google336aa3038a7d075c.html

17 May 20

','

' ); } ?>
नमस्कार 
नेहमीप्रमाणे मी माझ्या गुरुंकडे म्हणजेच बाबांकडे गेलो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना नमस्कार करून कालची हकीकत सांगून माझ्या घरी परतलो. 
साधनेचा चौथा दिवस होता साहित्य गोळा केले आणि ठरलेल्या वेळेस माझ्या ऑफिसला मी पोहोचलो. 
आज एक वेगळे असे वातावरण माझ्या ऑफिसमध्ये निर्माण झाले होते जसे की कुणी माझी इथे वाट बघत आहे आणि माझ्या स्वागतासाठी अतिशय आल्हाददायक असा प्रसंग निर्माण झालेला आहे, असा मला आगळावेगळा अनुभव तिथे आला. 
साधनेला मी सुरुवात केली आणि चौथी जपमाळ असेल त्यावेळेला मला लांबून कोणीतरी ऑफिसच्या एका कोपऱ्यातून माझ्या दिशेने चालत येत आहे असे जाणवले, त्या दबकत पावलांची चाहूल मला लागली आणि माझ्या छातीत धडधड व्हायला सुरुवात झाली. 
माझ्या अगदी कानाजवळ कुणी तरी आपलं तोंड घेऊन बसलेला आहे असा मला सारखा भास होत होता थोड्यावेळाने माझ्या चेहरा समोर एक तेजपुंज चेहरा असावा आणि तो मला आणि न्याहाळतो आहे असे मला सारखे वाटत होते. 
जीवाची नुसती घालमेल सुरू होती काय आहे? कोण आहे? काहीही समजत नव्हतं मी केवळ माझ्या गुरूंनी दिलेला मंत्र जपत होतो मला माझ्या जपमाळा पूर्ण करायच्या होत्या तिथे माझे मी लक्ष केंद्रित केले आणि परमेश्वरा जे काय होईल ते तुझ्या साक्षीनेच होईल या श्रद्धेवर  मी साधना सुरूच ठेवली साधना संपल्यावर मी हळूहळू डोळे उघडले तर आजूबाजूला कोणीही नव्हतं. 
मी साधनेवरून उठल्यावर लगेच पूर्ण ऑफिसभर फिरून पाहिलं की कोणी आहे का कोणी दिसत आहे का काही खुणा जाणवत आहेत का परंतु तसे ऑफिसच्या माझ्या पूर्ण जागेत काहीही नव्हतं. 
मी भोग घेऊन झाडाकडे जायला निघालो तर मला वाचमेनने हटकलं इतने रात को कहा जा रहे हो? मी म्हटलं हा रात्री झोपलेला असतो तेच चांगलं असतं. मी तेव्हा त्याला इशारा करून निघून गेलो. 
झाडाकडे जाताना आज लांबून लांबून कुत्रे माझ्याकडे बघून रडायला लागले होते. मला ते सगळं विचित्र वाटत होतं. 
तरीही झाडाकडे जाऊन मी भोग ठेवला नमस्कार केला आणि माझ्या घरचा रस्ता पकडला. 

मित्रहो मी या व्यासपीठावर तुम्हाला माझे अनुभव केवळ तुमच्या माहितीकरीता देत असतो यामध्ये कुठलाही अभिनय किंवा मोठेपणा किंवा रंगबिरंगी काल्पनिक गोष्टी जोडलेल्या नाहीत जे सत्य आहे जसे आहे तसे तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो.

————————————————————
Hello
As usual, I went to my Guru, Baba, and after receiving his blessings, greeted him and returned home with the truth of yesterday.
It was the fourth day of the tool collection and I reached my office on time.
Today, a different atmosphere was created in my office as if someone was waiting for me here and a very pleasant occasion was created for my reception, I had a strange experience there.
I started the instrument and when it was the fourth rosary I felt someone walking towards me from a corner of the office at a distance, I felt those slippery steps and my chest began to throb.
I felt as if someone was sitting with his face close to my ear. After a while, there was a bright face in front of my face and I felt like he was looking at me and me.
What is it? Who is Didn’t understand anything I was just chanting the mantra given by my guru I wanted to complete my rosary There I focused my attention, and your testimony will be what will happen, Lord I continued my sadhana on this belief. When the sadhana was over, I slowly opened my eyes and there was no one around.
As soon as I got up from the device, I walked around the whole office to see if anyone was there or if there were any signs, but there was nothing like that in my entire office space.
When I went to the tree with the bhog, I was stunned by the watchmen. Where are you going for so many nights? I said it’s better to be asleep at night. I then beckoned to him and left.
On the way to the tree, the dogs looked at me from a distance and started crying. I thought it was all weird.
Still going to the tree I greeted Bhog and took the road to my house.

Friends, I am giving you my experiences on this platform only for your information. There is no acting or magnificence or colorful fiction in it. I am sincerely trying to present to you the truth as it is.

Leave a Reply

%d bloggers like this: