Site icon Spiritual-communions

Important

सोहम साधना

ज्यांची पूर्वजन्मी बरीच साधना झालेली असते यम-निय माचे विशेषत्वाने पालन झालेले असते. शरीर शुद्धी, अंत शुद्धी ही झालेली असते. अशा भक्तास जर एखादा साक्षात्कारी पुरुष भेटला, तर नंतर  त्याची किती तयारी झाली ते प्रथम पाहतात व मगच पुढचे मार्गदर्शन करतात. सोहम वरच सारखे अनुसंधान साधायला सांगतात व स्वतःच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष साधकास समोर बसून धारणा, ध्यान, समाधी पर्यंत अभ्यास पार पाडतात हे त्याचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे.

समजा आपली पूर्वजन्मीची काहीच तयारी नाही हे आपल्याला समजत नाही. त्यांना समजते फक्त सुकृत त्यामुळेच केवळ आपल्याच ईश्वराचे चिंतन, मनन, स्मरण करावे असे वाटते आहे.  तर अशा साधकांसाठी नेहमीच्या पूजाअर्चा उपवास तापास , भजन, पूजन कीर्तन प्रवचन तीर्थयात्रा साधू दर्शन, सामुदायिक अध्यात्म ग्रंथ वाचन (ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण इत्यादी) नवविधा भक्तीच्या सर्व पायर्‍या ओलांडून पुढे जावे लागते. अशा वेळी त्यांचा दिलेला पहिला मंत्र जपून ( कारण हा निराळा असू शकेल) स्वतःची शुद्धी आणि शुद्धी साधणे आवश्यक असते. 

तुम्ही स्वामीं, महाराजांच्या दर्शनाला गेलात, एखाद्या साक्षात्कारी पुरुष याच्या दर्शनाला गेला तर ते तुम्हाला तुम्ही जे साध्य करीत आहात ते चालू ठेवा. पण शिवाय आणखी सोहमचा जप करून त्याचे अनुसंधान ठेवा असे म्हणतील . नाहीतर काहीच करीत नसाल तर सोहम जप करायला सांगतील. त्यामुळे तुमची भक्ती होते. देहबुद्धी कमी कमी होते.

तशीच ती आत्म बुद्धीत वाढते. विवेक,  वैराग्य अंगी बाणते.  सुख, शांती,  समाधानचा अंतरिक अनुभव येत असतो व भक्तीत ईश्वरारबद्दल प्रेम, श्रद्धा, निष्ठा, जिव्हाळा, आदरभाव निर्माण होते.

अशी उत्तरोत्तर भक्ती वाढत असते. तेव्हा मग मी कोण मी ब्रह्म आहे. याची जाणीव ठेवणारा असा सोहम जप तुम्हाला मिळतो. त्यांच्या कितीतरी साधकांच्या अनुभवावरून हे आपल्या निदर्शनास येते अशा तर्‍हेने त्या साधकाला त्याच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान पण मिळत असते ही साधना देखील प्रत्येकाच्या पूर्व सुकृता नुसार कमी जास्त प्रमाणात करावी लागते. तेव्हा अंतिम ध्येय गाठणे शक्य होते त्यांची सर्व साधना पूर्वजन्मी झालेली होती. हेच श्री  ज्ञानेश्वर महाराजांबद्दल ही म्हणता येईल. पुष्कळ वर्षे साधना  केल्यावर अशा साक्षात्कारी पुरूषाच्या भेटीचा योग येऊन मग त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होत असतो,  मग साक्षात्काराच्या मार्गावरील एक एक अनुभव येत असतात. 

आपण संसारी लोक आहोत. संसार प्रथम नीटनेटका करून  मग जमेल तेवढा परमार्थ करीत असतो. (हेच श्री रामदासांनी सांगितले  आहे. ) तेव्हा प्रथम यम नियमाचे पालन करून आपली प्रवृत्ती वृत्ती ही सात्विक करायची. आहार, विहार, उच्चार यावर फक्त नियंत्रण ठेवून, बर्हि शुद्धी करायची, जे कर्म करीत असतो ते पूर्ण कौशल्याने,  चिकाटीने करायचे. पण त्यात फलाची आशा ठेवायची नाही. निष्काम कर्मयोग जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने साधण्याचा प्रयत्न करायचा. 

अष्टांगयोग, ध्यानयोग करीत असताच भक्तियोग, ज्ञानयोग पण साधून चित्तवृत्ती निरोधाच्या यशस्वी अभ्यासाने मनोजप  पण मिळवायचा. मग विवेक वैराग्य विरक्ती हळूहळू वाढते.  वासना इच्छा, आकांक्षा, लालसा कमी कमी होत जातात. षड्रीपू, काम-क्रोध इत्यादीचा त्रास कमी कमी होत जातो.  
जगात तर आपण नित्याचे व्यवहार करीत असतो. पण त्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदललेली असल्यामुळे ती उदास होतो. येथील कुठल्याच गोष्टीत मन रमेनासे होते.  सदर विषय चिंतन, मनन, निजध्यास यांत जास्त जास्त गोड वाटते, मन बावरे भिकारी झाले असल्यामुळे चित्तवृत्ती शांत समाजाने स्थितीत  नाद श्रवण बिंदू किंवा ज्योतिष दर्शन, शुभ स्वप्ने त्याच साधुसंतांचे आपल्या इष्ट दैवतांचे दर्शन, आशीर्वाद,अंतरस्फुरण होऊन मार्गदर्शन असे अति सुखद अनुभव येत जातात. यामुळे आपली आत्मशक्ती, आत्मतेज,  उत्साह, आनंद खूपच वाढतो. हे सर्व आपली साधना अगदी योग्य मार्गाने चालली आहे, याचे सूचक आहे. आपण पूर्णपणे लीन होतो. यालाच दुसऱ्या शब्दात  द्वैतभाव जाऊन अद्वैतभाव  होतो. असे म्हणतात आपला व्यवहारी अहं  या आध्यात्मिक सोहम मध्ये पूर्ण विरगळतो  !! आपण ईश्वरमय होतो म्हणा ना!

तेव्हा हे सगळे ज्याच्या कृपेमुळे,  ज्यांच्या अगदी बरोबर केलेल्या मार्गदर्शनामुळे होऊ शकले त्या अधिकारी पुरुषाशी गुरूशी असा अध्यात्मिक फायदा झालेला साधक कृतज्ञ राहणार नाही काय?  गुरूंचा महिमा जास्तीत जास्त चांगल्या तर्‍हेनें का  गाणार नाही ?  

श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना प्रत्येक अध्यायात गुरूंचे महिमान अगदी तोंड भरून गायले आहे. तेव्हा माझ्यासारखे साधे साधकही ते करतीलच.

Soham Sadhana

Those whose ancestors have done a lot of sadhana have especially followed the Yama-niyma. Body purification, end purification is also done. If an enlightened man meets such a devotee, then he first sees how much he is prepared and then guides him further. It should be mentioned that Soham asks to do the same research, and under his supervision, he sits in front of the actual seeker and conducts studies up to Dharana, Dhyana, Samadhi.

Suppose you do not understand that your ancestor has no preparation. They know that only Sukrut, that is why they want to think, meditate and remember only their God. For such seekers, they have to go through all the stages of Navvidha Bhakti, such as fasting, tapas, bhajan, puja kirtan, discourse, pilgrimage, sadhu darshan, community spiritual reading (Dnyaneshwari, Bhagwat, Ramayana, etc.). In such a case, it is necessary to purify and purify oneself by chanting the first mantra given by him (because it may be different).

If you go to the darshan of Swami, Maharaj, to the darshan of an enlightened man, then continue what you are achieving. But moreover, they will chant Soham and ask him to do his research. Otherwise, if you are not doing anything, Soham will ask you to chant. That is your devotion. The body is less and less.

In the same way, she grows in self-intelligence. Conscience, asceticism embraces. Happiness, peace, contentment is experienced internally, and devotion creates love, faith, commitment, intimacy, and respect for God.

Such devotion is gradually increasing. So then, who am I? I am Brahman. You get such beautiful chanting. As we can see from the experience of many of their seekers, the seeker also gets the knowledge of his original form. This sadhana also has to be done more or less according to the previous good of each. When it was possible to reach the ultimate goal, all their sadhana was pre-born. The same can be said about Shri Dnyaneshwar Maharaj. After many years of sadhana, the yoga of meeting such enlightened men comes, and then one gets the benefit of their guidance, then one by one experiences on the path of enlightenment comes.

We are worldly people. The world is tidying up first and then doing as much as it can. (This is what Shri Ramdas has said.) Then, first of all, by following the rules of Yama, one should make one’s attitude sattvic. He used to purify himself only by controlling his diet, vihar, utterance; he used to do what he was doing with full skill and perseverance. But there is no hope of fruit. I used to try to do Nishkam Karma Yoga in the best possible way.

While doing Ashtanga Yoga, Dhyana Yoga, Bhakti Yoga, Jnana Yoga, but by practicing mindfulness prevention, one also gets mindfulness. Then the aversion to conscience gradually increases. Lust desires, aspirations, cravings become less and less. Shadripu, work-anger, etc., the problem is getting less and less.

In the world, we are dealing with routine. But she is sad because she has changed her mind about it. The intention is ramenase in anything here. This subject seems to be sweeter and sweeter in contemplation, meditation, Nijdhyas, since the brain has become a beggar, the state of mind is calm, in a state of sound hearing point or astrological vision, hopeful dreams, the same saints have enjoyable experiences such as seeing, blessing, introspection, and guidance. It greatly enhances our self-confidence, self-confidence, enthusiasm, and happiness. All this is an indication that our sadhana is going in the right direction. We are completely immersed. This, in other words, becomes duality. It is said that our pragmatic ego completely dissolves in this spiritual soham !! Say you are divine!

Wouldn’t the seeker, who had such a spiritual benefit with the Guru, be grateful to the official man, by whose grace, all this could have been done with the right guidance? Why not sing the glory of Guru in the best possible way?

While writing Dnyaneshwari, Shri Dnyaneshwar has sung the glory of Guru in every chapter. Then even simple seekers like me will do it.

Sohum Sadhana Book

A book with in-depth and useful guidance on Soham Japa Every seeker should have a collection

$1.00

Exit mobile version