google336aa3038a7d075c.html

28-May-20

','

' ); } ?>
नमस्कार,
बाबांकडे गेल्यावर मी त्यांच्या हातात तो नारळ ठेवला आणि त्यांना विचारले की हे कसे काय शक्य आहे? त्यावर त्यांनी मला सांगितले की प्रथम तो नारळ  पाण्यामध्ये विसर्जन करून मग माझ्याकडे या, मग आपण बोलू… 
बाबांनी सांगितल्याप्रमाणे मी तो नारळ एका तलाव-पाण्यात विसर्जन केला आणि पुन्हा बाबांच्या घरी आलो तर बाबा माझी वाट बघतच होते. 
आज झालेल्या हवनाच्या विधीबद्दल बाबा बोलू लागले ते म्हणाले की, आपण ज्यांच्या घरी आज हवन करायला गेलो होतो त्या यजमानाच्या घरी सुरुवातीला भिंतींच्या कोपऱ्यातून शुद्ध सुगन्धी पाणी निघायला लागले, हा प्रकार काय म्हणून त्या यजमानांनी अनेक ठिकाणी चौकशी केल्यावर त्यांना असं कळलं होतं की तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असून तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात. परंतु ते पाणी दिवसेंदिवस रंग बदलत अखेरीस ते भगव्या रंगात येऊ लागले त्याला खूप दुर्गंध येत होता. नंतर त्या वाईट शक्तीने आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली आणि ते यजमान दुःखी-कष्टी-पीडित  झाले. त्यांच्याकडे जी वाईट शक्ती होती जी तुम्हाला म्हातारा माणसाच्या रुपात दिसली ती होती आणि ती वाईट शक्ती घरातल्या सर्व माणसांना खुप त्रास देत होती. 
विशेष म्हणजे त्यांच्या घरात जो एक बारा वर्षाचा मुलगा होता, तो जेव्हा अभ्यासाला बसायचा त्यावेळेस त्याच्या डोक्यात कोणीतरी मारायचं, तसेच तो आंघोळीला गेला तर त्याचे कपडे मुद्दामून एखाद्या पाण्याच्या पिंपात टाकले जायचे, अचानक होणाऱ्या हालचाली, घरातले पैसे गायब होणे अशा अनेक गोष्टींमुळे ती लोक त्रस्त झाली होती. 
आपल्या आधी तिथे काही याग्निक हवनाला गेलेले असताना त्यांनी हवामानाची मांडणी सुरू केल्यावर त्या शक्तीने ती संपूर्ण हवनाची मांडणी उध्वस्त करून टाकली होती आणि हा प्रकार बघून ते याग्निक धूम ठोकून पळून गेले होते.
आपण हा विधी उत्तम रित्या पार पाडला असून आज ती सर्व लोक सुरक्षित आहे. आजच्या या विधीत माझ्यासोबत तुमचाही मोलाचा वाटा असून तुम्ही फार चांगल्या पद्धतीने हे कार्य पार पडल्याबद्दल मला तुमचा अभिमान आहे असं सांगून बाबांनी मला शाब्बासकी दिली. 
हा सर्व प्रसंग ऐकून खरतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती कारण मला हवन करण्यापूर्वी त्या यजमानांच्या घरातील संकटाची पुसटशीही  कल्पना नव्हती आणि आपण एवढं मोठं धाडस कार्य आपल्या गुरुं सोबत केलं त्यामुळे मी स्वतःच्याच कार्याबद्दल अचंबित होतो. 
त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, आपण आपलं दुःख घेऊन बसलो आहोत. आपले प्रश्न, आपल्या शंका या पलीकडे जगात अनेक त्रस्त व्यक्ती आहेत कि, त्या लोकांच्या समस्या माझ्या समस्येपेक्षा खूप पटीने मोठ्या असल्या तरीही त्याला सामोरे जाण्यास ती लोक सज्ज असतात?
खरंतर अशी लोकं काही ढोंगी लोकांच्या जाळ्यात फसतात आणि त्यांना आर्थिक फटका बसून ते अध्यात्मावरचा  विश्वास गमावून बसतात. कुठेतरी आपली सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य हे लक्षात घेऊन आपण ही पीडितांची सेवा करण्यास आपल्या गुरूंना हातभार लावू शकतो का? याबाबत मी विचार करू लागलो. 
बँकेचा प्रश्न मार्गी लागल्याने, मी माझ्या गुरुंना माझ्या पुढच्या व्यवसायाबद्दल विचारणा केली असता त्यांनी मला आज आपण जो  हवन विधी केलेला आहे त्याप्रमाणे हे कार्य करून आपण आपल्या संसाराचा उदरनिर्वाह करावा. कारण तुमचा जन्म लोकांची सेवा करण्यासाठी झालेला आहे. असे बाबांनी मला निक्षून सांगितले. 
मी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर डिझाईन मध्ये बऱ्यापैकी हुशार असूनही मला त्यात माझे करियर करता आले नाही हे एक मनाला दुःख करून देत होते तर दुसऱ्या बाजूने लोकांचे प्रश्न आपण कसे काय सोडवायचे आणि त्यातून आपला उदरनिर्वाह कसा काय होईल? याबद्दल मी साशंक होतो. 
आज मिळालेल्या शंभर रुपयाच्या रकमेप्रमाणे जर मला कमाई होणार असेल तर मी माझा उदरनिर्वाह कसा करायचा? त्याची सुरुवात कशी होईल? की झाली आहे? हेच मला कळेना आणि या द्विधा मनस्थितीत मी माझं घर गाठले. घरी आल्यानंतर माझ्या कुटुंबाला मी झालेली सर्व हकीकत-चर्चा सांगितली, त्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे होते आणि ते मला स्पष्टपणे जाणवत होते. 

Hello

When I went to Baba, I put the coconut in his hand and asked him how is this possible? He told me to first immerse it in coconut water and then come to me, then we will talk …
As Baba said, I immersed the coconut in a pond and when I came back to Baba’s house, Baba was waiting for me.

Baba started talking about the ritual of Havan today. He said that in the house of the host whose house we were going to perform Havan today, initially, pure fragrant water started coming out from the corner of the walls. And you are going to be very rich. But the water was changing color day by day and eventually it started turning saffron. It was smelling very bad. Then that evil force began to show its influence and that host became miserable-suffering-suffering. They had the evil power that you saw as an old man, and that evil power was bothering all the people in the house.

A 12-year-old boy in their house was hit in the head by someone while he was studying, and his clothes were deliberately thrown into a water pipe when he went for a bath, sudden movements, disappearance of money from the house Was. When some of the Yagnik Havans had gone there before him, when he started arranging the weather, that force had destroyed the entire Havan layout and on seeing this type, he had run away with the Yagnik Dhoom.

We have performed this ritual perfectly and today it is safe for all people. Baba also congratulated me saying that you have played an important role in today’s ritual and I am proud of you for carrying out this task in a very good manner.

After hearing all these incidents, the ground beneath my feet had slipped because I had no idea of ​​the crisis in the host’s house before the cremation, and I was amazed at my work because you did such a brave deed with your guru.

One thing I noticed at that time was that we were sitting with our grief. Your question, beyond your doubt, are there many troubled people in the world who are ready to face their problems even if they are many times bigger than mine?

Such people fall into the trap of some hypocrites and lose their faith in spirituality. Given our social commitment and duty somewhere, can we help our gurus to serve these victims? I started thinking about it.

Once the bank question was resolved, I would have asked my guru about my next business and he would have told me that we should make a living by doing this as we have done today. Because you were born to serve people. That’s what Baba told me.

While I was very good at printing technology/computer design, I was saddened that I could not pursue a career in it. On the other hand, how do you solve people’s problems and how do you make a living from it? I was skeptical about that.

If I am going to earn as much as the hundred rupees I got today, how can I make a living? How will it start? Is that done? This is what I did not understand and in this dilemma I reached my home. When I got home, I told my family all the facts that had happened, there were question marks on everyone’s face, and I could feel it.

1 thought on “28-May-20”

Leave a Reply

%d bloggers like this: