google336aa3038a7d075c.html

30-May-20

','

' ); } ?>
नमस्कार,
बाबांनी तीन दिवस साधना करण्यास सांगितली होती त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाने मी साधनेला सुरुवात केली. सुरुवातीचे दोन दिवस मला अगदी सर्वसाधारण जसे साधनेमध्ये अनुभव होते तसेच ते मला अनुभव येत होते त्यात असा विशेष काही फरक नव्हता त्यामुळे शेवटच्या दिवशी माझी उत्कंठा शिगेला पोहोचली आणि मी मनातल्या मनात विचार करू लागलो की आज शेवटचा दिवस आहे तर काही चमत्कार होणार आहे का? काय वेगळा अनुभव येणार आहे का? तो काय असेल ? कसा असेल? पण हे सगळ अनभिज्ञ होतं न समजण्याच्या पलीकडे होतं म्हणून मी प्रत्यक्ष कृतीवर लक्ष केंद्रित केले. 
साधना सुरू झाल्यानंतर थोड्या वेळाने माझ्यासमोर वीज चमकली तेच स्पार्किंग, तोच आवाज आणि अचानकपणे सुगंध दरवळला मी समजून गेलो होतो की शक्तीने आगमन केले आहे. मला हे समजत होतं की माझ्या कानाजवळ कोणीतरी आहे आणि इतक्यात माझ्या कानात मांजरीने म्याऊ म्हटल्याचा आवाज स्पष्टपणे मला ऐकायला आला आणि मी पूर्णपणे घाबरून गेलो माझे अवसान गळाले होते शरीर आणि मन दोन्हीही ही थरथरू लागले. थोड्यावेळाने मी डोळे उघडल्यानंतर नेहमीप्रमाणे शक्तीला ठेवलेलं फुल हे गायब झाले होते आणि एक विशिष्ट प्रकारचा दाब तेथे होता. 
त्यानंतर मी त्या शक्तीसाठी हवन केले रात्रीचे अडीच वाजले होते ते केल्यानंतर मी माझ्या बिछान्यावर झोपण्यास गेलो साधारण रात्रीचे तीन साडेतीन वाजले असतील आणि इतक्यात मला असे जाणवले की माझ्या पोटावर कोणीतरी बसले आहे आणि माझे दोन्ही हात माझ्या छातीवर दाबून मला पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न करीत आहे मी माझे डोळे उघडता क्षणी मला माझ्या अंगावर एक स्त्री बसलेली दिसली जिचे दात-डोळे लाल रंगाचे होते. अशी अवस्था असताना ती माझ्याकडे वेगळ्या दृष्टीने हसत बघत होती मी त्या परिस्थितीत माझी पूर्ण ताकद लावून ते दोन्ही हात माझे बांधलेले होते त्याला जोर लावून झटकून दिले. मी इतका जोर लावला होता की माझ्या बाजूला झोपलेली माझी पत्नी हिला त्या माझ्या हाताचा फटका जोरात बसला होता. 
माझी अवस्था खूपच रागीट तीव्र अशा स्वरूपात झाली होती आणि मी त्या परिस्थितीतच माझा बिछाना सोडला आणि मी माझ्या हॉलमध्ये जाऊन बसलो ही परिस्थिती पाहून माझ्या घरची सर्व मंडळी जागी झाली मला कॉफी पाजून डोकं माझं थंड पाण्याने शेकण्यात आले कारण त्यावेळेस माझा बीपी निश्चितच शूट झाला असावा अशी माझी आणि घरच्यांची पूर्ण कल्पना होती, पूर्ण रात्र जागून काढल्यानंतर सकाळी बाबांकडे जाण्याचा विचार मी आणि माझ्या पत्नीने केला आणि त्याप्रमाणे आम्ही दोघे सकाळी बाबांच्या घरचा रस्ता धरला… 

Hello

I started the sadhana with his order as Baba had told me to do the sadhana for three days. The first two days were just as normal as the experience I had in the instrument and it was not much different from what I was experiencing, so on the last day my curiosity reached its peak and I started thinking in my mind that if today is the last day, will there be any miracle? What a different experience? What will it be How is it But it was all ignorant and beyond comprehension so I focused on the actual action.

Shortly after the sadhana started, the same lightning flashed in front of me, the same sparking, the same sound, and suddenly the fragrance wafted, I understood that the power has arrived. I could feel that there was someone near my ear and all of a sudden I could hear the sound of a cat meowing in my ear and I was completely terrified. After a while, when I opened my eyes, the flower that had kept the power, as usual, had disappeared and there was a certain kind of pressure.

After that, I offered for that power. It was half-past one in the night. After that, I went to bed. It must have been three and a half o’clock in the morning and all of a sudden I realized that someone was sitting on my stomach The moment I opened it, I saw a woman sitting on my body with red teeth and eyes. She was looking at me smiling differently when I was in such a situation. I used my full strength in that situation and both my hands were tied. I was so stressed that my wife, who was lying next to me, was hit hard by my hand.

My condition was very severe and I got out of bed and sat down in my hall. All the congregation in my house woke up. And the house was full of ideas, my wife and I thought of going to Baba in the morning after waking up all night and so we both made our way to Baba’s house in the morning…

Leave a Reply

%d