha Ma Bibhart. Upon entering the house, the host performs Ganapati Pujan and Punyahavachan.
It is okay to go and stay at home by doing the above religious act. Before that, an arch of mango leaves is placed on the door, and a swastika is drawn on the door with auspicious auspiciousness, and a picture of Ganesha is placed on the door. Next, make peace as soon as possible.
Some more important things…
- There should be no shrine or cemetery near the plot or house. If the shadow of the temple or the flag falls on the house, then tragic incidents happen in such an architecture.
- The shade of any tree, especially Pimple, Wad, or Umbar, should not fall on your plot or house.
- Sewage from adjacent plots should not enter your parcel.
- If you want to buy a plot next to your parcel, it should be on the east and north side. Scenarios facing south and west should not be taken as much as possible.
- Having roads on all four sides of the plot makes it very beneficial to live in it.
- The roads to the east and north of the plot are very advantageous.
- It is best to have hills or tall buildings to the north or south of the plot.
- These things should not be to the west or south of the plot. There should be no river reservoir or valley in these directions.
- The southwest side of the plot should be high, and it should go down to the northeast.
- If there were mongooses and rabbits in the plot, they would live happily in that plot. On the other hand, if there is a wild animal like a fox wolf, then the parcel is not pleasant.
- To test the plot, add mustard seeds. If small seedlings appear there in three-four days, then the scheme should be considered reasonable.
- If you get the water right away while digging the foundation, that plot is not very good for house building.
- If a beautiful arch is built at the entrance of the plot, the living in the house becomes comfortable and prosperous.
- Tulshi Vrindavan must be in the plot. That is why divine grace remains.
- No thorn bushes should be planted in the plot. If so, remove it.
- The plot should not have acacia, tamarind, and pimple trees because such a tree smells of energy.
- If the mind is happy after standing on the plot, then the scheme should be beneficial to you.
- There should be no hospital, stream, river, etc. adjacent to the plot because there is a possibility of dead souls. Also, there should be no school, car, or truck repair garage next door because it disturbs the peace.
- Feng shui metal wind chime pipes hanging for positive energy
- Wooden wind chime
- Attract positive energy
