Site icon Spiritual-communions

12-05-2020 – 4

महाविद्यालयीन शिक्षणानंतर मी व्यवसाय करायचा ठरवले. सन १९९१ साली मी व माझ्या एका मित्राने मिळून  एक कॉम्पुटर त्याचा ओळखीने कर्जावर घेतला. त्यात मिळालेल्या अपयशानंतर मी स्वतःचा संगणक प्रकाशन व्यवसाय १९९४ साली सुरु केले त्यात मला प्रसिद्धी व धन प्राप्त झाले पण ते जास्त काळ टिकू शकले नाही, शेवटी कामे येईनाशी झाली आणि मी कर्जबाजारी झालो बँका माझ्या दारावर चक्रा मारायला लागल्या, सर्वच बाबतीत थकबाकीदार झालो. 
मला कोणतेही व्यसन नसताना मी कोणाचेही काहीही वाईट केले नसताना हि अशी दशा माझ्यावर का यावी याचे कोडे सुटत नव्हते. माझ्याकडे कामाला असणाऱ्या  मुलाने एक चमत्कारिक योजना माझ्यासमोर मांडली होती. कि काही विशिष्ट वस्तू व तांत्रिकाच्या आधारे आपल्याला पैशाचा पाऊस पाडता येईल, म्हणजे सर तुमचे कर्ज पूर्णपणे फिटले जाईल आणि तुम्ही नव्याने जीवनाला सुरवात करू शकता. प्रस्ताव तसा चांगला होता पण ते कृतीत येईल का याची शंका होती. 
त्याच्या सांगण्यानुसार मी त्या तांत्रिकाकडे गेलो त्याच्या वस्तूच्या मागण्या ऐकल्यानंतर हा मलाच अल्ला उद्दीन जादूचा चिराग समजत नाही ना? हा काही काय मागत राहतो आज हे आणा उद्या ते आणा छे ते सारे असह्य होते, पुन्हा एकदा मी देवाचा धावा सुरु केला जो जे सांगेल त्या बाबाकडे जाऊ लागलो पण सारे निरर्थक होते. प्रत्येक जण माझ्या परिस्तितीचा फायदा घेण्याचा बघत होता. मित्रांनी, नातेवाईकांनी पाठ फिरवली होती, काही तर घरात येऊन टोमणे मारून जात असे.  मनावरचा ताण दूर करण्यासाठी मी मेडिटेशन करीत होतो. 

त्या काळात मला अचानक कुठेही शुभ्र तर कधी सप्तरंगी छोटे प्रकाशपुंजके दिसायचे, स्वप्नात नवनाथांचा दृष्टांत झाला त्यात ते मला तू सुर्यकुंडावर ये तुझ्या कपाळी भस्म लावायचा आहे असे सांगत. 

मला हे नवनाथ कोण व ते माझ्यामागे का हेच कळेना, शेवटी सूर्यकुंड व नवनाथ यांच्या शोधात मी बरेच भ्रमण केले पण दोघांचा पत्ता काही लागेना. 
इथे बँका तर हाथ धुऊन मागे लागल्या होत्या, काहीच कळत नव्हते पण मला माझ्या घरच्यांनी खूप सांभाळून घेतले. वडील ज्योतिष बघत असल्याने ते मला ग्रहस्तितीचा अंदाज देत असत पण सहानुभूतीने माझे प्रश्न सुटणार नव्हते. माझ्या सहकाऱ्याबरोबर संध्याकाळच्यावेळी गप्पा मारत असताना एक व्यक्ती माझ्या वडिलांना शोधायला आली. त्यांच्या भेटीत कळले कि त्यांना एक ट्रस्ट करून गुरुकुल काढायचे आहे, मी त्यांना प्रश्न केला कि तुम्ही त्या गुरुकुलात काय शिकवणार त्यावर ते म्हणाले कि विविध साधना शिकवणार कारण कि मी स्वतः नाथपंथी आहे. 
हे ऐकल्यावर कुणीतरी नाथपंथी आपल्या दारावर स्वतःहून आला आहे तर याला आपल्या समस्या सांगू या….. 
मी माझा आजवरचा अनुभव / समस्या  त्यांना सांगितल्या, त्यावर त्यांनी मला सबुरीचा सल्ला देऊन थेंबे थेंबे तळे साचे असा उपदेश दिला, मला अध्यात्मातले काही ज्ञान नव्हते मी माझी मान डोलावून त्यांच्या मस्तकी डोके ठेऊन त्यांना मी बाबा म्हणून हाक मारू लागलो. 
——-
After college I decided to start a business. In 1991, a friend and I borrowed a computer from him. After failing in that, I started my own computer publishing business in 1994. I got fame and money in it but it didn’t last long.Eventually the work was done with Yeina and I went into debt. The banks started knocking on my door, I was in arrears in all respects.
When I didn’t have any addiction, I didn’t do anything bad to anyone. The boy at work had come up with a wonderful plan. That you can make money based on certain items and techniques, that is, sir, your debt will be completely paid off and you can start a new life. The proposal was good but it was doubtful whether it would work.
According to him, I went to the Tantric and after hearing the demands of his goods, I do not understand this is the light of Allah Uddin, right? What is he asking for? Bring it today, bring it tomorrow. It was all unbearable. Once again, I started praying to God to go to the father who would tell me, but it was all in vain. Everyone was looking to take advantage of my situation. Friends and relatives had turned their backs on him. I was meditating to relieve stress. 
At that time, I used to see small white and sometimes rainbow lights everywhere. In a dream, Navanatha had a vision in which he told me to come to Suryakunda and burn your forehead.

 I did not know who Navnath was and why he was behind me. In the end, I traveled a lot in search of Suryakund and Navnath but I could not find them.
Here the banks were washed their hands and left behind, I didn’t know anything but my family took good care of me. Since my father was looking at astrology, he used to give me predictions of the planet, but empathy would not solve my problem. While I was chatting with my colleague in the evening, a man came to look for my father. During his visit I found out that he wanted to set up a trust and set up a gurukul. I asked him what he would teach in that gurukul and he said that he would teach various sadhanas because I myself am a Nathpanthi.
After hearing this, if a Nathpanthi has come to your door by himself, let’s tell him our problems …..
I told them my experience / problem till date, on which they advised me Saburi and advised me to drop by drop, I had no knowledge of spirituality. I shook my head and put my head on them and started calling them Baba.

Exit mobile version