google336aa3038a7d075c.html

14-May-20

','

' ); } ?>
नमस्कार 
बाबानी सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्याकडे साधना शिकण्यास गेलो, बाबानी मला एका यक्षिणीचा मंत्र दिला व ह्या मंत्राची सिद्धी ७ दिवस करा असे सांगितले, पण माझ्यापुढे तर यक्षप्रश्न उभा होता तो म्हणजे बँकेच्या जप्तीचा, कसे व कुटून पैसे येणार हे काहीच कळत नव्हते, शेवटी बाबांची आज्ञा पाळायची असे ठरवून मी बाबांकडून सिद्धी बाबत योग्य मार्गदर्शन घेऊन घरी जायला निघालो. 
घरी आल्यावर सर्वप्रथम मी आईला भेटलो आणि झालेली हकीकत सांगितली, मला हि यक्षिणी कोण हेच माहित नव्हते त्याबाबत मी आईकडे विचारणा केल्यावर तिने थोडीफार माहिती मला दिली. माझ्याकडे सिद्धीसाठी सोवळे वस्त्र, जपमाळ, बैठकीसाठी आसन, असे काहीच नव्हते. सिद्धीसाठी मी माझ्या ऑफिसची जागा निवडली तिथे रात्री १२ वाजता शुचिर्भूत होऊन साधनेला बसायचे होते. 
मी माझ्याकडील जुनी लाल लुंगी धुऊन घेतली, शिर्डीच्या साईबाबा येथून आणलेली लाल शाल होती ती आसनासाठी घेतली व जपमाळ १० रु. ची तुळशीमाळ विकत घेतली. सामुग्री तर गोळा झाली होती पण हे सर्व रात्री एकांतात १२ च्या ठोक्याला हि साधना करायची आणि तीही पहिल्यांदा सर्वच कष्टकरी होते, रात्रीच्या प्रहरात २.३० वाजता वडाच्या झाडाकडे यक्षिणीला भोग नेऊन ठेवायचा हे सारे माझ्यासाठी कठीण होते तरीही मी हे बँकेच्या कर्जफेडीसाठी करायचे ठरवले. 
मी १ डिसेंबर १९९९ साली ह्या सिद्धीला गुरूंचा आशीर्वाद घेऊन सुरवात करायची असे ठरविले, बँकेची जप्ती १५ डिसेम्बरला होती, माझ्याकडे तेवढाच कालावधी होता. ठरल्याप्रमाणे शुचिर्भूत होऊन आई वडिलांचा आशीर्वाद व त्यांची तसेच माझ्या पत्नीची संमती घेऊन ऑफिसवर ११ वाजता पोहचलो, ऑफिस कॉम्प्लेक्स मध्ये मला वॉचमॅनने विचारणा केली कि सर आप इतनी रात को कैसे? मी म्हटले हो आज पासून रोज रात्रीचे मी ऑफिसमध्ये काम करणार आहे तू जागा राहा. 
ऑफिसात गेल्यावर मला माझ्याच त्या वास्तूची भयानक भीती वाटू लागली. उगीच मनात नको नको ते विचार यायला लागले, मी माझ्या सावलीलाहि घाबरू लागलो ह्या अश्या प्रसंगाची मी स्वप्नातही कधीही कल्पना केली नव्हती. मन आणि शरीर थरथर कपात होते पण जिद्द होती तीच उपयोगाला पडली. मी साधनेसाठी जागा शोधायला लागलो तर माझ्या ऑफिसात एक दक्षिणेला पाठ करून स्वामी समर्थांचा फोटो होता, मी मनात म्हटले ठीक आहे यांच्या पायाशी बसूनच साधना करू म्हणजे जे काही होईल ते त्यांच्याच साक्षीने होईल. अशारितीने मनाने स्वामींना आपल्या टीम मध्ये समाविष्ट करून घेतले. 
सर्व तयारी करून मी स्वामींच्या फोटोच्या पायाशी त्यांना नमस्कार करून बसलो जे होईल ते तुमच्याच साक्षीने, कपाळी चंदनाचा टिळा, लाल वस्त्र -आसन, हाती तुळशीची माळ व  यक्षिणीसाठी समोर भोग ठेऊन मी  १२ च्या ठोक्याला माझ्या पहिल्या सिद्धी-साधनेला बसलो. 
सर्व देवीदेवताना नमस्कार करून पहिल्या ओम नमः शिवायच्या १० जपमाळ केल्या खूपच मनात आत्मविश्वास दाटून आला होता. त्यांनतर मी यक्षिणीच्या साधनेला सुरुवात केली त्या वेळात त्या वातावरणात प्रचंड दाब असा निर्माण झाला, माझे सर्व शरीर बधिर व सुन्न झाले पण कानाची ताकद कित्येक पटीने वाढल्याची जाणवले. साधना झाल्यावर डोळे उघडताना थोडी मनात भीती होती की कदाचित समोर कुणीही असण्याची शक्यता असू शकते, मी डोळे किलबिले करीत हळूच उघडले तर माझ्यासमोर काहीही नव्हते मी थोडा सुटकेचा श्वास सोडला. पण मला त्या यक्षिणीचा भोग घेऊन वडाच्या झाडाकडे जायचे होते, रात्रीचे २.१५ झाले होते मी लगबगीने माझी सारी सामुग्री बाजूला गोळा करून ठेवली व वस्त्र बदलून (खालच्या वॉचमनला कळू नये म्हणून) यक्षिणीचा भोग घेऊन मी ऑफिसच्या बाहेर पडलो तर पाहिले असता वॉचमन चक्क झोपला होता. मी झाडाकडचा रास्ता लगबगिने पकडला. 
झाडाकडे प्रचंड दाब होता जसा कि तो मी साधना करताना होता. मन कावरे बावरे झाले मी आणलेला  भोग झाडाकडे ठेऊन नमस्कार केला आणि घरचा रस्ता धरला, घरी गेल्यावर मी सरळ बिछान्यावर झोपून गेलो. सकाळी बाबांकडे जायचे होते रात्रीचा अनुभव त्यांना सांगायचा होता. 
————————————————————————————————————————–
Hello
As Baba said, I went to him to learn sadhana, Baba gave me a mantra of Yakshini and told me to fulfill this mantra for 7 days, But the big question before me was the bank confiscation, I didn’t know how and where the money would come from.In the end, I decided to follow Baba’s orders and went home with the right guidance from Baba about achievement.
When I got home, I first met my mother and told her the truth.I did not know who this Yakshini was, When I asked my mother about it, she gave me some information. I didn’t have any clothes, rosary, seat for meeting. For the achievement, I chose my office place where I wanted to be cleansed at 12 o’clock at night and sit on the instrument.
I washed my old red lungi, the red shawl I had brought from Saibaba in Shirdi for the seat and the rosary for Rs. 10  Bought Tulshimal. The material was collected, but it was difficult to do this sadhana at 12 o’clock in the night, and it was very difficult for the first time. Even though it was difficult for me to take Yakshini to Vada’s tree at 2.30 pm, I decided to do it to repay the bank loan.
I decided to start this achievement on December 1, 1999 with the blessings of the Guru. The bank foreclosure was on December 15, I had the same period. We arrived at the office at 11 o’clock with the blessings of my parents and their and my wife’s consent. In the office complex, Watchman asked me, “Sir, how are you all night?” I said yes, I’m going to work in the office every night from today. You stay awake.
When I went to the office, I was terrified of my own building. Thoughts began to come to mind, I never dreamed that I would be afraid of my shadow. The mind and body were trembling but the stubbornness came to fruition. When I started looking for a place for the tool, I had a photo of Swami Samarth leaning south in my office, I said in my mind, it is okay to do sadhana sitting at their feet so that whatever happens will be witnessed by them. Thus, Mind included Swami in his team.
After making all the preparations, I greeted the Swami at the foot of the photo and sat down to witness what will happen, With a forehead sandalwood tila, a red cloth-seat, a tulsi necklace in my hand and a bhog in front for Yakshini, I sat on my first achievement at 12 o’clock.
After saluting all the deities and chanting 10 chants of the first Om Namah Shivaya, self-confidence was very strong. After that, when I started Yakshini’s instrument, there was a huge pressure in that atmosphere, My whole body became numb and numb but I felt the strength of my ears increase many times. When I opened my eyes after the sadhana, I was a little scared that there might be someone in front of me, I blinked and opened my eyes, but there was nothing in front of me I let out a sigh of relief. But I wanted to take that elf and go to the Vada tree, It was 2.15 pm and I hurriedly collected all my belongings And I changed my clothes (so that the Watchman below would not know) and when I came out of the office with the Yakshini, I saw that the Watchman was fast asleep. I hurried to the tree.
The tree was under tremendous pressure as I was doing sadhana. The mind became confused I greeted the offering I had brought to the tree and took the road home, When I got home, I went straight to bed. I wanted to go to Baba in the morning and tell him about my night experience.

Leave a Reply

Discover more from Spiritual-communions

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading