google336aa3038a7d075c.html

12-05-2020 – 3

','

' ); } ?>

मी आपणास मागे सांगितल्याप्रमाणे तिथे उपस्तित व्यक्ती पैकी एक स्त्री ती तिच्या भूतकाळात गेली आणि तिने तिच्या आयुष्यातील गोपनीय घटना मला सांगण्यास सुरवात केली. ती सांगत होती मी ती घटना डायरीत नमूद करून घेत होतो. तिला तिचे काहीही शारीरिक भान राहिले नव्हते ती निपचित पडली होती. ती तिच्या तोंडाने अगदी बारीक आवाजाने सर्व काही सांगत होती तिचे अंदाजे वय ३५ असेल, पण ती सध्या बालपणात म्हणजे १० वर्षाची होती. ती शुद्धीवर आल्यावर मला समजले कि ती एका फिल्म प्रोड्युसरची बायको होती आणि गेली ७ वर्षे ती डिप्रेशनच्या गोळ्या घेत होती. बालपणी तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा दुष्परिणाम तिच्या शरीर-मन व संसारावर होत होता. पुढे तिने माझा घरचा पत्ता मिळवून तिच्यावर संमोहनाचे उपचार करून घेतले आणि कायमची त्या त्रासातून सुटका करून घेतली, महागडी औषधे तिची कायमची बंद झाली. 

एक कन्या माझ्याकडे ओळखीने आली होती ती बोलता बोलता खूप हसायची आणि कोणीतरी थोबाडीत मारल्याप्रमाणे अचानक दचकून गप्प व्हायची. तिच्यावर ज्यावेळी प्रयोग केला गेला त्यावेळी एक भयंकर सत्य समोर आले…. १६ वर्षाची असताना एकदा ती डॉक्टरकडे तपासणीला गेली होती. डॉक्टर स्त्रीतज्ञ असल्याने त्यांचे वारंवार भेटणे सुरु असायचे अशातच त्या डॉक्टरने गुंगीच्या औषधाने तिच्यावर बलात्कार केला तीने अर्धंगुंगीत याचा प्रतिकार करण्याचा असफल प्रयत्न केला होता. डॉक्टरचे वय ६० वर्षे होते. ती त्यांच्या मुलीप्रमाणे असूनही त्यांनी तिला आपल्या मोहजालात अडकून ठेवले व तिला लग्नाचे आमिष दाखवून केवळ तिचा उपभोग घेत राहिले. प्रेमापोटी एका आशेच्या किरणावरती ती आपले जीवन जगत होती. ती कन्या उच्च शिक्षित होती पण तिच्या मेंदूचा ताबा तिच्या हृदयाने घेतला होता माझ्या मार्गदर्शनाचा तिच्यावर तात्पुरता परिणाम झाला होता. तिने स्वतःहून तिचे पुढचे आयुष्य अंधारात ढकलून दिले होते.
————————————————————————————————————————–
As I told you earlier, one of the people present there went to her past and she started telling me secret events in her life. She was saying that I was mentioning the incident in my diary. She had no physical consciousness left. She was talking about everything in a very soft voice with her mouth. She is about 35 years old, but she is currently 10 years old. When she regained consciousness, I realized that she was the wife of a film producer and had been taking pills for the last 7 years. Childhood abuse was affecting her body, mind and world. Next she got my home address and treated me with hypnosis and got rid of that ailment forever, expensive drugs stopped her forever.
A girl came to me with an acquaintance. When the experiment was done on her, a terrible truth came to light …. Once when she was 16 years old, she went to the doctor for examination. As the doctor was a gynecologist, he used to visit her frequently. In the same way, the doctor raped her with a drug called Gungi. She had tried unsuccessfully to resist it. The doctor was 60 years old. Even though she was like their daughter, they kept her in their lure and kept on enjoying her only by showing her the lure of marriage. She was living her life on a ray of hope out of love. The girl was highly educated but her brain was controlled by her heart. My guidance had a temporary effect on her. She had pushed her next life into darkness by herself.

Leave a Reply

%d bloggers like this: