google336aa3038a7d075c.html

Real Experience-सत्य अनुभव-Episode-27

','

' ); } ?>

सत्य अनुभव
भाग-२७

तीन दगडात त्रिभुवन आठवते संसार केल्यावरच खरे मर्म कळते.

त्यावेळी माझी साधना जोरदार सुरू होती? मला साधनेपलीकडे काही दिसत नव्हते. बँकेची माणसं कर्जवसुलीसाठी आली की,  ते मला विचारायचे की पैसे केव्हा भरणार ? तेव्हा मी वर हात करून “जेव्हा त्याची इच्छा असेल तेव्हा” असे म्हणायचो. बँक अधिकाऱ्यांना सुद्धा प्रश्न पडत असायचा.  अशाच एका बँकेशी निगडित मी एका बँकेत त्यांच्या सुचनेप्रमाणे भेटायला गेलो होतो,  पण भीती नावाची गोष्ट माझ्या गावी नव्हती.
बँकेचे काम झाल्यावर मी ट्रेनने परतीसाठी प्लॅटफॉर्मवर आलो माझे सर्व शरीर खूप जड झाले होते. मी माझ्या इच्छेच्या विरुद्ध दिशेने चालत होतो. जसे कोणीतरी माझ्यावर नियंत्रण करीत होते.  काहीशा संशयावरून मी माझ्या सहकाऱ्यांना फोन करून नालासोपारा स्टेशनवर उभे राहण्यास सांगितले.
मी ट्रेनमध्ये चढायला गेलो. तर ट्रेनच्या दरवाज्याच्यामध्ये असलेल्या खांबाला मी पकडू शकत नव्हतो.  एखादी नशा करावी इतकी शुद्ध हरपत चालली होती.  शेवटी दोन्ही हातांनी त्या खांबाला पकडले व गाडीत बसायच्या लाकडी बाकावर येऊन बसलो. तर मी बसल्याजागी डूलायला लागलो. मला क्षणभर मी व्हायब्रेशन मशीन वर बसल्यासारखे वाटत होते. गाडी आपल्या जागी स्थिर होती. मी समोरच्या व्यक्तीला विचारले गाडी हलते आहे का?  तो माझ्याकडे काहीशा संशयाने बघत म्हणाला.  नाही मलाच थोडस  लाजल्यासारखे वाटले.
Image by arturo_ngeek from Pixabay 
गाडी नालासोपाऱ्याला आली. माझे दोन सहकारी माझी वाट बघत होते. त्रास खूप होत असल्यामुळे मी माझी पत्नी दोन सहकारी असे आम्ही सर्व माझ्या गुरूंच्या घरी गेलो. जसे घर जवळ यायला लागले तशी माझी पावले परत  उलट्या दिशेने चालू लागली होती.  तरीसुद्धा मी एका विलक्षण वेगाने माझ्या गुरूंच्या घरी गेलो. झालेला प्रकार त्यांना सर्व सांगीतला. 
त्यांनी मला त्यांच्या साधना कक्षेत  नेले. तसे माझ्या डोक्यावर फिरत असलेला एक फिरता पंखा आपोआप बंद झाला. गुरूंनी अभिमंत्रित भस्म मिश्रित पाणी माझ्या अंगावर फेकले. तसे माझ्या शरीरावर असलेली शक्ती तिथून निघाली, खिडकीची काच फोडून ती निघून गेली.
“हा काय प्रकार होता ? बाबा” मी मोठ्या कुतूहलाने त्यांना विचारले, त्यावर ते म्हणाले ज्या मूलमंत्र शक्तीची तुम्ही साधना करता ती शक्ती तुमच्या गळ्यात पाय घालून बसली होती. तिला तुम्हाला सोबत घेऊन कुठेतरी निघुन जायचे होते. परंतु मी तिला चांगलीच समज दिलेली आहे. काळजी नसावी. मी व माझे सहकारी बाबांना नमस्कार करून घरी  परतलो.
——————————————————————–

Real Experience

Episode-27

Alchemy

At that time, my sadhana was in full swing? I could not see anything beyond the device. When the bank man came to collect the loan, he asked me when the money would be paid. So I would raise my hand and say, “whenever he wants.” Bank officials also used to have questions. I had gone to a similar bank to meet him at his suggestion, but there was no such thing as fear in my village.

After the bank work, I came to the platform to return by train. My whole body was hefty. I was walking in the opposite direction against my will. Like someone was controlling me. Out of some suspicion, I called my colleagues and asked them to stand at Nalasopara station.

I got on the train. So I couldn’t catch the pole at the door of the train. There was so much real harm going on. Finally, he grabbed the pole with both hands and sat on the wooden bench in the car. So I sat down and started moving. For a moment, I felt like I was sitting on a vibration machine. The vehicle was stationary in its place. I asked the person in front, is the car moving? He said, looking at me with some suspicion. No, I felt a little embarrassed.

Image by Solarus from Pixabay 

The train came to Nalasopara. Two of my colleagues were waiting for me. We all went to my Guru’s house with my wife and two colleagues as there was a lot of trouble. As I got closer to the home, my steps started moving back in the opposite direction. Nevertheless, I went to my Guru’s house at an extraordinary speed. The type that happened told them all.

They took me to their sadhana room. That’s how a rotating fan on my head turned off automatically. The Guru threw the auspicious water mixed with ashes on my body. That’s how the power on my body went from there; it broke the window glass and went away.

“What kind of thing was this? Baba,” I asked him with great curiosity, to which he replied that the necessary power that you practice was sitting on your neck. She wanted to go somewhere with you. But I have given her a good understanding. Don’t worry. My colleagues and I greeted Baba and returned home.Positive energy

Leave a Reply

%d bloggers like this: