google336aa3038a7d075c.html

2-Jun-20

नमस्कार,
काही दिवसांनी माझे डीसोझा नावाचे मित्र मला एका ठिकाणी त्यांच्या सोबत घेऊन गेले. तिथे अर्जुंनदास महाराज नावाचे साधक होते त्यांनी त्रिपुर सुंदरी ही महाविद्या साधना केली होती मला बघताक्षणी त्यांनी माझ्याकडे एक कटाक्षाने बघण्यास सुरुवात केली ते माझ्यात काय शोधत होते हे बहुधा त्यांनाच ठाऊक परंतु ते माझ्या अवतीभवती नजर फिरवायला लागले. 
काही दिवसांनंतर पुन्हा त्यांच्याकडे जाणे झाले. तेव्हा मला त्यांनी माझ्या शैक्षणिक साधनेबद्दल चौकशी करून विचारणा केली कि, ती शक्ती तुमच्याबरोबर सदैव असते तेव्हा तिला अजून बलवान करा त्यासाठी मी तुम्हाला मदत करू शकतो. आपल्याला फक्त सकाळी साडेतीन वाजता हवन करावे लागेल आणि त्याने तुमची साधना बळकट होऊन त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. 
केवळ हवन करायचे आहे या हेतूने मी सहज त्यांच्याशी सहमत झालो (बाबांची उपलब्धी नव्हती) आणि ठरलेल्या एका नदीकिनारी आम्ही सकाळी तीन वाजता सर्व सामग्रीसह भेटलो. खरंतर अधिकाअधिक सामग्री त्या महाराजाने आणली  होती मी आणि माझ्याबरोबर माझे स्नेही श्रीयुत राजेंद्र हे होते.
जेव्हा हवन सुरु केले त्यावेळेस सकाळचे चार वाजले होते आणि त्या काळोखी हलक्याशा मंद प्रकाशात माझे लक्ष  हवन कुंडातल्या अग्नीकडे होते.  माझ्याकडे जपण्यास जपमाळ नसल्याने मी अर्जुंदास महाराजांनी दिलेली त्यांच्या गळ्यातील स्फटिकाची माळ जपमाळ म्हणून वापरली होती. 
हवन कुंडातील अग्नीकडे जेव्हा माझे लक्ष केंद्रित झाले त्यावेळेस माझ्या अवतीभोवती सफेद रंगाच्या साडीमध्ये कोणीतरी वावरत असल्याचे आणि घुंगरांचा छुनछुन असा आवाज करीत माझ्या अवतीभोवती घुटमळत असल्याचे मला प्रत्यक्ष जाणवत होते तसेच अग्नी कुंडाच्या  अग्नीवर सूर्य स्थापित झाला आहे असे मला निदर्शनास आले. 
पूर्णाहुतीत जो नारळ अग्नीत स्वाहा केला जातो तो अग्नीपासून जमिनीपासून तो किमान साडे सहा फूट उंच  आकाशात उडाला आणि तेथेच तो मोठा आवाज करीत फुटला आणि जमिनीवर येताना त्याचे दोन्ही भाग होऊन आमच्या सर्वांवर नारळातल्या पाण्याचा अमृत वर्षाव झाला. 
ही अवस्था बघितल्यानंतर अर्जुन महाराज तणावात आल्यासारखे मला जाणवले ते आपल्या हाताने त्या शक्तीला शांत हो.  शांत हो.  असे आवर्जून सांगताना मी त्यांना पाहिले.  ते दचकले होते किंचितसे घाबरले होते. शेवटी मला शक्तीला शांत करण्याचे आव्हान दिले आणि माझ्या हातात त्यांची असलेली माळ मागून घेतली. जशी मी ती स्फटिकाची माळ अर्जुंदास महाराजांच्या हातात ठेवायला गेलो इतक्यात त्या माळीचे तुकडे झाले आणि सर्व मणी जमिनीवर पसरून पूर्णपणे पाण्यात वाहून गेले. 
ती घटना माझ्या मनाला चटका लावून गेली. मनात शंका निर्माण झाल्या आणि थोड्यावेळाने मला अर्जुंदास महाराजांनी सांगितले की, मला तुमच्या गुरूंची भेट घ्यायची आहे त्यांच्याशी एकांतात मला बोलायचे आहे तरी माझी तुम्ही लवकरात लवकर भेट करून द्यावी म्हणजे तुमच्या साधनेबद्दल मला त्यांच्याशी बोलता येईल. 
त्यांची ही अजब मागणी ऐकून मला खरं तर प्रश्न पडला की, यांना माझ्या गुरूंना का भेटायचे आहे आणि या मागचे कारण नक्की काय असेल? तरीही मी बाबा येण्याच्या प्रतीक्षा करीत असल्याने अर्जुंदास महाराजांना या भेटीबाबत आश्वासन दिले. 
आम्ही नदीकडून  जेव्हा पुन्हा आमच्या रूमवर आलो त्यावेळी माझ्यामागे एक तांबड्या रंगाची गाय पाठी येत होती मी थांबल्यानंतर तिने मनसोक्त माझे हाताचे तळवे पूर्णपणे आपल्या जिभेने चाटून घेतले आणि माझ्याशी कित्येक वर्षांचं नातं असल्याप्रमाणे ती वागू लागली. मी आणि राजेंद्र नावाचे माझे स्नेही आम्ही दोघही तेथून निघताना नित्यानंद स्वामी, मुक्तानंद महाराज (सिद्धपीठ) रेणुका देवी इत्यादींचे दर्शन घेऊन आपापल्या घरी परतलो. 
————————————————————————————————————————–
Hello

A few days later a friend of mine named D’Souza took me somewhere with him. There was a seeker named Arjun Das Maharaj who had done Mahavidya Sadhana called Tripur Sundari. As soon as he saw me, he started looking at me with a glance. He probably knew what he was looking for in me, but he started looking around me.

A few days later I had to go to them again. So they inquired about my educational tool and asked me if I can help you to make it stronger when that power is always with you. You only have to perform Havan at 3:30 in the morning and it can strengthen your sadhana and benefit you a lot.

I simply agreed with him for the sole purpose of performing the havan (Baba had no achievements) and we met at a riverbank at three in the morning with all the materials. More and more material was brought by that Maharaja and I was accompanied by my dear Mr. Rajendra.

It was four o’clock in the morning when Havan started and in that dim light, my attention was on the fire in Havan Kunda. Since I did not have a rosary to keep, I used the crystal necklace given to me by Arjundas Maharaj as a rosary.

When I turned my attention to the fire in the fire pit, I could see that someone in a white sari was crouching around me and crouching around me with the sound of bells ringing, and I noticed that the sun was set on the fire of the fire pit.

The coconut that is consumed in the fire is blown up at least six and a half feet high from the ground and there it explodes with a loud noise and when it reaches the ground it is divided into two parts and the nectar of coconut water rains down on all of us.

After seeing this state, I felt like Arjun Maharaj was tense. Calm that power with your hand. Be calm I saw them saying that. They were stunned and slightly frightened. Eventually, I was challenged to calm down by the power and grabbed the necklace they had in my hand. As soon as I went to place the crystal necklace in the hands of Arjun das Maharaj, the gardener was torn to pieces and all the beads were spread on the ground and completely washed away in the water.

That incident touched my heart. Doubts arose in my mind and after a while Arjundas Maharaj told me, I want to meet your Guru, I want to talk to him in private, but you should visit me as soon as possible so that I can talk to him about your means.

Hearing their strange demand, I wondered why they want to meet my guru, and what exactly is the reason behind this? Still, I was waiting for Baba to come so I assured Arjundas Maharaj about this visit.

When we came back to our room from the river, a red cow was coming behind me. After I stopped, she licked the palms of my hands with her tongue and started behaving as if she had been in a relationship with me for many years. My friend Rajendra and I both left and returned to our homes after visiting Nityanand Swami, Muktanand Maharaj (Siddhapeeth) Renuka Devi, etc.

Leave a Reply

%d bloggers like this: