google336aa3038a7d075c.html

16-May-20

','

' ); } ?>
नमस्कार 
सकाळी उठल्यानंतर लगेचच मी माझ्या बाबांचं दर्शन त्यांच्या घरी जाऊन घेतलं आणि झालेली सर्व हकीकत सांगून त्यांचा आशिर्वाद घेउन मी माझ्या घरी परतलो आज साधनेचा तिसरा दिवस होता आणि मला पुन्हा त्या भोगाच्या सर्व सामग्री गोळा करायच्या होत्या.
दिवसभर मला नुसती ग्लानी असायची खूप झोप यायची पण ती झोप खूप सतर्क असायची त्या झोपेमध्ये मला एक विशिष्ट प्रकारचा वेगळा अनुभव प्राप्त होता जो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही पण इतकं मात्र खरं की मला खूप ग्लानी येत होती जसे कि कुठली एखादी नशा करावी त्याप्रमाणे ती ग्लानी असायची.
तिसर्‍या दिवसाच्या साधनेसाठी मी माझ्या ऑफिसवर पोहचलो, ठरलेल्या वेळेमध्ये साधनेला सुरुवात केली जसजशा जपमाळा करत होतो तसं माझं शरीर सुन्न-बधीर होत होतं. आज वेगळा अनुभव म्हणजे माझ्या शरीराला कोणीतरी टाचण्या टोचत आहे तसेच कोणीतरी हळुवार डोक्यावर एखादी व्यक्ती बोट फिरवत आहे असा अनुभव मला येत होता.
तो मौसम थंडीचा होता तरीसुद्धा माझे पायाचे तळवे व कान पूर्णपणे गरम झालेले होते. शरीरामध्ये वेगळ्या प्रकारची उत्सुकता दाटून आली होती मी या थंडीच्या मोसमातसुद्धा घरात एखादा हीटर लावल्याप्रमाणे छान पैकी उबदार असे वातावरण अनुभवत होतो.
ऑफिसची सर्व दारं-खिडक्या बंद असताना सुद्धा मध्येच एखादी थंडगार झुळूक माझ्या अंगावर येऊन गेली मला त्या वातावरणात त्या थंड हवेचा वेगळाच प्रभाव जाणवला व  प्रश्न पडला की ही थंड झुळूक आली कुठून?
साधनेत आज माझं मन कुठेतरी शून्यात हरवलं होते पूर्णपणे अंधार व खूप खूप खोल चाललो आहे, मी खूप अशा खोल ठिकाणी जिथे काहीच दिसत नाही पण मी खूप खोलात चाललो आहे असं मला जाणवलं आणि एखाद्या गोष्टीचा शोध घ्यावा त्याप्रमाणे मी त्या विवरामध्ये गुंतत चाललो होतो. त्या विवराचा अंतच होत नव्हता. 
साधना झाल्यावर मी थोडावेळ जरा बसण्याचा विचार केला परंतु मला पुन्हा ती ग्लानी जाणवू लागली म्हणून मी लगेचच झाडाकडे निघण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे मी झाडाकडे गेलो.
आज झाडाकडे जाताना कुठल्या प्रकारचे प्राणी कुत्रा वगैरे काहीही नव्हतं अगदी शांत असं वातावरण होतं. कुठल्याही प्रकारचा दाब मला आज जाणवला नव्हता मी शांतपणाने झाडाकडे गेलो व यक्षणीचा (शक्तीचा) भोग मी तिथे दिला आणि नमस्कार करून शांतपणे माझ्या मी घरी आलो.
घरी आल्यावर माझ्या घरातली माझी लाडकी कुत्री स्वीटी ही मला पाहून सरळ आतमध्ये निघून गेली जसे ती मला ओळखतच नव्हती.  मी काहीही विचार न करता सरळ माझा बिछाना गाठला व मी झोपी गेलो.
झोपल्यावर माझ्या लक्षात आलं की साधना करताना जसे माझ्या डोक्यावरती कुणीतरी हळूवारपणे बोट फिरवत होतं तसंच मी इथे झोपल्यावर माझ्या डोक्यावर कोणीतरी एखाद्याने आपलं  हळुवारपणे बोट फिरवत असावं असं मला जाणवलं आणि मी तोच अनुभव घेत शांतपणे झोपून गेलो.
——————————————————————-
Hello
As soon as I woke up in the morning, I visited my father at his house and after telling him all the facts and with his blessings, I returned to my house.
I used to feel nauseous all day long, but that sleep was very alert. In that sleep, I had a special kind of experience that I can’t tell you in words, but the fact is that I felt very nauseous, like a nausea. Used to be.
I reached my office for the instrument on the third day, started the instrument at the appointed time, my body was getting numb as I was doing rosary. A different experience today was when I was having someone piercing my body and someone was gently pointing a finger at my head.
Even though it was cold, my soles and ears were completely warm. There was a different kind of curiosity in my body. Even in this cold season, I was feeling the warmth of the house like installing a heater.
Even when all the doors and windows of the office were closed, a cold breeze came over me.
Today my mind was lost somewhere in the sadhana. It is completely dark and very deep. I felt very deep in a place where nothing is visible but I felt very deep and I was engrossed in that detail as if to find something. That was not the end of the story.
After the sadhana, I thought of sitting for a while but I started to feel the guilt again so I immediately decided to go to the tree as I went to the tree.
Today, when we went to the tree, there was no animal, no dog, etc. It was a very calm atmosphere. I did not feel any kind of pressure today. I went to the tree in peace and I gave Yakshani (power) there and greeted me and came to my house quietly.
When I got home, my darling dog Sweetie saw me and went straight inside as if she didn’t know me. I reached for my bed without thinking and I fell asleep.
As I slept, I noticed that just as someone was gently twirling a finger over my head while doing sadhana, I felt as if someone was gently twirling a finger over my head while I was sleeping here, and I fell asleep peacefully with the same experience.

Leave a Reply

%d bloggers like this: