Site icon Spiritual-communions

13-May-20 – 1

वाचकहो पुन्हा एकदा तुमचे आपल्या ब्लॉगवर स्वागत आहे …
बाबानी सांगितल्याप्रमाणे मी त्याचे आचरण करीत होतो, काही दिवसांनी मी माझ्या एका माणसाला बाबांचा पत्ता शोधायला सांगितला परंतु त्याला तो काही केल्या सापडेना. मी अजून एका दोघांना पाठिवले परंतु ते हि अपयशी ठरले. इतक्यात माझ्याकडे माझे ओळखीतले एक गृहस्थ आले व म्हणाले की, माझ्या परिचयातील एका व्यक्तीच्या घरातून त्यांचे दागिने चोरीला गेले आहेत, पोलीस कंप्लेंट केली आहे पण चोरीचा काहीच सुगावा लागत नाही. तर तुमच्या ओळखीत कुणी याचा शोध लावणारा आहे का? मी पटकन बाबांचे नाव घेतले व त्या गृहस्थाला त्यांचा शोध घेण्यास सांगितले आणि ते जर भेटले तर कृपया मला सांगा. हे हि आवर्जून सांगितले.
६ महिन्यानंतर वरील व्यक्ती मला अचानक रस्त्यात भेटली तेव्हा मी त्यांना वरील घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले, हो माझी व बाबांची भेट झाली ती काय जबरदस्त व्यक्ती आहे त्यांनी आम्हाला अचूक मार्गदर्शन केले व माझ्या मित्राचे दागिने परत मिळाले. त्यावर मी आश्चर्यकारक प्रश्न विचारला की, बाबा कुठे भेटले? गृहस्थ – तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर मला ते भेटले ते तुमची आठवण काढत आहे. मी त्या गृहस्थाच्या हाताला पकडून बाबांचा तात्काळ पत्ता दाखव म्हणून त्यांना सोबत घेऊन गेलो. 
एक छोटयाशा खोलीत बाबा व त्यांचे कुटुंब राहत होते ते गृहस्थी आहेत हे मला तेव्हा समजले. सफेद पोशाखात शांत असे एक टक नजर रोखून बसले होते. सडपातळ व मध्यम उंचीच्या त्या तेजोमय बाबाना पाहिल्यावर मला खूप गहिवरून आले, मी चटकन त्यांचे चरण धरले आणि त्यांना नमस्कार केला. आपली इतके दिवस भेट होऊ शकली नाही याची खंत मी त्यांच्याकडे व्यक्त करताच ते किंचितसे हसले, पण मला थोडे अजबच वाटले. 
त्यानंतर मी रोज त्यांची आदरयुक्त भीती असूनही माझ्या समस्या निवारणासाठी आणि जिज्ञासेपोटी भेट घेत राहिलो. त्यादरम्यान माझ्याकडे कामाला असलेल्या मुलाने दोन चमत्कारिक  प्रयोग आणले होते १. गुप्तधन, २. एक सिद्ध प्रयोग. मी बाबाना त्याची कल्पना दिली असता ते म्हणाले कि हे दोन्हीहि प्रयोग अयशश्वी होतील, मी म्हणालो कि समोरच्या मांत्रिकाने हे काम करण्याचा शब्द दिला आहे, त्यावर बाबा म्हणाले की ते शक्य नाही त्यापेक्षा तुम्ही साधना करा तुम्हाला त्यातून योग्यमार्ग मिळेल. पण मी अधीर असल्याचे बाबांच्या लक्षात आले व ते म्हणाले, ठीक आहे तुम्ही तुमच्या समाधानासाठी हे प्रयोग करून बघा, आणि त्यानुसार निर्णय घ्या. 
मला परवानगी मिळाल्याने मी वरील दोन्ही प्रयोगाच्या मागे लागलो आणि शेवटी मला कळले कि आपली इथे फसगत होत आहे आपला वेळ व पैसा दोन्ही वाया गेले आहे. (हे प्रकरण २ महिने चालले होते.) त्यात मला एका बँकेची जप्तीची नोटीस आली आणि मी थरथरून भानावर आलो त्या मायावी नगरीतून. जप्ती केवळ १५ दिवसांवर येऊन ठेपली होती काही सुचण्याच्या आत मी थेट बाबांच्या घरचा रस्ता पाणावलेल्या डोळ्यांनी धरला. खिशात पैसे नव्हते, पायात चपला नव्हत्या, दरिद्रता काय असते याचे वास्तव उदाहरण मी जगत होतो, एक मन सांगत होते की या जगण्यात काय अर्थ आहे? पण माझे दुसरे मन जे मेडिटेशनने तयार झाले होते ते मला धीर देत होते. बाबांचे सबुरीचे उपदेश आठवत होते मी मला स्वतःला कोसत बाबांच्या घरी पोहचलो. 
मला पाहताच बाबा म्हणाले, या मी तुमचीच वाट बघत होतो मी हताश व रडवलेल्या चेहऱ्याने बाबाना सर्व हकीकत सांगितली त्यावर त्यांनी क्षणभर शून्यात ध्यान लावून म्हणाले की तुम्ही घाबरू नका मी तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही. मी तुम्हाला एक साधना सांगतो ती तुम्ही करा म्हणजे तुम्हाला योग्य मार्ग मिळेल. त्यावर मी प्रश्न केला की बाबा मला हि साधना जमेल का? शंका नको, बाबा थोड्या चढ्या आवाजात बोलले…. 

Readers, once again welcome to your blog …
I was following Baba’s instructions. A few days later, I asked one of my men to find Baba’s address but he could not find it. I sent one or two more but they failed. Recently, a householder came to me and said that his jewelery had been stolen from the house of one of my acquaintances, the police had complained but there was no indication of theft. So does anyone you know find out? I quickly took Baba’s name and asked the householder to look for him and if he met me please tell me. This is what Awarjun said.
Six months later, when the above person suddenly met me on the street, when I asked him about the above incident, he said, “Yes, my father and I met. He is a great person. He gave us accurate guidance and got back my friend’s jewelery.” On that I asked the amazing question, where did Baba meet? Grihastha – I remember you meeting him at the address you mentioned. I grabbed the householder’s hand and took him with me to show him Baba’s immediate address.
It was then that I realized that Dad and his family were living in a small room. He was sitting in a white dress with a quiet look on his face. When I saw that radiant Baba of slender and medium height, I was overwhelmed, I quickly grabbed his feet and greeted him. He smiled a little when I told him that I hadn’t seen him for so many days, but I felt a little strange.
After that, I continued to visit him daily, despite my respectful fears, to solve my problems and out of curiosity. In the meantime, the boy who was working for me had brought two miraculous experiments. Secret money, 2. A proven experiment. When I gave Baba the idea, he said that both these experiments would be unsuccessful. I said that the magician in front had promised to do this work. But Baba noticed that I was impatient and said, “Okay, try this experiment for your satisfaction, and decide accordingly.”
With my permission, I went after both of the above experiments and finally I realized that you are cheating here and both your time and money have been wasted. (This case had been going on for 2 months.) In it, I got a notice of confiscation from a bank and I came to my senses trembling from that magical city. The confiscation was only 15 days away. There was no money in my pocket, no slippers in my feet, I was living a real example of what poverty is, a mind was telling me what is the meaning of this life? But my second mind, which was formed by meditation, was giving me patience. Remembering Baba’s Saburi sermon, I took myself to Kosat Baba’s house.
Seeing me, Baba said, “I was waiting for you. I told Baba all the facts with a desperate and crying face.” I tell you a sadhana, do it so that you will find the right path. I asked Baba if I could get this sadhana. No doubt, Baba spoke in a slightly raised voice ….

Exit mobile version