google336aa3038a7d075c.html

29-May-20

','

' ); } ?>
नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो हे माझे अनुभव कोणत्याही कल्पनेत रचून मी आपल्यासमोर सादर करीत नसून माझ्या अध्यात्मिक प्रवासात जे मला अनुभव आले तेच  मी आपणासमोर कोणतीही अभिलाषा न बाळगता व्यक्त करीत आहे. हे आपण कृपया या जाणून घ्यावे… 
बाबांनी दिलेला संदेश आणि आदेश याबाबत मी खूप विचार केला कारण माझा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता आणि कमाई बंद असल्यामुळे मला सर्वांसमोर पैशासाठी हात पसरावे लागत होते. दुसऱ्या दिवशी बाबा माझ्या ऑफिसमध्ये आले आणि आत प्रवेश करताच त्यांनी मला विचारले की, हे किती लोकांना तुम्ही गोळा करून ठेवले आहे?  त्यानी ऑफिसमध्ये सर्वत्र नजर फिरवत माझ्याशी हा संवाद केला. 
मी जेव्हा सिद्धी-साधनेच्या काळात झाडाकडे जाऊन भोग देत होतो त्यावेळेस मी प्राप्त केलेल्या शक्ती व्यतिरिक्त इतरही ही आत्मे मला आकर्षित होऊन ते माझ्या वास्तूत येऊन थांबले होते, पण मी अध्यात्मिक दृष्टीने आंधळा असल्याने मला त्या शक्ती दिसत नव्हत्या, ते आत्मे मला जाणवत नव्हते परंतु माझ्या गुरु बाबांनी पहिल्या कटाक्षातच हे सर्व जाणून घेऊन त्या सर्वांना माझ्या ऑफिस म्हणून निघून जाण्याचा आदेश दिला. 
त्या रात्री पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये माझी चाचणी घेण्याकरता गुरूंनी येण्याचे ठरवले, गुरुबाबा ऑफिसमध्ये येणार म्हणून माझ्या पत्नीने हट्ट केला की, मी सुद्धा तुमच्यासोबत रात्री ऑफिसला येऊन त्या शक्तीला पाहू शकेन, अशी इच्छा तिने व्यक्त केली परंतु मला ते न रूचल्याने मी सर्व निर्णय माझ्या गुरूंवर सोपवला. माझ्या गुरूंना त्या प्रक्रियेची पूर्ण कल्पना असल्याने त्यांनी माझ्या पत्नीला माझ्या सोबत गोड स्मित करून येण्याची परवानगी दिली त्यांच्या आदेशाप्रमाणे माझ्या पत्नीला सोबत घेऊन ठरल्याप्रमाणे रात्री साडेअकरा माझ्या ऑफिसमध्ये आम्ही भेटलो. 
जेव्हा रात्री ठीक बारा वाजता मला माझ्या गुरुंनी त्या शक्तीचे आवाहन करायला सांगितले त्यावेळेस मी डोळे बंद करून त्या शक्तीचे आवाहन केले आणि काही वेळातच मला माझ्या गुरुंनी डोळे उघडण्यास सांगितल्यानंतर मी पाहिले असता माझी पत्नी पूर्णपणे गाढ झोपलेली होती आणि गुरु मला न्याहाळत होते. 
सांगा तुमची शक्ती कुठे उभी आहे? असा सवाल मला बाबांनी करताच मी चटकन ज्या दिशेस मला तिची जाणीव होती तिथे मी इशारा करून सांगितले की बाबा शक्ती तिथे उभी आहे. बाबांनी शक्तीला आदेश करताच ती एका छोट्या मुलीच्या स्वरूपात आली आणि मला ऐकू येणाऱ्या त्या बारीकशा किणकिणत्या आवाजात गाणं गुणगुणायला लागली. तेव्हा गुरुनी तिला तिच्या योग्य स्वरूपात येण्यास सांगितले असता ती शक्ती पूर्णपणे दागिन्याने नटून-थटून घुंगरांचा आवाज करीत आकर्षक युवतीप्रमाणे  प्रकट झाली परंतु ते मी माझ्या डोळ्याने पाहू शकत नव्हतो कारण ती दृष्टी मला तेव्हा प्राप्त नव्हती. 
बाबांनी एका विचित्र भाषेत तिच्याशी संवाद साधायला सुरुवात केली आणि तिला परत निघून जाण्यासाठी आदेश केला. पुढे रोज रात्री तुम्ही साधना सुरू ठेवा आणि येत्या तीन दिवसांमध्ये तुम्हाला जे अनुभव येतील ते मला तीन दिवसांनी येऊन सांगा. असे बाबा म्हणाले. या सर्व प्रक्रियेत माझ्या वास्तूमध्ये एक प्रकारचे चैतन्य आणि सुगंधी वातावरण निर्माण झाले होते तसेच माझ्या छोट्याशा चाचणीत मी उत्तीर्ण झाल्याचे मला गुरूंनी सांगितले,  शाब्बासकी देऊन पुढे साधना सुरूच ठेवा असे शांतचित्ताने मला सांगून गुरु सकाळी आपल्या घरी  निघून गेले. 

Hello friends, 

Friends, I am not presenting my experiences to you in any imagination, but I am expressing to you what I have experienced in my spiritual journey without any desire. You should know this, please …

I thought a lot about the message and orders given by Baba because my business was completely stalled and I had to reach out to everyone for money as my earnings were off. The next day Dad came into my office and as soon as he entered he asked me, how many people have you gathered? He interacted with me, looking around the office.

When I was going to the tree during the period of Siddhi-sadhana, these spirits other than the power I had received were attracted to me and they came to a halt in my Vastu, but since I was spiritually blind, I could not see those powers, I did not feel those spirits but my Guru Baba knew all this at first sight and ordered them all to leave as my office.

The Guru decided to come to my office again that night to test me. My wife insisted that Guru Baba should come to the office. She wished that I too could come to the office with you at night and see the power, but I did not like it. My gurus had a full idea of ​​the process and they allowed my wife to come with me with a sweet smile. We met in my office at half-past ten in the night as per their order.

At exactly midnight, when my Guru told me to invoke that power, I closed my eyes and invoked that power, and shortly after my Guru told me to open my eyes, I saw that my wife was completely asleep and Guru was watching me.

Tell me, where does your power stand? As soon as Baba asked me such a question, I immediately pointed in the direction in which I was aware of her and told her that Baba Shakti was standing there. As soon as Baba gave the order to Shakti, she came in the form of a little girl and started humming the song in that faint squeaky voice that I could hear. When the Guru asked her to come in her proper form, the power appeared like an attractive young woman with a full-fledged ornamented bell, but I could not see it with my own eyes because I did not get that vision then.

Baba began to communicate with her in a strange language and ordered her to leave. Next night you continue to do sadhana and come and tell me the experiences you will have in the next three days. That’s what Baba said. In all these processes, a kind of consciousness and the fragrant atmosphere was created in my Vastu and the Guru told me that I had passed my small test, calmly told me to continue the sadhana by giving Shabbaski and the Guru left for his house in the morning.

Leave a Reply

%d