google336aa3038a7d075c.html

11-05-2020

','

' ); } ?>

सर्व प्रथम मी या व्यासपीठाचे आभार मानतो कि, तुमच्यासारख्या चोखंदळ वाचक व साधकांना माझे अध्यात्मिक अनुभव सांगण्याची संधी मिळाली. 

मी तुमच्या सारखा एक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलो. आर्थिक  परिस्तिती सर्वसाधारण असल्याने सदैव पैशाची चण चण असायची. आपण हि खूप धन कमवावे हि इच्छा होती. लहान वयातच जबाबदाऱ्या वाढत होत्या. लहानपणी मी गाड्यांचे हुबेहूब आवाज काढायचो कदाचित ड्राइवर किंवा कंपनी मालक होईन असे प्रत्यक्षदर्शी बोलायचे. बालपण हे निसर्गाच्या सानिध्यात गेले. आजच्या बालकांची किव येते त्यांना निसर्ग म्हणजे काय हे कळतच नाही. 
थोडे समजायला लागले तेव्हाचे आठवते कि मित्राचा हात माझ्या खांद्यावर कधी आला ते कळलेच नाही. मित्र म्हणजे काय ते बहुधा मला आज कळत असावे. त्यावेळी मी माझ्या एका मित्रासोबत अध्यात्मबाबत म्हणजे गूढ अशा विषयावर तासन तास बोलत असायचो. संमोहित हा आमचा प्रमुख विषय असायचा त्यासाठी साधना करावी लागते हे ठाऊकच नव्हते पण त्या शास्त्र बद्दल आकर्षण होते. 
(इथे मी नमूद करू इच्छितो कि मी हे लिखाण केवळ माझे अनुभव म्हणून या व्यासपीठावर मांडत आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही, केवळ जे वास्तव व श्रद्धा सबुरी वर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी कदाचित माझे हे लिखाण मार्गदर्शनाचे कार्य करू शकेल असा विश्वास वाटतो.)
 

First of all, I would like to thank this forum for giving the opportunity to share my spiritual experiences with aspiring readers and seekers like you.

I was born into a middle class family like you. Since the economic situation was normal, there was always a shortage of money. I wanted to make a lot of money. Responsibilities were growing at an early age. As a kid, I used to make loud noises about cars, and eyewitnesses used to say that maybe a driver or a company owner. Childhood was spent in the company of nature. Today’s children do not know what nature is.
When I started to understand a little, I remember that I never knew when my friend’s hand came on my shoulder. Probably a factor as to why they’re doing so poorly. At that time, I used to talk for hours with a friend about spirituality. I didn’t know that hypnosis was our main subject and we had to do sadhana for it, but there was fascination about that scripture.
(I would like to mention here that I am presenting this article on this platform only as my experience, it is not my intention to spread superstition, I believe that this article may serve as a guide only for those who believe in reality and faith Saburi.)

Leave a Reply

%d