google336aa3038a7d075c.html

25-May-20

','

' ); } ?>
नमस्कार 
परतीच्या प्रवासात मला बाबांनी बरेच नियम सांगितले होते त्या नियमांचे पालन मला आजपासून करायचं होतं त्याप्रमाणे मी ते करायचे ठरवले होते. 
नियमाप्रमाणे मला आजही साधनेला बसायचं होतं पण माझी जागा आज बदलली होती मी माझ्या घराच्या बेडरूम मध्ये एकटा बसून रात्री बारा वाजता त्या साधनेला सुरुवात केली. 
साधना करताना आज मला झाडाकडे जाऊन भोग देण्याची गरज नव्हती म्हणून मी त्या शक्तीसाठी माझ्यासमोर एक पिवळे शेवंती नावाचे फुल भोग स्वरूपात भेट म्हणून ठेवले. 
काही जपमाळा झाल्यानंतर माझ्यासमोर वीज चमकावी व त्याचा आवाज यावा याप्रमाणे घटना घडली. 
मला हा आजचा अनुभव अत्यंत प्रभावी वाटला तसेच जो सुगंध मला ऑफिसमध्ये येत होता तोच सुगंध माझ्या पूर्ण बेडरूम मध्ये दरवळत होता. 
साधना पूर्ण झाल्यावर मी डोळे उघडले तेव्हा मला हे लक्षात आलं की माझ्यासमोर जे मी शक्तीसाठी फुल भेट म्हणून ठेवलं होतं ते गायब झालं होतं. 
बाबांच्या आदेशानुसार साधनेनंतर मला छोट्या स्वरूपात जेथे मी साधना करतो त्याच ठिकाणी हवन करण्याचे सांगितले होते त्याप्रमाणे मी हवन सुरु केले. 
हवन कुंडातून वेगवेगळे आवाज छोटा स्वरूपात मला ऐकायला येत होते हा प्रकार रात्री तीन वाजता होत होता. 
सोसायटीतील काही लोकाना  व वॉचमनला याची चुणूक लागली होती की मी रात्री बसून साधना किंवा तत्सम काहीतरी करत आहे. 
कारण हवनाचा येणारा धूर हा माझ्या खिडकीतून बाहेर आल्याने वॉचमॅन माझ्या घरी आला होता, की तुमच्या घरी काही आग वगैरे लागलेली आहे का परंतु त्याला आमच्या घरच्यांनी नीट समजून सांगितले तेव्हा तो परत निघून गेला. 
साधना व हवन पूर्ण झाल्यावर मी जमिनीवर व माझी पत्नी वेगवेगळ्या बिछान्यावर  झोपू लागलो. 
झोपल्यानंतर मला पुन्हा तोच सुगंध, तेच तोंडावर वळवळणारे केस, तेच सितारवादक वाद्य, तेज गुणगुणणारे गीत तोच आवाज  ऐकू  येऊ लागला. 
माझीतर रोजचीच अनुभवाची मेजवानी सुरूच होती, व त्याने मी सुखावून जात असे. 
कुणीतरी पायातले घुंगरू छन-छन असे वाजवून दाखवत आहे असे मला व माझ्या पत्नीला पूर्ण शुद्धीत जाणवले. 
आज माझ्यासोबत माझ्या पत्नीलासुद्धा त्या शक्तीचा अनुभव येण्यास सुरुवात झाली होती ती रात्र कशीबशी थोडेफार झोप घेऊन सकाळी बाबांना भेटण्याच्या प्रतीक्षेत काढली होती. 
आता माझ्याकडे केवळ तीनच दिवस बाकी होते, बँकेच्या जप्तीची टांगती तलवार माझ्या डोक्यावर होती. 
अनुभवाने जरी सुखावलो असलो तरीही कुठेतरी मनातल्या असंख्य प्रश्नाने भेडसावून गेलो होतो. मला माझ्याकडे असलेल्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल हवी होती आणि ती केवळ माझे गुरु बाबा करू शकणार होते, मनात विचारांचा घोळ घेऊन मी बाबांच्या घरचा रस्ता धरला…. 
Hello
On the way back, I had decided to follow the rules that my father had told me to follow.
As a rule, I still wanted to sit on the instrument, but my place was changed today. I sat alone in my bedroom and started the instrument at midnight.
Today I did not have to go to the tree and do bhoga while doing sadhana, so I put a yellow shewanti flower in front of me as a gift for that power.
After a few rosaries, the lightning flashed in front of me and made a noise.
I found today’s experience to be very impressive and the same scent that was coming to me in the office was wafting through my entire bedroom.
When I opened my eyes after completing the sadhana, I realized that what I had kept in front of me as a flower gift for strength had disappeared.
After the sadhana as per Baba’s order, I started the havan in small form as I was told to do the havan at the same place where I do the sadhana.
I could hear different sounds coming from the incinerator in a small form. This was happening at three o’clock at night.
Some people in the society and Watchmen had a feeling that I was sitting at night doing sadhana or something like that.
Because the smoke from the fire came out of my window, the Watchman came to my house to see if there was a fire in your house, but when our family explained it to him, he left.
After the sadhana and havan was over, I lay down on the ground and my wife on different beds.
After sleeping, I could hear the same scent, the same twisting hair on my face, the same sitar playing instrument, the same song singing loudly.
The feast of daily experience continued without me, and it made me happy.
My wife and I realized that someone was playing with the bells on my feet.
My wife, along with me, was beginning to experience that power today.
Now that I had only three days left, the sword of bank confiscation hung over my head.
Although I was relieved by the experience, I was confronted with innumerable questions somewhere in my mind. I wanted to solve many unanswered questions that I had and only my Guru Baba could do it, with a mixture of thoughts in my mind, I made my way to Baba’s house ….

Leave a Reply

%d bloggers like this: